...................................................................................................................

Submitted by .... on 20 March, 2017 - 11:24

काँग्रेसमुक्त भारत हा नारा दिला तेव्हां अनेकांच्या भिवया उंचावल्या होत्या. पण आदरणिय मोदीजींनी जवळजवळ हे काम करत आणले आहे. भाजप काँग्रेसयुक्त झाली आहे वगैरे वगैरे सगळं मान्य. पण या अशा शे-यांनी काँग्रेस मधे संजीवनी येण्याची चिन्हं दिसत नाहीत. त्यामुळे खालील प्रश्नांचा विचार या धाग्यावर करूयात.

१. देशात काँग्रेसची आवश्यकता आहे का ? असल्यास का ?
२. जर आवश्यकता आहे तर काँग्रेसच्या अधोगतीची कारणे काय ?
३. ही अधोगती थांबवण्याचे उपाय काय आहेत ?

सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी कदाचित यामुळेच नेतृत्वबदलाचा मुद्दा उचलला असावा असे वाटते. काँग्रेसचं सध्याचं नेतृत्व हीच काँग्रेसपुढील समस्या आहे का ? सध्या सोशल मीडीयावर त्यांच्या नावाने अनेक विनोद व्हायरल झालेले दिसतात. काहींनी त्यांना ऑस्ट्रेलियन टीम मधे पाठवल्ञास भारत जिंकेल असे म्हटलेय. काहींनी राहुल गांधींना गोव्यात बिझी ठेवले असते तर काँग्रेसकडे पंजाब आणि उत्तर प्रदेश ही मोठी राज्ये आली असती असे म्हटलेआहे.

हे विनोद जरी असले तरी ते सामान्य माणसाला पटताहेत. राहुल गांधी यांच्याकडे पाहून ते मोदीजींना कसे आव्हान देणार हेच समजत नाही. काँग्रेस असावी असे वाटणा-यांना प्रियंका गांधी यांच्याकडे नेतृत्व जावे असे वाटते. त्याने फरक पडेल का ? कि घराणेशाही बंद करून निष्ठावान नेत्याकडे काँग्रेस पक्षाची धुरा सोपवावी ?

प्रियंका अध्यक्ष झाल्या तर त्यांना विजय मिळवून देण्यासाठी राहुलजींनी सरळ भाजपमधे जावे.
आपल्याला काय वाटते ?

( टीप : कळीचा प्रश्न असल्याने धागा काढावासा वाटला. नेहमीच्या मार्गाने जाऊन प्रशासनाला टाळे लावायची वेळ येऊ नये ही इच्छा आहे. अर्थात तसे झाल्यास प्रशासनाने क्षमा करावी ही विनंती).
तळटीप - टीप हा चर्चेचा विषय नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल व्हायला हवा का ? >> मला नाही वाटत ह्यात काही ऐच्छिकतेचा भाग आहे.
काँग्रेस ला आता लोकल पार्टीज ना सपोर्ट दिल्याशिवाय (मोदींच्या धडाक्यापुढे सपोर्ट घेण्याची वेळ फार लवकर येणार नाही असे वाटते) शिवाय एक हाती भाजपशी लढत देणे अशक्य आहे. जिथे तिथे लोकल पार्टीशी हात मिळवणी केली की त्याच पार्टीचा वरचष्मा राहणार, मायनॉरिटी ईंट्रेस्ट (टेकू) देणार्‍या किंग मेकर्स पुढे स्टेट ते नॅशनल लेवलवर सुद्धा सत्तेसाठी कॉग्रेसने बर्‍यच वेळा दुय्यम भुमिका घेतली आहे. दुसर्‍या पार्टीचे नेते गांधींचे महत्त्व मान्य करणार नाही (मोदी गांधी हा सामना किती एकतर्फी आहे हे सगळ्यानाच दिसले) आणि पर्यायाने कॉग्रेसला सध्या लागलेले रागा ग्रहण फार मेहनत न घेता परस्परच सुटेल.

