स्वर्गिय फुल - पारिजात....

Submitted by सायु on 12 April, 2017 - 06:46

शास्त्रीय नाव Nyctanthes arbor-tristis

मराठीत पारिजात, प्राजक्त, तर हिंदीत, हरश्रृगार/ हरसिंगार, तसेच संस्क्रुत मधे शेफालिका..
पारिजात.... नाव घेताच सुगंध दरवळतो ना! पहाटे चे मंद मंद आसमंत, गार वारा, कोवळे उन आणि त्यात अंगणात पडलेला
प्राजक्ताचा सडा...

आ हा हा! सारेच कसे सुखद, आल्हाददाई वाटते.

पारिजात हे खरोखर स्वर्गय फुल भासते... रंग, रुप, गंध, गुणधर्म सारेच कसे अनोखे..

पारिजात वृक्ष नसुन "रत्न" आहे, जे समुद्र् मन्थनातुन उत्पन्न झाले आहे. पुढे इंद्र देवाने,ते स्वर्गलोकात जाऊन लावले, असा उल्लेख हरिवंश पुराणातही आहे. असे म्हणतात की स्वर्ग लोकातली अप्सरा, “ उर्वशी”,तीचे नर्तन झाल्यावर आपला थकवा या झाडाला स्पर्श करुन घालवीत असे.

पारिजातका विषयी बर्याच आख्याईका आपल्या संस्कृतीत ऐकीवात आहेत..जसे की एकदा देवर्षी नारदाने, श्री कृष्णाला पारिजातकाची फुले भेट म्हणुन दिलीत. श्री कृष्णाला ती खुप आवडलीत.. त्यांनी ती रुक्मिणीला दिलीत. रुक्मिणी पारिजातकाची फुले पाहुन हरखुन गेली आणि तीने लगेच ती आपल्या केसात माळलीत. ही वार्ता सत्यभामे पर्यंत पोहचताच तीला खुप राग आला आणि तीने श्री कृष्णाजवळ हट्टच धरला की मला हा वृक्ष आपल्या वाटीकेत लावायचे आहे. श्री कृष्णाचे सत्यभामेच्या हट्टा पुढे काही एक चालले नाही.त्याने इंद्राशी युद्ध करुन
हे वृक्ष मिळवले आणि सत्यभामेने ते मोठ्या आनंदाने आपल्या वाटिकेत लावले. पण झाले असे के वृक्ष सत्यभामेच्या वाटिकेत आणि फुलांचा सडा मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असे. त्यामुळे देखिल सत्यभामेचा, रुक्मिणी बद्दल चा मत्सर वाढतच गेला..

तसेच पारिजातका संदर्भात अजुन एक कथा ऐकायला मिळते, ती म्हणजे पारिजात नावाची एक राजकन्या होती. तीचे सुर्यावर आतोनात प्रेम होते. तीच्या लाख प्रयत्ना नंतर देखिल ती सुर्यदेवाचे मन जिंकु शकली नाही. आणि सुर्यदेवाचा नकार, हा तीच्या आत्महतेस कारणीभुत ठरला. असे म्हणतात की तीच्या अस्थींच्या राखेतुन ह्या वृक्षाचा उगम झाला. म्हणुन या झाडाचे नाव पारिजात. या झाडाची फुले रात्रीच उमलतात आणि रात्रीच गळुन पडतात. असे वाटते की रात्र भर हे झाड ,फुलांचे अश्रु ओघळत असते. सुर्योदयाच्या पुर्वी जवळ जवळ सगळी फुले गळुन पडलेली असतात. जणु काही सुर्यदेवावर चा राग हे झाड व्यक्त करत असते. म्हणुन ह्या झाडाला The Tree of sorrow / The Sad Tree म्हणुनही ओळखतात.

