क्विल्ट अर्थात कापडाच्या तुकड्यांची कलाकुसर

Submitted by मनीमोहोर on 23 April, 2017 - 14:12

क्विल्टिंग अर्थात कापडाच्या तुकड्यांची कलाकुसर ह्यात मला खुप रस आहे. कापडाचे छोटे छोटे तुकडे जोडुन केलेली निरनिराळी डिझाईन्स पाहिली की मी थक्क होऊन जाते. मला वाटतं ह्या कलेचा शोध गरजेतुन लागला असेल कारण पूर्वीच्या काळी जेव्हा तयार कापडाची एवढी मुबलकता नव्ह्ती तेव्हा कापडाचा एखादा लहानसा तुकडा ही फेकुन देववत नसेल . कापडाची चिंधी न चिंधी वाचवण्याच्या उद्देशानेच ह्या कलेचा जन्म झाला असेल.

पाश्चिमात्य देशात जिथे खूप थंडी असते तिथे पांघरुणं अधिक उबदार करण्या साठी सुद्धा ही कला विकसित झाली असेल कारण वर एक कापड मध्ये एक आणि आतल्या बाजुला एक अशी तीन पदरी जाड पांघरुणं ह्याने तयार करता येतात. काळाच्या ओघात आता खूप बदल झाले आहेत, कपड काटकसरीने वापरण्याची गरज आता उरली नाहिये . अखंड कापडाचे तुकडे कापून ही क्विल्टिन्गची हौस करता येते. आपल्याकडे सामन्यतः लहान मुलांची दुपटी क्विल्टिन्ग ने अशी केली जातात पण परदेशात मोठ्या मोठ्या आकारात ही केली जातात. असं ही वाचलय की तिकडे मुलगा /मुलगी जेव्हा शिक्ष्णासाठी घरा बाहेर पड्ते तेव्हा आई / आजी स्वतः शिवलेली अशी एक क्विल्ट मुलाला प्रेमाची भेट देते.

क्विल्टिंग नी निरनिराळे देखावे, माणसांचे चेहरे वगैरे ही तयार करतात पण ती एक खूप कौशल्याची गरज असलेली वेगळीच शाखा आहे. पहिल्या भारतीय डॉ आनंदीबाई जोशी याना ही ह्याची आवड होती . त्यांनी केलेली अशी तुकड्यांची गोधडी पुण्याच्या राजा केळकर वस्तु संग्रहालयात पहायला मिळते. तुकडे जोडण्याची कला आणि आनंदी बाई ह्या दोन्हीतही तेवढाच रस असल्याने मी पुण्याला गेले की ही गोधडी बघुन येतेच .

मी केलेली ही बेबी क्विल्ट
IMG_20170423_234516.jpg

पॅटर्न मी नेटवरुन घेतला आहे . आयरिश चेन असं नाव आहे ह्या पॅटर्नच. नेट वर क्विल्ट सुबक होण्या साठी काय कराव आणि काय करु नये ह्याच्या टिप्स पण आहेत . जे तुकडे घेतेलेत ते सगळे घरातलेच उरलेले वैगेरे होते. ही क्विट लहान आहे म्हणुन कापताना जास्त त्रस नाही झाला पण आता एक मोठी करायचा विचार आहे त्यासाठी परदेशात मिळतात तसे प्री क्ट पीसेस ठाण्यात कुठे मिळतात का , ऑन लाईन कुठे मिळतात का , असतील तर ती लिन्क आणि कोणी वापरले असल्यास त्याची क्वलिटी कशी अस्ते वगेरे महिती मिळाली तर हवी आहे. म्हणुनच हा धागा काढलाय खरं तर /strike>

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Pages