मला भाजपभक्त म्हणवून घ्यायची हौसही नाही अन काँग्रेसभक्त सुद्धा, तरीही, काँग्रेस बुडत असली तर पीव्ही नरसिंह राव ह्यांचे तळतळाट लागले असावे ह्या पक्षाला,

आधुनिक भारताचे 'डेंग झिओ पिंग' म्हणवले जावेत असले कार्य करणाऱ्या अन त्याही पेक्षा देशाच्या पूर्व पंतप्रधान असलेल्या माणसाचा आब न राखता येणाऱ्या त्याच्याच पक्षाचे काय होणार होते अजून वेगळे? रावांसारखा एक उत्तुंग नेता गेल्यावर त्याच्या कलेवराला सुद्धा काँग्रेस मुख्यालय, अकबर रोड, नवी दिल्ली येथे प्रवेश नाकारणाऱ्या सोनिया गांधींचे ऐकणाऱ्या पक्षाचे अजून काय होणार होते वेगळे? मुळात 'लोकतंत्र खतरे मे है' च्या आरोळ्या देणारी पार्टी स्वतःच किती लोकतांत्रिक आहे? काँग्रेस पक्षाध्यक्षांची आजवरची (स्वातंत्र्यानंतरची) यादी पाहता तसे काही जाणवत नाही

सो होय, काँग्रेसला स्ट्रक्चरल चेंजेसची गरज आहे(च)

अन हो काँग्रेस तगणे गरजेचे आहे, एक सशक्त विरोधीपक्ष कायम असावा ते बरे असते लोकशाहीकरता Happy

एक सशक्त विरोधीपक्ष कायम असावा ते बरे असते लोकशाहीकरता >>> ह्यासाठी कॉंग्रेस हवी. बाकी कुणी नॅशनल लेव्हलवर टिकेल की नाही शंका आहे. गांधी घराण्याच्या कुबड्या लवकरात लवकर सोडून स्वतंत्र अस्तित्व असलेली कॉंग्रेस निर्माण व्हायला हवी. जुन्या जेष्ठ नेत्यांची मुले तयार होत आहेत पण ती एका लिमिटच्या पुढे चमकतच नाहियेत. ती आहे त्यात समाधान मानत असतील तर कठीण आहे. कधीतरी शंका येते की त्यांच्यात पुरेशी राजकीय ambition नाहीये का त्यांची क्षमता/ambition जाणून बुजून योग्य प्रकारे रूपरंग घेवू दिली जात नाहिये?

बाकी कुणी नॅशनल लेव्हलवर टिकेल की नाही शंका आहे.

सहमत!. कोणाचा राजकीय अजेंडा काहीही असला तरी एका फॅक्टला अमान्य केले जाऊ शकत नाही, देश म्हणून चालवायची अक्कल फक्त काँग्रेस अन भाजप ह्यांच्याकडेच आहे फक्त. लालभाई नो नाय नेव्हर अन समाजवादी कायम गोंधळलेले

>>>>> १. देशात काँग्रेसची आवश्यकता आहे का ? असल्यास का ? <<<<
स्वातंत्र्यपूर्व कॉन्ग्रेस परत निर्माण झाली, तर हविच आहे. पण स्वातंत्र्योत्तर काळात कॉन्ग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची गंगोत्री/बजबजपुरी ठरली, जगातिल एकमेव हिंदूभू नष्ट करण्याकडे वाटचाल करु लागली, तेव्हा तिला सत्तेवरुन बाजुला सारण्याचे काम जनतेने केले आहे.
मात्र तरीही, लोकशाहीमध्ये, एकहाती एकपक्षी निरंकुश सत्ता असुच नये, सक्षम विरोधी पक्ष असावा असे असल्याने कॉन्ग्रेस जिवित रहाणे आवश्यक आहे, अन्यथा कॉन्ग्रेस नाहीशी झाल्याने निर्माण झालेली पोकळी, अन्य उपद्रवी प्रादेशिक पक्ष/कम्युनिस्ट-समाजवादी/एमएमआय सारखे पक्ष भरुन काढतील, व ते "लोकशाहीच्या गळ्यालाच नख लागणे" असेल.