प्राजक्तांच्या फुलांना साधारण ४ ते ८ पाकळ्या असतात. पाकळ्या टोकाकडे किंचीत दुभंगलेल्या असतात. पिंगट पांढरी फुले , नाजुक केशरी देठ, आणि मधुर सुवास आपल्याला हरखुन ठेवतो. याचा बहर जुलै ते डिसेंबर पर्यंत असतो. तसे जानेवारी - फेब्रुवारीतही काही झाडांवर तुरळक अशी फुलं बघायला मिळतात. हे गणपतीच्या अवडते फुल तर आहेच पण श्री कृष्णाला देखिल तितकेच प्रिय आहे. असे म्हणतात की लक्ष्मी पुजनात ह्या फुलांना विशेष स्थान आहे. बंगाली लोक दुर्गा पुजेत ही फुले आर्वजुन वाहतात. मल्हारी मार्तंडाला देखिल हे फुल वाहतात याचा उल्लेख मल्हार पुरणात ही आहे.

आयुर्वेदातही ह्याचे विशेष महत्व आहे. पाने साधारण ६ ते १२ से.मी असतात आणि झाड साधारण १० -२५ फुट उंचीचे असते. पाने खरखरीत असतात आणि त्यांचा वापर Arthritis च्या उपचारावर प्रामुख्याने करतात. याच्या पानांपासुन आणि फांद्यान पासुन हरसिंगार तेल तयार केले जाते हे सुद्धा Arthritis वर वापरल्या जाते. पानांचा उपयोग ज्वर, कफ, कृमी, पित्ताचे विकार संधी वात ईत्यादीवर केला जातो.
फुलांपासुन खाण्याचा पिवळा / केशरी रंग तयार केला जातो. तसेच Flower therapy मधे देखिल याच्या फुलांचा अर्क / तेल वापरले जाते. तसेच फुलांपासुन विविध प्रकारची अत्तरे आणि सौंर्दय प्रसाधने तयार केली जातात.

याच्या तपकीरी हृदयाकार बिया, त्या सुद्धा बहुगुणी. बियांची पावडर करुन त्या पासुन कृमी नाषक, तसेच केसातील कोंडा आणि त्वचा रोगांवरिल औषधे तयार केली जातात.

तर असा हा बहुगुणी आणि अदभुत पारिजातक तुम्ही सुद्धा आपल्या अंगणात किंवा सभोवतालच्या परिसरात लावा. माझ्या कडे , एका मध्यम आकाराच्या कुंडीत पारिजातकाचे रोप लावले आहे.. आता ६ फुट वाढले आहे.. सिझन मधे रोज १० -१२ फुलं निघतात.. पण ती मला लाख मोलाची वाटतात.

तळ टीप : वरिल प्र.ची. मायबोलीकर जागु आणि साधना यांच्या कडुन सभार..

Group content visibility: 
Use group defaults

अरे व्वा! पहिलाच प्रतिसाद हेमा ताईं तुमचा.. खुप आनंद झाला..
आता फोटो दिसतायेत का?

कृष्णा लेख आवडल्या बद्द्ल मन:पुर्वक आभार. Happy

सुंदर लेख... हीच कोरल जास्मिन पण, देठाच्या पोवळ्यासारख्या रंगामूळे हे नाव !
तुझ्याही घरात पारिजातकाचा लक्ष वाहण्याएवढी फुले लवकरच फुलोत, या शुभेच्छा !!!

मस्त! सायु, खूप सुंदर लिहिलंय! आसाममध्ये ही फुले धुवून, वाळवून भाजी करतात. अरे हो प्रचि, अप्रतिम! आमच्या अंगणात आहे. नवरात्रात सडा पडलेला असतो.

