येशील का

Submitted by द्वैत on 13 April, 2017 - 02:30

येशील का

अशा सान्जवेळी तुझ्या चार ओळी
पुन्हा छेडतो साथ देशील का, येशील का
नभातील तारे हे बेभान वारे
तुला पुसती सान्ग येशील का, येशील का..

तुझ्या सावलीने हि फुलती फुले
तुझ्या चाहुलीने हे झुलती झुले
तुझे भास देती नवे श्वास आम्हा
पुन्हा प्राण फुन्कून जाशील का, येशील का..

तुझ्या लाजण्यावर धरा हि फिदा
तुझे रुसणे हि जणू एक अदा
तुझ्या हासण्याने दिशा ह्या बहरती
पुन्हा वाळवन्टी ह्या हसशील का, येशील का..

तुझी वाट पाहून ढळतो रवी
सुचेना कवीना कविता नवी
तुझ्यावीन बेरन्ग सारे नजारे
पुन्हा येउनी रन्ग भरशील का, येशील का..

अशा सान्जवेळी तुझ्या चार ओळी
पुन्हा छेडतो साथ देशील का, येशील का

- द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझी वाट पाहून ढळतो रवी
सुचेना कवीना कविता नवी
तुझ्यावीन बेरन्ग सारे नजारे
पुन्हा येउनी रन्ग भरशील का, येशील का..>>> क्या बात है !
मस्त आवडली कविता !

छान!

तुझी वाट पाहून ढळतो रवी
सुचेना कवीना कविता नवी
तुझ्यावीन बेरन्ग सारे नजारे
पुन्हा येउनी रन्ग भरशील का, येशील का..>>>सुंदर!

लिहीत रहा! शुभेच्छा!