>>>> २. जर आवश्यकता आहे तर काँग्रेसच्या अधोगतीची कारणे काय ?
मूलभुत तत्वज्ञान नसणे, वा १९२० च्या आधीच्या मार्गदर्शक तत्वज्ञानाला जाणुनबुजून हरताळ फासणे व जोडीने भ्रष्टाचारासही पाठीशी घालणे, व पराकोटीचा धार्मिक विसंवादास कारण ठरणे ही कॉन्ग्रेसच्या अधोगतिची कारणे आहेत. या हिंदुभूमधिल जनतेशी असलेली नाळ तुटणे हे देखिल एक कारण आहे. एकतर्फी निधर्मी/सर्वधर्मसमभावी अशा आचरट कविकल्पनांच्या मागे गेल्यानेही र्‍हास झालेला आहे.

>>>>> ३. ही अधोगती थांबवण्याचे उपाय काय आहेत ?
नजिकच्या काळात अवघड आहे, कारण आजवर कॉन्ग्रेसमध्ये दुसरी तिसरी फळी निर्माणच झाली नाही वा होऊ दिली गेली नाही, व येथे येणारा जवळपास प्रत्येकजण स्वतःची तुंबडी कशी भरुन घेता येईल याच कारणाने येत असल्याने/आलेला असल्याने नजिकच्या काळात दुसरी/तिसरी फळी निर्माण होईल याची खात्री नाही. सहानुभुतिचे राजकारण करीत सत्तेवर येण्याची सवय कॉन्ग्रेसला नडलेली आहे. अधोगति थांबवायची, तर आधी "पक्ष साफ" केला पाहिजे, होयबा/चाटू लोकांना बाहेरचा रस्ता दाखविला पाहिजे. मुख्य म्हणजे या हिंदभू बाबत कॉन्ग्रेसची धार्मिक/राजकीय मते स्वःच्छ व स्पष्ट स्वरुपात पुन्हा नव्याने मांडली पाहिजेत. तरच कॉन्ग्रेस बाबत लोकांना "आपला पक्ष" असे वाटू शकेल. हिंदवी राष्ट्राबाबत काही एक बोलणे म्हणजे प्रचंड गुन्हा असे जे काही त्यांनी ठरविले आहे, पण त्याचबरोबर, माओ/कम्युनिस्ट ज्यांना लोकशाहीशी काहीएक देणेघेणे नाही अशांशी चुंबाचुंबी करत रहाणे, हा दुटप्पीपणा सोडलाच पाहिजे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे "गांधी-नेहेरु-(ड्युप्लिकेट) गांधी" या नावांच्या संपत चाललेल्या पूर्वपुण्याईचा काडीचाही नसलेला आधार घेणे सोडले पाहिजे.
अर्थात हे होईल्/करेल अशा क्षमतेचा एकही नेता सद्यस्थितीत कॉन्ग्रेसकडे नाही. जे होते, ते बीजेपीकडे वळले आहेत. तेव्हा जर सोनिया/राहुलनीच काही एक मनावर घेतले, तरच कॉन्ग्रेसची धडगत आहे.
असे मला वाटते. माझे मत.

सध्या काँग्रेजची हिंदुस्थानात झालेली अवस्था पाहून असे दिसते की, सोनिया व राहुल गांधी यांना लवकरात लवकर, कॉंग्रेज पक्षाचे देशातून उच्चाटन करुन त्यांच्या मायदेशी इटलीला परतायची सर्वाधिक घाई झालेली दिसते. त्यांच्या दुर्देवाने पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग सारख्या प्रभावी नेत्यामुळे कॉंग्रेजने तिथली निवडणुक जिंकली, व मायलेकाचे त्यांच्या मायदेशी इटलीला परतायची संधी यावेळी तरी त्यांच्या हातून निघून गेली.