आभार दा +हीच कोरल जास्मिन पण, देठाच्या पोवळ्यासारख्या रंगामूळे हे नाव! +++ हे नविन नाव कळले..
तुझ्याही घरात पारिजातकाचा लक्ष वाहण्याएवढी फुले लवकरच फुलोत, या शुभेच्छा !!!+++ दा या शुभेच्छा खुप आवडल्यात..:) ------/\------

मंजु ताई धन्स ग! आसाममध्ये ही फुले धुवून, वाळवून भाजी करतात. ++ हे देखिल नविनच..:)
आमच्या अंगणात आहे. नवरात्रात सडा पडलेला असतो. ++ तुझ्या अंगणातला सडा मी पाहिला आहे Happy

सायु, छान लेख.
ग्रुप निवडताना काही चूक झाली का? हा धागा गणेशोत्सव २०१५ ग्रूपमध्ये दिसतोय.

ह्या फूला एवढाच सुन्दर लेख !
एक काहीतरी "फूले का पडती शेजारी" म्हणून जूने गाणे पण आहे ना ह्या फूलान्बद्दल ?

मेघ्स आभार..
ग्रुप निवडताना काही चूक झाली का? हा धागा गणेशोत्सव २०१५ ग्रूपमध्ये दिसतोय.+++ सुधारणा केली आहे. धन्स ग,

स्वप्नाली लेख आवडला, छान वाटले..
क काहीतरी "फूले का पडती शेजारी" म्हणून जूने गाणे पण आहे ना ह्या फूलान्बद्दल ? +++ हो बरोबर.. दिनेश दा ना आठवेल हे गाणे. त्यांना खुप
गाणी माहिती आहेत. Happy

छान लिहिलंस. तुझ्याकडे लक्ष फुले येवोत Happy

माझ्या आठवणीत परिजातकाचा आंब्यासारखा वाढलेला वृक्ष आहे लहानपणीचा, पण इथे सगळी खुरटलेली झाडेच पाहिलीत. आसमंत मध्येही पारीजतकावर खूप सुंदर लेख आहे.

साधना आणि वर्षु दी खुप खुप धन्यवाद...
फोटोंमुळे बहार आलीये ++ अगदी अगदी..
प्र.चीं साठी जागु आणि साधना चे विशेष आभार...:)

मस्तच लेख सायु. Happy
मला अतिशयच भयंकर वेड आहे पारिजातकाचं. माझ्या आईलाही होतं. तिच्याकडून माझ्याकडे आलंय आनुवंशिकतेने. Happy
माझ्या सासरी घराभोवती खूप मोकळी जागा. पण एकही प्राजक्ताचं झाड नाही.. कळलं तेव्हा हिरमुसलेच मी. नंतर दरवर्षी पावसाळ्यात कोणाकडून मागून आणून फांदी नाहीतर रोप लावायचे. पण उन्हाळ्यात मरुनच जायचं ते. Sad आता दोन वर्षांपूर्वी लावलेलं एक रोप जगलंय मस्तपैकी. 7-8 फुटांच झालंय आता. गेल्यावर्षीपासून फुलायला पण लागलं. पाणी नियमित आणि भरपूर घातलं की वर्षभर फुलं असतात त्याच्यावर. आताही नवा बहर येतोय. रात्री जो काय मंद सुवास पसरतो.. अगदी अप्रतिम.

फुले का पडती शेजारी.. हे तर आहेच. ( माणिक वर्मा, गदीमा, सुधीर फडके.. हे गाणे आकाशवाणी च्या एका संगितीकेसाठि लिहिले गेले होते. )

दुसरेही आहे

अंगणी पारीजात फुलला
बहर तयाला, काय माझिया
प्रितीचा आला...

धुंद मधुर हा गंध पसरला
गमले मजला, मुकुन्द हसला
सहवासातून सदिय मनाचा
कणकण मोहरला

सुवर्णतुला नाटकातले हे पद, जयमाला शिलेदार यांच्या आवाजात आहे
रचना : विद्याधर गोखले, संगीत : छोटा गंधर्व , राग : बिहाग

अश्रुंची झाली फुले .. हे गाजलेले नाटक अनेकांना माहीत असेल. प्रभाकर पणशीकर, डॉ. काशिनाथ घाणेकर आणि सुधा करमरकर यांनी ते
गाजवले होते. त्यातही फुले म्हणजे प्राजक्ताचीच फुले होती. ( याच नाटकावर हिंदी चित्रपट होता, आँसू बन गये फूल.. अशोक कुमार, हेलन वगैरे होते त्यात. ) याच नाटकाचा सिक्वेल पण आला होता, त्याचे नेमके नाव आठवत नाही पण घरात फुलला पारीजात असे काहीसे होते.

