मैत्रीची गुढी

Submitted by गवंडी ललिता on 29 March, 2017 - 07:52

मैत्रीची गुढी

मैत्रीची गुढी खूप वर्षांनी उभारली
जुन्या आठवणींची चैत्रपालवी फुटली
माळेत ओवले मैत्रीचे मणी
रंगात आली आज होळी

सुखं दु:खाची करत उधळण
सप्तरंगात केली मैत्रीची साठवण
आठवले मग सारे बालपण
हरवले त्यात माझे मीपण

व्यक्त झाल्या मनातील व्यथा
सांगतात डोळे जीवनाची कथा
अबोलपणात बोलक्या भावना
मनातलं गुपित सांगती सर्वथा

मैत्रीची अवीट गोडी चाखली
मनांत आठवणीची तोरणं बांधली
नव्या वर्षांची नवी पहाट फुलली
मैत्रीची गुढी स्वागताला आली

कडूगोड आठवणीची कडुनिंब झळाळला
आठवणींचा शालू भरजरी शोभला
मैत्रीची गुढी कशी चैत्रात तापली
गडव्यात तिनं मैत्री आपली जपली

मैत्रीची गुढी मनात बसली
पाडव्याची पहाट सोनेरी बनली
खूप वर्षांनी आज गुढी उभारली
आठवणींची चैत्र पहाट बहरली
- ललिता गवंडी,

Group content visibility: 
Use group defaults