'गिनीज बुक'साठी राहुल गांधींच्या नावाचा प्रस्ताव

मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली

उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या दारूण पराभवामुळे आणि सततच्या अपयशामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना, त्यांचं नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'साठी सुचवून एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. '२७ निवडणुका हरलेला नेता' म्हणून राहुल यांचं नाव गिनीज बुकमध्ये नोंदवावं, असा प्रस्ताव या विद्यार्थ्यानं दिला आहे. विशाल दिवाण असं त्याचं नाव असून तो मध्य प्रदेशातील होशंगाबादचा आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात कॉन्ग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची गंगोत्री/बजबजपुरी ठरली, जगातिल एकमेव हिंदूभू नष्ट करण्याकडे वाटचाल करु लागली, तेव्हा तिला सत्तेवरुन बाजुला सारण्याचे काम जनतेने केले आहे.

................................

त्याच काँग्रेसवाल्याना भाजपाने आपल्या पक्षात घेतले आहे.

हिंदवी राज्य जनतेला हवे आहे , तर वाजपेयीना जनतेने घरी का घालवले ?

काँग्रेस अँटी हिंदू आहे असे चित्र रंगवून राम मंदिराचा मुद्दा घुसडुन भाजपेयीने सत्ता मिळवली अन सत्ता आली तरी आम्ही पूर्ण बहुमतात नाही हे रडगाणे गावुन मंदिर बांधायचे टाळले.

त्यानंतर तर तो मुद्दाच भाजपाच्या अजेंड्यावरुन गेला ना ?

आणि आता पूर्ण बहुमतात येउन परिधानमंत्री बोलतात मंदिर नको , संडास बांधा , म्युजियम बांधा.

अन आगपाखड मात्र काँग्रेसवर !

काँग्रेसच्या अजेंड्यावर रामंदिर नव्हतेच तरी जनता त्याना निवडुन देत होतीच. त्यामुळे त्यानी मंदिर बांधायचा प्रश्नच येत नाही.

भाजपाच्या अजेंड्यावर राम मंदिराचा मुद्दा मायावी मारिचासारखा कधी दिसतो , तर कधी नसतो .

Proud

{{{ एक सशक्त विरोधीपक्ष कायम असावा ते बरे असते लोकशाहीकरता }}}

विरोधी पक्षाला रस्त्यावर उतरुन आंदोलने करावी लागतात. ह्याकरिता काँग्रेसपेक्षा डावे बरे. शिवाय त्यांच्याकडे तत्त्वनिष्ठ, कडव्या कार्यकर्त्यांची फौज आहे. साधी राहणी, भ्रष्टाचारापासून दूर असलेले नेते या काही त्यांच्या जमेच्या बाजू पाहता डाव्यांकडून जनतेने अपेक्षा ठेवायला हरकत नसावी.

>>>> या काही त्यांच्या जमेच्या बाजू पाहता डाव्यांकडून जनतेने अपेक्षा ठेवायला हरकत नसावी. <<<< Lol
ते ठीक आहे हो, पण जिथे तिथे संप/हरताळ्/वर्गविद्रोह/नक्षलवाद्/अत्याचार्/हुकुमशाही/धर्मद्वेष्टेपणा या याच नाण्याच्या त्यांच्याच दुसर्‍या बाजु जनतेपासुन ते "लपविणार कसे", यावर ते उभारतात वा नाही हे ठरेल.

शिवाय त्यांच्याकडे तत्त्वनिष्ठ, कडव्या कार्यकर्त्यांची फौज आहे <<< हो केरळ मधे ती "डाव्यांची फौज" फार चांगले काम करत आहेत असे बोलतात लोक Wink

२०१९ ला देखील मोदीच परत येणार! त्यामुळे डोक्याला जास्त ताण घेऊ नका.
आता २०२४ चा विचार करता ७ वर्षे शिल्लक. या काळात पुन्हा देशव्यापी पक्ष कसे बनता येईल हे काँग्रेसने बघायला हवे. परिस्थिती जितकी वाईट दर्शवली जातेय तितकी वाईट नक्कीच नाही. तळागाळात पसरलेला पक्ष आहे हा. जर पुन्हा धग आली आणि जोडाजोडीला सुरुवात केली तर उडून गेलेले कावळे पुन्हा आपल्या मूळ फांदीवर यायला वेळ लागणार नाही.