काय छान लिहिले आहे!!!
मलाही पारिजात खूप आवडतो. मी माझ्या माहेरी लावला होता, मस्त फुलांचा सडा पडतो Happy

निधी खुप छान शेवटी तुमच्या ही अंगणात पारिजातक बहरला तर... लेख आवडल्या बद्द्ल धन्स..:)
कांपो, सोनाली, माणिक सगळ्यांचेच प्रतिसाद खुप छान . आभार -------/\-------

मलाही पारिजात खूप आवडतो. मी माझ्या माहेरी लावला होता, मस्त फुलांचा सडा पडतो ++ Happy
आमच्याही बागेत आहे पारिजात.. + तुमची बाग पाहिलीये मी, खुप सुंदर बाग आहे..

दिनेश दा, कीत्ती छान गाणी.. आणि गीतकार, संगीतकार, चित्रपट, नाटक, गायक / गायीका एवढच नव्हे तर राग सुद्धा , बापरे कीत्ती माहितीये आणि स्मरण शक्ती दाणगी आहे.. -----/\-------

छानच लिहिलयस सायु...
माझ्याकडे असलेलं झाड माझ्या एकमजली घराच्या कितीतरी वर उंच झालय.. लक्ष फुलं सहज येतात पावसाळ्यात..
गणपतीला स्वस्तिक च्या फुलांबरोबर याचा हार पन चढतो घरी..
पण फार नाजुक असतात ही आणि कोमेजतात पन लवकरच... पण रोजची सकाळ सुगंधी करुन टाकतात हि फुलं..

हा माझा नजराणा..
मोठ्ठ डोगरं आहे बरं.. आणि ती जास्वंदाची फुलं चांगली हातभर मोठी आहे.. हि गणपतीकरिता बनवत असलेल्या हाराची तयारी..
.

टीने तुझा नजराणा सर ऑंखो पर... खुप मस्त, नशिबवान आहेस तु एवढे मोठे झाड तुझ्या अंगणात आहे आणि भरभरुन फुलं देतय...:)
बाकी लेख आवडल्या बद्दल धन्स हं!!

मस्तच लेख....
मला तर पारिजात पाहुन कायम एकच गाणं आठवतं, जे आम्हांला शाळेत असताना पुस्तकात होतं, 'टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले',

अवांतर : आमच्या वर्गात एक प्राजक्ता नावाची मुलगी होती, ती दिसली रे दिसली की आमच्या वर्गातली मुलं हेच गाणं, "टपटप पडती अंगावरती प्रजक्ताची 'मुले'" असं म्हणायची. (अर्थात, मार पण खायचे त्यामुळे) हा लेख वाचला आणि शाळेचे ते दिवस आठवले. Happy

मस्त लेख.
बहरला पारिजात दारी
फुले का पडती शेजारी.___है ते गाणे आहे.

स्वरा, पलक, लिंबु टिंबु, देवकी खुप खुप आभार...
आमच्या वर्गात एक प्राजक्ता नावाची मुलगी होती ++ Happy
मागे मी रस्त्यावर पडलेल्या पारिजातकाच्या सड्याचा फोटो काढला, तो व्हायरल होऊन नावाशिवाय फिरला असो.++ वॉटर मार्क का नाही वापरलास.
बहरला पारिजात दारी
फुले का पडती शेजारी.___है ते गाणे आहे.++ हो हेच ते. Happy

Pages