साडी

Submitted by मिता on 20 March, 2017 - 02:59

सं पाहिलं तर साडी हा प्रत्येक मुलीचा जिवाभावाचा विषय ... का कुणास ठाऊक पण साडी म्हणलं कि आपुलकी वाटते ... त्यात साडीचे असंख्य प्रकार .. प्रांतानुसार ती नेसायची पद्धत वेगळी ... हौसेखातर मुली प्रत्येक प्रकार नेसून बघतात.. अन प्रत्येक ती खूप खुलून येते .. प्रत्येक प्रकार स्वतःच अस्तित्व घेऊन आलाय .. महाराष्ट्रात लोप पावत चाललेली नऊवारी आज काल मुली खूप हौसेनं आणि कौतुकाने नेसतात .. आपल्या आजी सोबत तिचं अस्तित्व संपतं कि काय असं वाटत असताना तिला नवीन पालवी फुटली ..

मी हि लहानपणापासून आईच्या साड्या आई नसताना हळूच नेसून पाहायची... आजीला पाहून पाहून नऊवारी पण नेसायला शिकले होते.. मला खूप छान वाटायचं नेसल्यावर.. काहीतरी विलक्षण वाटायचं.. माझ्या एका भाचीला पण साड्याची खूप आवड असावी, कारण इटुकली पिटुकलू असल्यापासून माझी ओढणी साडीसारखी गुंडाळून फिरायची .. नेहमी माझ्याकडं 'आत्तू तुमची हि ओढणी द्या , तर कधी ती ओढणी द्या' करत यायची... साडीचं एवढं विलक्षण वेड असताना देखील वयाची पंचविशी ओलांडली तरी माझी स्वतःची हक्काची साडी काही मला अजून मिळाली नव्हती.. कुणा - कुणाच्या मागून साड्या नेसणं एवढंच .. आणि कधी कधी तसं मागणं पण जीवावर यायचं म्हणून मन मारून तो विषयच टाळून द्यायचे ... कुणी विचारलं तर आवडत नाही म्हणून मोकळी व्हायची मी...
पण का कुणास ठाऊक सगळ्या पोषाखातल्या प्रकारामध्ये साडीवरच माझा विशेष जीव.. कधी एकदा आयुष्यात स्वतःची अशी साडी घेतेय असं वाटायचं..
हुश्श्श!!!.. आला बाबा एकदास निमित्त... आयुष्यात मला माझी पहिली साडी मिळण्याचा दिवस उजाडला होता...
......
मी खूप खुश असायला हवं होत.. खूप जास्त.. पण तसं काहीच झालं नाही.. मी कोरड्या मनाने साडी आणायला गेले होते... रंगांची पारख आहे, पण मनातले रंग काळाने त्याआधीच हिरावून घेतले..
तो दिवस उजाडला होता, माझ्या हक्काच्या साडीचा.. पण आज ती साडी हक्काची वाटत नव्हती.. या शाश्वत नसलेल्या जगात ते कापड मला भुरळ पाडण्यास असमर्थ ठरलं.. स्वतः फिरत्या कलरमध्ये नाहून पण माझ्यावर त्या रंगाची उधळण तिला करता आली नाही...

माझी जिवाभावाची साडी मला माझं भौतिक सुख देण्यास पण कमी पडली होती.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललित चांगले आहे, पण खूप मोठा भाग वाचकांनी इंटरप्रीत करायला सोडून दिलाय असे वाटते, त्यामुळे अचानक संपल्या सारखे वाटते.
काय घटना घडली आणि तिच्या भावना कोरड्या झाल्या याची थोडी हिंट तरी दिली पाहिजे होतीत
शुभेच्छा,

आयुष्यात नेहमीच सगळं मिळत नाही ना?

तेव्हा गमावलेलं मागे सोडून... नवीन कमवल्याचा आनंद स्वीकारा...

आयुष्यात नेहमीच सगळं मिळत नाही ना?
तेव्हा गमावलेलं मागे सोडून... नवीन कमवल्याचा आनंद स्वीकारा...>>> +१

छान लिहिलयं....अजून भाग होउ शकतात..