क्षणभर...

Submitted by अक्षय. on 19 April, 2017 - 06:21

क्षणभर..
नवे नवे अधीर नाते
हवेहवेसे होत जाते
वेडी ओढ हे श्वासातली
स्वप्नं नवे त्यात सामावले
कोड्यात पडले मन हे माझे का जडले हे रंग सारे
भावनांचे गोड नाते झाले स्वप्नातील खरे
हलके हलके मौनामध्ये अर्थ मिसळले सारे
चाहूल ही कोणती लागे रे या मना
नजरेने अलगुज शोधतो बंध नवा
जुळल्या नात्याचा हा अर्थ कोणता
जो तुझ्याविना मज उमजेना
हरपून जाईन नकळत पाहत मी तुला
क्षणभर तू माझी होशील का ??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवे नवे आधीर नाते
हवेहवेसे होत जाते
वेडी ओढ हे श्वासतली
स्वप्नं नवे त्यात सामावली

छान.. आधीर का अधीर ?
हे श्वासतली का ही श्वासातली ?
स्वप्नं नवे त्यात सामावली का सामावले ?
स्वप्ने नवी त्यात सामावली ?

कवीता आवडली.....

क्षणभर तू माझी होशील का ?? >> क्षणभर ??? का??? पूर्ण आयुष्यभरासाठी का नको?? >>> हा विचार मी आधी केलाच नव्हता आता केला पण पटकन ओळ सुचली नाही आयुष्यभराची साथ देशील का सुचलेल पण परत टायटल काय द्यायचा हा गोंधळ पण नक्कीच बदल घेऊन येईन तूर्तास हे गोड मानून घ्या. प्रतिसादासाठी धन्यवाद.