सर्व काही तुझेच तर आहे ( तरही )

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 March, 2017 - 23:45

ओळीसाठी बेफिजींचे आभार !

घोकले हेच जन्मभर आहे
सर्व काही तुझेच तर आहे

वादळाला कुण्या जुमाने ना
जे तुझे ह्या मनात घर आहे

मन तिचे गांव एक भोळेसे
भाळले ज्यावरी शहर आहे

अर्थ कळला तुलाच शेराचा
केवढा रेशमी पदर आहे

चल करूया विचार त्याच्यावर
फार साधा विचार जर आहे

मीच असणे सभोवताली पण
मी न दिसणे तुला ...कहर आहे !

हे किती वाजले कळत नाही
केवढा छान हा प्रहर आहे

खोदली एकदा कबर चुकुनी
घालतो तो अजून भर आहे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुन्दर! Happy
धन्यवाद संतोशजी... Happy

छान..
घोकले हेच जन्मभर आहे
सर्व काही तुझेच तर आहे

मीच असणे सभोवताली पण
मी न दिसणे तुला ...कहर आहे !

हे विशेष आवडले.