बाकी पुण्याने धोनीला कर्णधारपदावरून सहजतेने काढून टाकले पण काँग्रेसला हे जमत नाहीये म्हणजे ................. वाक्य पुर्ण करा!

"काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल व्हायला हवा का ? (राजकीय)" नावाच्या धाग्यावर तरी कॉंग्रेसबद्दल बोला..... तिथेपण मोदींनी यॅंव केले आणि भाजपाने त्यांव केले कशाला?

त्या शेन वॉर्नला जसा स्वप्नात पण आपला तेंडल्या दिसायचा तसे तुमचे झालेय बहुतेक.... जळी स्थळी काष्ठी पाषाणी.... मोदी मोदी मोदी! Proud

स्वरुप
भाजपने किंवा मोदीजींनी ( जे योग्य असेल ते) काँग्रेसमुक्त भारत असा नारा दिलेला होता. तुमच्या न्यायाने त्यांना काँग्रेसचं नाव घ्यायचं कारण नव्हतं. या धाग्याची सुरूवात याच वाक्याने झालेली आहे. कारण ते सत्यात आले म्हणून हा उल्लेख अटाळणिय होता.

बाकीच्या चर्चेत तरी अद्याप काँग्रेस संपली तरी चालेल असा सूर दिसलेला नाही. काँग्रेस पक्ष हवाच असेच म्हणताहेत सगळे. पण प्रत्येकाचे कारण वेगवेगळे आहे. नेतृवाबाबत कुणी समाधानी नाही असे वाटतेय.

देशाला चांगले काम करणार्‍यांची गरज आहे. पक्षांची लेबलं फार फसवी आहेत हे एव्हाना पुरेसं स्पष्ट झालेलं आहे.

जशी क्रिकेटमध्ये ड्रीम टीम असते तसे सर्व भारतातले सर्व चांगले, काम करणारे नेते एकत्र घेऊन एक पक्ष स्थापन करावा. किंवा कोनत्याही पक्षाचे सरकार आले तरी त्याने अशा सगळ्या पक्षातल्या चांगल्या नेत्यांना मंत्रिमंडळात नेमून कामे द्यावीत. अर्थात देशाचा विकास हवा असेल तर

"काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल व्हायला हवा का ? (राजकीय)" > होय. लिंबुटींबु ह्यांनी वर लिहिलेल्या प्रतिसादाशी मी सहमत आहे. लोकशाही मधे सशक्त विरोधी पक्ष हवाच आणि सद्ध्यातरी काँग्रेस हा एकच असा पक्ष आहे जो देशव्यापी विरोधी पक्ष होऊ शकतो. पक्षाची सद्ध्याची स्थिती बघता तसे वाटणे अवघड होत चालले आहे. पण भाजपा (खरतर मोदी कारण आता मोदी भाजपा "ब्रँड" पेक्षा मोठे झाले आहेत) ला पर्याय म्हणून उभे रहायचे असल्यास काँग्रेस ला खालील गोष्टी कराव्याच लागतील -
१. मोदी विरोध हा एककलमी कार्यक्रम बदलणे. एक पक्ष म्हणून आपण काय करु शकतो / करु ईच्छितो हे जनते पुढे नीट मांडायला हवे. रोज उठुन मोदींना शिव्या / दुष्णे देणे ह्यातुन काहिच साध्य होत नाही आहे वर मोदी ह्यांच्याकडे लक्षही न देता काम करून दाखवत आहेत. तसे करण्यासाठी नेतृत्वबदल गरजेचा आहे कारण राहुल गांधी फक्त विरोधच करताना दिसतात (त्यांच्या आजुबाजुच्या लोकांचीही वेगळी पद्धत नाही)
२. भूतकाळात झालेल्या चुका मान्य करून पुढे काय बदल करण्यात येतील हे जनतेला सांगणे - भ्रष्टाचार ह्या एका गोष्टीने काँग्रेसला २०१४ मधे बुडवले. भविष्यात संधी मिळाल्यास तसे परत का होणार नाही हे सांगायची गरज आहे. केजरीवाल नी सुद्धा (हे माझे सद्ध्याच्या राजकिय नेत्यांमधले नीचतम मापक आहे.. सगळ्या वाईटातला वाईट कोण असेल तर केजरीवाल असे मी मानतो).. तर केजरीवाल नी सुद्धा दिल्ली तल्या पहिल्या निवडणूकि नंतर उगाच अती झेप घेण्याचा प्रयत्न केल्याचे जनतेपुढे मान्य केले, मग काँग्रेस ला नक्कि जमेल.
३. घराण्यापेक्षा कामाला महत्व - ह्या एका मुद्द्यावर मोदींनी एकहाती कॉग्रेसचे धिंडवडे काढले आहेत. आणि ते खरेही आहेत. आज भारतातला मतदार सुशिक्षित आणि सुजाण आहे. "जनता भूलथापांना फसली", "भाजपाने खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली" असले विधाने करून तुम्ही जनतेला तोंडावर मुर्ख म्हणत आहात हे लक्षात घ्या. त्यांना ते आवडत नाही. मतदाराला काम करणारा नेता हवा आहे जो त्याला मुलभूत गरजांसाठी वणवण करायला लावणार नाही. आणि त्याच्यासाठी नेता जोखायचा एकमेव उपाय म्हणजे केलेले काम! (जे मोदींनी गुजरात मधे करून दाखवले). इंदिरा आणि राजीव गांधी जाऊन अनेक वर्षे झाली. आज मतं देणार्‍यातल्या बहुतांश लोकांनी त्यांना कधी बघितलेही नाही त्यामुळे त्यांना त्या नावांमुळे काहीही फरक पडत नाही.
४. संसदेत काम करावे - भाजपा विरोधात असताना हेच करायचे आता त्यांना दाखवून देऊ हे रा गांचे धोरण माझ्यासारख्या जनतेला पटत नाही. (भाजपा नी जेव्हा ते केले तेव्हाही ते चुकिचेच होते). सतत काम काज बंद पाडणे हे विरोधी पक्षाचे काम नाही. त्यापेक्षा सरकार च्या धोरणां मधील चुका दाखवून दिल्या आणि चांगले पर्याय लोकांसमोर ठेवले तर जास्त बरे होईल. फुकट अनुकतमुक काहीतरी म्हणाला सारख्या बालिश कारणांवरून संसद बंद झाल्याचे पाहिले कि लोकांना विरोधी पक्षाचीच चुक दिसते आणि "हे लोक सुधारणा होऊ देत नाहीत" असे मत दृढ होत जाते आहे. सरकारच्या चांगल्या कामांना चांगले म्हणावे आणि दोन चार दिवसांनंतर त्याच मुद्द्यावर शिव्या देऊ नयेत. देशाला उपयोगी एखाद्या उपक्रमात (जसे स्वच्छ भारत) सरकार च्या बरोबरीने काम केल्यास लोकांमधील "हे नुसता विरोधासठी विरोध करतात" ही इमेज सुधारेल.

या धाग्याचा व सदस्यांचा मला नेम्का उद्देश समजेना झालाय ... वाग मेला की मुद्दाम डिवचुन डिवचुन खात्री करतात तसे वाटत आहे

घराण्यापेक्षा कामाला महत्व -

हाही फसवा मुद्दा आहे. Proud

सेनावाले बाळासाहेब पुर्वी काँग्रेसचा घराणेशाहीला शिव्या द्यायचे... आताचे सेनावाले त्या विषयावर बोलत नाहीत.
भाजपात घराणेशाही नाही , कार्ण भाजपाला देर्घकाळ सत्ता मिळालेलीच नाही. जर भाजपा सलग वीस वर्शे टिकले तर तेंव्हा वीस वर्शानी समजेल ते लोक घराणेशाई करतात की नाही ते !

