आज मै उपर ,आसमा नीचे...

Submitted by विनार्च on 12 April, 2017 - 07:10

परीक्षा संपली पण अनन्याची कलाकृती आली नाही म्हणजे पोरगी अभ्यासाला लागली असे लोकांचे गैरसमज होऊ लागले , आडून आडून चौकशा व्हायला लागल्या ... नसत बालंट कोण घेणार अंगावर हा घ्या पुरावा आमच्या परीक्षा काळातील अभ्यासाचा Wink

आमचा आधीचा ग्रोथ चार्ट तुम्ही पाहिला असेलच....
(ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी )

20140613_194448.jpg

तो आम्ही अलमोस्ट पार केला होता एव्हाना , म्हणून ह्यावेळी आम्ही रिस्कच घेतली नाही Wink , उंची बघा फक्त Proud

IMG_20170407_181935.jpg

पार छताला भिडवला , टेन्शनच नको परत परत बदलायच ....

हा आम्ही काढायला घेतला तेंव्हा नेट वरून ते रॉकेट बघितलं नी काढलं मग वैतागलो नी घुसवली सगळी आमची कॅरेकटर्स त्यात .... तेंव्हा कुठे बरं वाटलं आम्हाला Happy

IMG_20170407_182118.jpg

सगळ्यात खाली मर्क्युरी आहे.... बिचार्याची वाट लागली आहे , व्हीनस ला उचलून .
व्हीनस कॉमेट बघून आश्चर्यचकित झालाय ....
कोण रे ते ,त्या यल्लोला चंद्र नी चांदणी म्हणतंय Wink
कॉमेट आहे तो, काही म्हणून काही कळत नाही हो लोकांना Proud
पृथ्वी मॅडम गॉगल लावून कूल दिसताहेत
मार्स चिडला आहे कारण त्याच्यावर किती ते सॅटेलाईट पाठवले आहेत...

आता राईट साईड खाली हॉर्स हेड नेब्यूला आहे , त्याच्या वर सुपरनोव्हा नी कॉमेट आहे
वर अस्ट्रोनॉट" अनन्या" , तिच्या वर अँड्रॉमेडा (मंदाकिनी)

IMG_20170407_182245.jpg

ज्युपिटर मोठा आहे म्हणून त्याला शेरीफ च पद दिल आहे
सॅटर्न त्याच्या रिंग्स सोबत हुलाहुप खेळतोय

नेपच्यून नी युरेनस साधारण एकाच वेळेस जन्माला आले नी त्यांचं आकारमान बऱ्या पैकी सेम असल्याने ते भाऊ आहेत , नी एकत्र पॉपकॉर्न खात एन्जॉय करताहेत

राईट साईडला सप्तर्षी , डॉल्फिन नी मायनर स्टार क्लष्टर आहे ,त्यावर ufo आहे...
त्याच्यावर हस्त, मेजर स्टार क्लष्टर,ओरायन आहे
(तुमच्या जवाबदारीवर शोध हो ,आम्हाला विचाराल तर आधी एक तुक झेलायची तयारी ठेवा )
सगळ्यात वर मेटीयर शॉवर आहे.

हुश्श, झालं बाई लिहून एकदाच....

अधिक माहितीसाठी, प्लिज सी अनन्या Proud

(डिस्क्लेमर : माझा ह्या सगळ्याशी दूर दूर पर्यंत कोणता ही संबंध नाही )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मंडळी Happy
अदिती , अनन्या आता 9 वि ला जाईल .
लेखनाचे श्रेय माझं नाही , 2 3 वाक्य असतील माझी बाकी ती चित्रा शेजारी उभी राहून माहिती सांगत गेली नी मी उतरवली .

छान! आवडलं!!

विनार्च, आपले आणि अनन्याचे अभिनंदन!!!

खतरनाक... मला तर वहीचं एक पान भरायच म्ह्टल तरी दम लागतो.. इथं तर भिंती च्या भिंती.. साष्टांग साम्गजो गं अर्चे तिला..