Submitted by संजय मेहेंदळे on 27 March, 2017 - 08:50
स्टेशन वर यायचं
गाडी आली गाडीत बसायचं
गाडी सांधे बदलत राहते
आपण बस्स.... जात राहायचं
.
नशिबी काहींच्या
गाडी चुकीची उशिरा उमगायचं
आततायीपणे मग
गाडीतून धावत्या उडी मारायचं
.
नशिबी काहींच्या
स्टेशनवरच गाडीची वाट पाहायचं
नशिबी काहींच्या
गाडीत शेवटच्या स्टेशनची
वाट पाहायचं ….. वाट पाहायचं……
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फक्त प्रवास मणूनच का स्टेशनवर
फक्त प्रवास मणूनच का स्टेशनवर यायचं?
दुसर्यांच्या प्रवासातपण कधीतरी रमायचं...
काहिच कळलं नाही...
काहिच कळलं नाही...
पुढील कवितेसाथी शुभेच्छा!
दुसर्यांच्या प्रवासातपण कधीतरी रमायचं...>>> कशाला रमायचं दुसर्यान्च्या प्रवासात...
काही लोकांना सवय असते स्वतःचाच हेका पुधे नेण्याची...त्यात त्यान्ना आनंद मिळतो...