इक्ष्वाकु , भरत , यदुवंश , मोघल , भोसले .... सगळी घराणीच होती...

इक्ष्वाकु , भरत , यदुवंश , मोघल , भोसले ... >> तैमुर, आता तुम्ही कुणाचेही आजोबा/ आजी, आई/बाबा, तो किंवा ती, त्यांची पोरं, नातवंड ही पण घराणी आहेत असं म्हणणार वाटलं Proud . राजे आणि लोकशाहीत काहीतरी फरक करणार की नाही? वीस वर्षानी काय होईल त्यावर वीस वर्षांनी टीका करा ना! आजच काय होईल ते अझ्युम करून कसली टीका करताय?

ड्रीम टीम ... नावातच आले

>> ऋन्मेष.... ड्रीम नाहिये भावा हे आता... टीम तयार होत आहेतच. महाराष्ट्रातल्या जिल्हापरिषदेच्या युत्या बघा.... भाजपात आयाराम किती आलेत ते बघा... निवडणुकांना शष्प किंमत राहिली नाही.

>>वीस वर्षानी काय होईल त्यावर वीस वर्षांनी टीका करा ना! आजच काय होईल ते अझ्युम करून कसली टीका करताय?>> पण मग आत्ता वेळ कसा घालवायचा? हातात काय जपमाळ घेऊन हरी हरी करायचंय? Wink

१. देशात काँग्रेसची आवश्यकता आहे का ? असल्यास का ?
>> धार्मिकतेला महत्व देणाऱ्या शक्तींच्या राजकारणातील सक्रियतेमुळे अनेक देशांत यादवी निर्माण होऊन शेवटी हाहाकार माजला आहे. धार्मिक शक्तींना हाताशी धरून त्यांना शस्त्रास्त्रांचे वाटप करून धार्मिकतेच्या अधीन गेलेल्या देशात संहार घडवून शेवटी विकलांग अवस्थेत तो आपल्या वळचणीला आणायचे उद्योग महासत्तांनी केल्याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. धार्मिक यादवीची परिणीती अतिशय भयान आणि रक्त गोठवणारी असते. "इथे मात्र तसे होणार नाही", "आमचा धर्म तसा नाही" असले युक्तिवाद बालिश आणि मूर्खपणाचे आहेत. प्रगत देशांनी राजकारणात धार्मिकतेचा मुद्दा कधीचाच सोडून दिला आहे. त्यामुळे पुढील विचार करता या देशात कॉंग्रेसच असे नाही पण कोणत्याही धर्माला महत्व न देणारी विचारधारा असणारा पक्ष प्रबळ होणे नितांत गरज आहे. किंबहुना धार्मिक अधिष्ठान असलेल्या सर्वच संघटना व पक्ष यांच्यावर बंदी येणे अत्यावश्यक आहे.

२. जर आवश्यकता आहे तर काँग्रेसच्या अधोगतीची कारणे काय ?
>> पराभव म्हणजे नेहमीच अधोगती नसते. आणि विजय म्हणजे नेहमीच प्रगती नसते. पराभव हा अल्पविराम, आणि खोट्यानाट्या मार्गाने व इतरांना छोटे दाखवून मिळालेला विजय हि तात्पुरती सूज असू शकते. तब्बल सत्तर वर्षे कॉंग्रेस अस्तित्वात आहे आणि इतक्या काळात सध्यापेक्षाही खूप वाईट दिवस या पक्षाने पाहिलेले आहेत. माध्यमांना हाताशी धरून सत्तापिपासू धर्मांध वृत्तींनी सातत्याने केलेला अपप्रचार, भ्रष्टाचाराचे आरोप, षड्यंत्र रचून वेळोवेळी केलेली नेत्यांची बदनामी व त्यास फसलेली जनता, नेत्यांच्या अकाली हत्या वा मृत्यू इत्यादी बाह्य कारणे. तसेच पक्षांतर्गत एकीचा अभाव, ढासळत गेलेले नेतृत्व, स्थानिक प्रस्थापितांची मुजोरी, ढिली होत गेलेली संघटना बांधणी, स्थानिक पातळीवर नवीन कार्यकर्त्यांना/नेतृत्वाना हेरून संधी न देणे, बिनीच्या शिलेदारांना बढती न देणे इत्यादी अंतर्गत कारणे कॉंग्रेसच्या पराभवामागे आहेत असे माझे मत आहे.

