लावणी

Submitted by निशिकांत on 24 April, 2017 - 00:56

लावणी
लावणी---{माझा पहिला प्रयत्न. चूकभूल देणे घेणे. चाल--राजसा जवळी जरा बसा..गायिका: लता मंगेशकर. या लावणीची चाल जाणण्यासाठी क्लिक करा http://gaana.com/song/rajasa-javali-jara-basa. चालीवर गुणगुणत वाचल्यास जास्त मजा येईल.)

पिळदार, अंग कसदार, फेटा जरतार, भाळले राया
मी नार, ज्वानीचा भार, पेटली काया

भेटता नजर नजरेला
खेळ रंगला, पिरतिचा बाई
मी अशी हरवले, चैन जिवाला नाही

हासले, मनी लाजले
भान हरवले, पाहुनी सजणा
पाहिजे काय ते माझं मला बी कळना

आवरु, कसे सावरू?
बंड पाखरू, मनी बेबंद
वय धोक्याचं अन् तुझा लागला छंद

आतली, शिवण घातली
पुन्हा उसवली, तंग चोळीची
मी शिवू कंचुकी, कती सैल मापाची?

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

I agree with Akshayji.....ठसकेबाज लावणी

सुंदर....

अक्षय दुधाळ, पुरंदरे शशांक, मीनल कुलकर्णी आणि दत्तत्रय साळुंके आभार आपणा सर्वांचे प्रतिसादासाठी.