आठवणींचे पक्षी

Submitted by द्वैत on 23 March, 2017 - 04:14

आठवणींचे पक्षी

जरा विसावून बघता क्षितिजा पक्षी उडती आठवणींचे
अन मिटून घेता डोळे वाटे घडले सारे काल कधीचे

तू इथेच होतीस शांत उभी
मी इथेच होतो शांत उभा
हा इथेच विणवून दमला सागर
समजावून हरली चंद्रप्रभा

मी उगाच होतो जरा शहाणा
तो उगाच केला जुना बहाणा
तू तशीच हसशील खुदकन गाली
छेडताच मी तो तुझा तराना

ते तसेच नव्हते तुझे ते असणे
ते तसेच नव्हते तुझे ते रुसणे
ते उगाच नजरा खाली पाडून
ते उगाच अंतर ठेवून बसणे

मी उगाच स्वप्नांमाघे थकलो
मी कधीच तुला ना समजू शकलो
अन शेवटच्या त्या भेटीला मग
एक शब्द हि साधा बोलू न शकलो

उमजे आता काय निसटले हे बघता पक्षी आठवणींचे
अन मिटून घेता डोळे वाटे हे घडले सारे काल कधीचे

- द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते तसेच नव्हते तुझे ते असणे
ते तसेच नव्हते तुझे ते रुसणे
ते उगाच नजरा खाली पाडून
ते उगाच अंतर ठेवून बसणे
मी उगाच स्वप्नांमाघे थकलो
मी कधीच तुला ना समजू शकलो
अन शेवटच्या त्या भेटीला मग
एक शब्द हि साधा बोलू न शकलो>>> छान... Happy

इतकं हळवं का लिहिलयं.. Sad