३. ही अधोगती थांबवण्याचे उपाय काय आहेत ?
>> उपाय अर्थातच वरती दिलेल्या कारणांमध्येच दडले आहेत. धार्मिकतेला राजकारणातून तिलांजली देऊन कोणताही देव धर्म न मानणाऱ्या समविचारी लोकांनी एकत्र येणे हि काळाची गरज आहे. कारण प्रगतीचा तोच एक मार्ग आहे. भारतात धार्मिक लोकांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे असा एक सर्वे मध्यंतरी पाहण्यात आला होता (गुगल करा अजूनही सापडेल). धर्माविषयी जे घनघोर अज्ञान समाजात आहे त्याचा निचरा होणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागरण आवश्यक आहे. मुळात हिंदू हा धर्म आहे का? धर्माच्या व्याख्येत तो बसतो का? कि तो केवळ संस्कृतीवाचक शब्द आहे? सरसकट सर्वच मुस्लिमांविषयी जी नकारात्मकता निर्माण केली गेली आहे ती योग्य आहे का? कि जे दहशतवादी आहेत (मग ते कोणत्याही धर्माचे असोत) फक्त त्यांच्या विषयी भीती नकारात्मकता निर्माण व्हायला हवी? याविषयी लोकांना विचार करायला उद्युक्त करणे आवश्यक आहे. हे काम अर्थात इतके सोपे नाही. पण एकदा ते झाले कि काहीही काम न करता केवळ धार्मिक आधार घेऊन "अच्छे दिन आयेंगे" म्हणत छद्मीपणाने हसणाऱ्या भामट्यांच्या शिड्या आपसूकच गळून पडतील. त्याच बरोबर गेल्या काही वर्षात कॉंग्रेसच्या नेत्यांची नाहक जी बदनामी झाली आहे तिला तोडीस तोड व पुराव्यासहित उत्तरे देणाऱ्या पोष्ट्स आणि ब्लोग्स तयार करून त्याचा सोशल साइट्स वरून व्यापक प्रसार आवश्यक आहे. प्रसंगी ह्या बदनामी करणाऱ्या खोडसाळ पोष्ट्स कुणी बनवल्या त्यांची गचांडी पकडून त्यांच्यावर मानहानीचे खटले दाखल करणे पण आवश्यक आहे. अर्थात हे सगळे ड्राईव्ह करण्यासाठी लागणारी खूप उर्जा बाळगणारे प्रभावी नेतृत्व आवश्यक आहे. दुर्दैवाने तसे नेतृत्व सध्या कॉंग्रेसकडे तरी नाही. पण धर्मांधांचा भावी धोका लक्षात घेता इतर सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन त्यातून असे नेतृत्व निर्माण होते का याची चाचपणी पण आवश्यक आहे. पण तसे होणे कितपत शक्य आहे हे येणारा काळच सांगेल.

शेवटी:
काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल व्हायला हवा का ? असा प्रश्न विचारण्यापेक्षा भाजप मध्ये नेतृत्व बदल व्हायला हवा का? हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. आणि त्याचे उत्तर हो असे आहे. धर्मांधतेला महत्व देणारा आणि खोट्यानाट्या गोष्टी जनतेच्या मनावर बिंबवून राज्य करणारा नेता देशाला कोणत्या खाईत घेऊन जातो हे जर्मनी व इतर अनेक देशांनी पूर्वी अनुभवले आहे. म्हणून असे पाताळयंत्री नेतृत्व आपल्या देशासाठी अत्यंत घातक आहे व भावी पिढ्यांच्या कल्याणाकरता ते कायमचे हटवणे नितांत गरज आहे.

Pages