हा धागा उडवावा

Submitted by .... on 5 April, 2017 - 09:29

हा धागा उडवण्यात यावा ही नम्र विनंती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगातील सर्वात श्रेष्ठ अर्थव्यवस्था : हिंदुस्थान २०५०
https://www.youtube.com/watch?v=RBLNtcDI7qI

२०३० ते २०५० या काळात हिंदुस्थान जी झेप घेणार आहे त्यासाठी २०१४ ते २०२९ पर्यंत आपल्याला कष्ट घ्यावे लागणार आहेत. ही गुंतवणूक आपल्याला भविष्यातील हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करताना दिसेल.

२०३० साली पण काळे नि गोरे यात भेदभाव का? भारतात गोर्‍यांनी कामे केली, भीक मागितली तर जास्त समाधान मिळते का? नि हे गोरे कोण आहेत? ब्रिटिश, अमेरिकन? गोर्‍या रंगाचे लोक इराण, पाकीस्तान सगळीकडे आहेत, ते?
नि गोरे असो की काळे, कुणालाहि भारतात भीक मागावी लागत नाही यात भारताचा जास्त मोठेपणा नाही का?
नि गोरे काम करतात नि भारतीय नाही यात कसला मोठेपणा? काम न करणे म्हणजे सुधारणा असेल तर तशी सुधारणा केंव्हांच झाली आहे भारतात, गेली शतकानुशतके.

अहो झक्की काका, तो कुठल्या तरी साऊथ इंडीयन चित्रपटातला प्रसंग आहे. त्यांच्या अतिशयोक्तीपूर्ण कल्पना तर भारतीयांनाच काय अख्ख्या जगाला स्तिमीत करतात. पण भाजपा वाल्यांनी तो प्रसंग उचलून चित्रपट बनवणाऱ्यांनाच स्तिमीत केले आहे.

घ्या.. आपण तर व्हिजन करण्यातही दळीद्रीपणा करतो.

फक्त रोल-रिवर्स झालं म्हणजे भारत जगात भारी होईल असे वाटणार्‍याच्या व्हिजनची कीव करावीशी वाटते.

कोणत्या का रंगाचे असेना, कस्टमरसाठी भांडणारे टॅक्सी ड्रायवर तेव्हाही असतील? भिकारी असतील, घरात रामूकाका-पार्वतीबाई असतील?

इतकं भिकारी व्हिजन गेल्या दहा हजार वर्षात कोणी पाहिले नसेल...

हे असे विदेशी लोकांना भिकेला लावून भारत देश जगज्जेता होइल असे वाटणे महान आहे....

--------------------------
दुसरे असे की आता साधारण उलटी परिस्थिती असल्याने आताचे असे विदेशात काम करणारे भारतीय भिकारी, दळिद्री वगैरे आहेत असे म्हणणे झाले. हा खरेतर अपमान आहे विदेशातल्या भारतीयांचा. ह्यावर आता एनाराय लोक काय म्हणतात याबद्दल उत्सुकता आहे.

दुसरे असे की आता साधारण उलटी परिस्थिती असल्याने आताचे असे विदेशात काम करणारे भारतीय भिकारी, दळिद्री वगैरे आहेत असे म्हणणे झाले. >>> नानाकळा , त्या व्हिडिओत नसलेले अर्थ कशाला लावताय ? की अशा वाक्यांआडुन स्वतःच्या मनातली भडास काढताय ?

की अशा वाक्यांआडुन स्वतःच्या मनातली भडास काढताय ?

>> माझ्या मनात कसलीही भडास नाही, माझ्या मनात नसलेले अर्थ तुम्ही का लावताय मग श्रीसाहेब?

त्या विडियोतल्या फारेनरांना तसे का दाखवले त्यामागचा कुणाला समजला असेल तर तो अर्थ सांगावा...

व्हिडीओ पूर्ण पाहिला नाही पण नंद्या यांचा पूर्ण प्रतिसादाशी सहमत. प्रगतीची परिसीमा म्हणजे गोर्‍या लोकांना आपल्या देशात आणून कचरा काढायला लावणं किंवा ट्रॉली ढकलायला लावणं हीच दिसतेय. परदेशात ही कामं हलकी समजली जात नाहीत हे कळलं नी समजलं तरी पुष्कळ झालं.

अजून पाहिला नाही पण प्रतिसादांनी उत्सुकता वाढवली आहे.

पण माझे समाधान तेव्हाच होणार जेव्हा एखादा बॉलीवूडचा गोराचिट्टा सुप्पर्रस्टार आपल्या भारतात येणार आणि मुंबई एअरपोर्टवर त्याचे कपडे उतरवले जाणार !

एखादा बॉलीवूडचा गोराचिट्टा सुप्पर्रस्टार आपल्या भारतात येणार आणि मुंबई एअरपोर्टवर त्याचे कपडे उतरवले जाणार ! >>> तु अजुन शाहरुखचेच कपडे उतरवयाच्या मागे आहेस का ? बिचार्‍याचे अमेरिकेत उतरवले जातात आता मुंबईतपण ? Wink

आणि हो, हिण्दी ही जगाच्या व्यवहाराची भाषा व्हायला हवी. जेव्हा ईंग्लंडमध्ये विक्टोरीया चौकातील तिसरया आळीत राहणारया लिटल स्टुअर्ट जॉनला शुद्ध हिण्दी बोलता येणार नाही तेव्हा त्याच्या शाळेतले मित्र त्याला हसले पाहिजेत.

