आयुष्य वेचताना.........................

Submitted by अनुया on 22 April, 2017 - 09:04

दारी सडे फुलांचे मी शिंपिलेच होते
पायात कंटकांचे सल साहिलेच होते

जाई-जुई फुलांचा सुकुमार गंध ओला
निवडुंग अग्निफुलवे मी पाहिलेच होते

अस्मानी अस्मितेच्या विलसे टपोर तारा
पूर्णातही अपूर्णा मी राहिलेच होते

लाटेस सागराच्या जरि थोपवी किनारा
राजापुरात गंगाजल वाहिलेच होते

शापीत अप्सरेचे अव्यक्त आर्त जगणे
उ:शाप वेदनांना कधि लाभलेच नव्हते

आयुष्य वेचताना कधि हासले खळाळा
आक्रंद अंतरीचे मी साहिलेच होते

Group content visibility: 
Use group defaults

छान !

धन्यवाद !!

बेफिकीरजी, सूचनांबद्दल मन:पूर्वक आभार! मी लगेच संपादित करायचा प्रयत्न करते.