ऋन्मेषने माझा राग घालवल्याबद्दल त्याला २०३० मध्ये फेरारीतून एक राईड देण्याचे आश्वासन या ठिकाणी देतो.

नाना म्हणजे तुम्ही माझ्याकडून फेरारी घेऊन ऋम्याला राईड देणार ? आयजीच्या जीवावर बायजी उदार Biggrin
हवे तर तेव्हा मर्सिडीज घेऊन जा.

सकारात्मक विचार असणे ही एक चांगली गोष्ट आहे...

पण आपला देश महान आहे/किंवा किती प्रगत आहे..हे दाखवण्यासाठी विदेशी(मग ते कुठेल्याही देशातील असो) लोकांना भीक मागताना दाखवण कितंपतं योग्य आहे???

मला वाटलेलं विडिओमधे २०३० साली,
भारत जगाच्या पाठीवर एक प्रगतशील देश बनलेला असेल ,आपल्या देशातील गरिबी नष्ट झालेली असेल्,सर्व सुख -सुविधा खेड्यातींल लोकांपर्यंत पोहोच्लेल्या असतील... हे जातीपाती, धर्म-पंथ अस काहीही नसेल...
पण विडिओ वेगलाच निघाला...आणि हि नक्किच अभिमानाची गोष्ट नाही...

ताई,तुमचे विचार छान आहेत हो आपल्या देशाबद्दल...पण विडिओ काही पटला नाही...

दोनच वर्षात अच्छे दिन कब आयेंगे असं विचारणारांनी साठ वर्षात ते का येऊ शकले नाहीत या प्रश्नाचे उत्तर कधीही दिलेले नाही. >>>> काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल व्हायला हवा का ? (राजकीय)http://www.maayboli.com/node/62041?page=2 ह्याचे उत्तर ह्या विडीयो आणि धागा काढून दिलंय का ? म्हणजे चक्क पार्टी बदलली कि ओ तुम्ही Lol असो... jokes apart

कावेरी ह्यांना अनुमोदन, मलाही अगदी तेच वाटतय कारण -
स्वताला श्रेष्ठ म्हणवून घेताना दुसऱ्याला हीन लेखणे हि आपली भारतीय संस्कृती नाही आणि त्यामुळे सदरचा विडीयो कुछ हजम नही हुआ. आणि २०३० म्हणजे फारच कि पुढे पोहोचलात कि , मग त्याआधी अणुयुद्ध झाले असले ना कि तेपण कॅन्सल झाले? Happy आणि झालेच तर मग ते काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल केल्यामुळे झाले कि कमळामुळे झाले ? हा विडीयो पाहता बहुतेक युद्धानंतर हे गोऱ्यांचे देश असे भिकेस लागले का ? असे वाटले !! ........असो , राजकारणापासून लांब राहून फक्त मनातले बोलू म्हटले तरी ते १००० ची नोट पौंड मध्ये सुट्टे करण्यासाठी वापरायला पुन्हा आली हे पाहून , आपल्या जुन्या लाल पत्ती उगीच जमा केल्या डिसेंबर पूर्वी असे वाटायला लागले आता Happy

तो कुठल्या तरी साऊथ इंडीयन चित्रपटातला प्रसंग आहे. ................भाजपा वाल्यांनी तो प्रसंग उचलून चित्रपट बनवणाऱ्यांनाच स्तिमीत केले आहे.
Lol
थोडक्यात भा़जप नि ट्रंप एकाच शाळेत गेले होते राजकारण शिकायला!! Happy

थोडक्यात भा़जप नि ट्रंप एकाच शाळेत गेले होते राजकारण शिकायला >>>
मोदीजी आणि ट्रंपजींची मी फॅन आहे हे पण साम्यस्थळ आहे ना !

फॅनच आहे म्हंटल्यावर पुढे काय बोलणार?
फॅन लोक वेगळेच. कायदा मोडला म्हणून संजय दत्तला तुरुंगात घातले तर तो सुटावा म्हणून सत्यनारायण घालतात.
तसेच.

आमचे स्पष्ट मत आहे,India has crossed the point of no return.
सगळा क्रीमीलेयर परदेशात गेला/ जात आहे.जे काही थोडे आहेत ते शरीराने देशात मनाने परदेशात आहेत.
राहता राहीले आमच्यासारखे अकल के दुश्मन,त्यांचा तसाही काही उपयोग नव्हता.
आणि मोदी काय जादूगर आहे का?
मोदींचे तीस क्लोन करुन तीस राज्यांमध्ये बसवले तरी विकास होणार नाही,लिहून घ्या.
ज्या देशातल्या हुशार् तरुणांच्या ओठी " यार कब जायेंगे ॲब्रॉड! चे गीत आहे त्या देशाला मोदीच काय कुणीच विकासाच्या मार्गी घेऊन जाऊ शकत नाही.

सगळा क्रीमीलेयर परदेशात गेला/ जात आहे.............................आमच्यासारखे अकल के दुश्मन,त्यांचा तसाही काही उपयोग नव्हता.
I hope you are being very sarcastic.

Pages