बालमानस आणि मेंदूशास्त्र ( मुले आणि आपण भाग २)

Submitted by द स्मिता on 18 March, 2017 - 06:54

मुले आणि आपण भाग २
बालमानस आणि मेंदूशास्त्र

आता बालमानसाच्या अनुषंगाने पुढील भाग लिहिला आहे. बालमानस आणि मेंदूशास्त्र यांच्या अनुषंगाने हा भाग लिहिलाय. अर्थात मी मानसशास्त्राची अभ्यासक नाही. काही वाचनात आलेल्या गोष्टी यावरच हा भाग आधारित आहे.
मुल आणि आपण यामधे अगदी मुलाच्या जन्मापासुनच विचार करयला हवा . मुल जन्माला घालणे म्हणजे आपल्या जीवनशैलीत बदल करणे. काही गोष्टी आवर्जुन करणे आणि काही गोष्टी टाळ्णे. रचनावाद काय सांगतो मुले स्वत:च्या ज्ञानाची रचना स्वत:च करत असतात. मुलांच्या मेंदूमध्ये जन्मत:च न्युरॉन्स असतात. जन्मल्या वर हळूहळू मुले पंचेंद्रियां मार्फत शिकत असतात.
त्वचेने स्पर्श अनुभवणे , डोळ्यानी बघणे, जीभेने चव घेणे कानाने आवाज ऐकणे, नाकाने वास घेणे, या क्रियाकडुन प्रत्येक वेळी मुलाला नवीन ज्ञान मिळते. प्रत्येक नवीन माहिती न्युरॉन्स मेंदूकडे पोहोचवतो. आणि एक न्युरॉन् ती माहिती दुसर्‍या न्युरॉन्स कडे पोहोचवतो. असे न्युरॉन्सच्याच्या जोडणीतून सिनॅप्स तयार होतात. पंचेंद्रियामार्फत आलेला प्रत्येक अनुभव मेंदूत साठवला जातो. कसा तर जन्मत: मेंदूमध्ये न्यूरॉन्स असतात हे आपण पाहिले. नवीन माहिती मेंदूकडे आली की हे न्युरॉन्स कार्यरत होतात म्हणजे काय तर त्यांच्यात एक प्रकारची विद्युत रासायनिक प्रक्रिया घडते. न्युरॉन्स ही नवी माहिती घेऊन दुसर्‍या पेशीकडे जाता त्याच्यात माहितीची देवाण घेवाण होते. या देवाणघेवाणीमध्ये या या दोन न्युरॉन्स मध्ये बंध तयार होतो. या बंधाला सिनॅप्स म्हणतात . असा सिनॅप्स तयार झाला की शिकण्याची प्रक्रिया झाली. थोडक्यात काय बाळाच्या मेंदूत असे सिनॅप्स सतत तयार हातात .या सिनॅप्समुळे बाळ नवनवीन गोष्ती शिकते. असे माझ्या वाचनात आले आहे .
साधे भाषेचे उदाहरण घेऊ. मुल शब्द कसे शिकते . कानावर जे शब्द पडतात ते मेंदू पर्यंत पोहोचवले जातात. ते शब्द मेंदूतील वार्निक क्षेत्र समजावुन घेते, त्या शब्दाचे प्रथम आकलन करून घेतले जाते आणि मग तो शब्द ब्रोका केंद्राकडे जातो, तिथे तो कृतीशील होतो म्हणजे काय तर तसे ध्वनी काढण्याचा प्रयत्न बाळ करते. चॉम्स्की म्हणतो ज्या भाषेचे अनुभव मुलाना उपलब्ध होतात त्या भाषा मूल सहजतेने बोलू शकते.
मुल जन्मल्या पासुन साधारण दोन वर्षापर्यंत ,ज्याला मेंदू बांधणीचा काळ म्हणतात . तेव्हा न्युरॉन्सची जोडणी वेगात होत असते. तेव्हा अनेक गोष्टी मुल शिकत असते. पहिल्या दोन वर्षात मुलांचा शिकण्याचा वेग प्रचंड असतो. मूल स्वत;हून शिकते हे खरेच आहे. पण त्या शिकण्याला दिशा देण्याचे काम मात्र आपण करू शकतो.. मी काय करते किवा करतो तर मुल जे स्वत:हून शिकते त्याला योग्य दिशा देऊ शकते.
काय करावे लहान वयात तर जाणिवपूर्वक मुलांना संगीत ऐकवावे, प्राणी पक्षाचे आवाज , एखादे वाद्य संगीत, तालासुरातील गाणी, मुख्यतः साधे नैसर्गिक आवाज त्यांचा कानावर पडावे हे आपण आवर्जून करायला हवे.
आपण शब्द शिकणे, भाषा येणे हे कसे घडते ते पाहिले. मग यात आपली जबाबदारी काय? तर मुलाला काय ऐकवाव ही जबाबदारी आपली. आपण काय बोलु तेच मुल बोलणार आहे हे लक्षात ठेवून त्याच्या कानावर चांगले शब्द पडावे ही जबाबदारी आपली. चांगल्या शब्दांबरोबर वाईट शब्द , अपशब्द, नको त्या जाहिराती मुलांच्या कानावर न पडलेल्या बऱ्या इतके आपण करू शकतो. मोबाईलचे कर्कश रिंग टोन कानावर पडण्यापेक्षा चांगले संगीत, वाद्यसंगीत , लयदार गाणी त्यांच्या कानावर पडणे जास्त चांगले. इतर भाषाही मुद्दामहून त्यांच्या कानावर पडाव्या अशी योजना करावी. म्हणजे काय तर आपण घरात एक भाषा बोलतो, ता पेक्षा वेगळी भाषा येनार्‍ए नातेवाईक, शेजारी यांना मुलांना त्यांच्यावेगळ्या भाषेत बोला असे सांगावे.. कारण या वयात भाषा शिक्षणाचा वेग अधिक असतो . पहिल्या काही वर्षात मुलांच्या विकासासाठी प्रयत्न केले तर मुलांचा बौद्धिक विकास चांगला घडून येईल. बौद्धिक विकास तर होईलच पण भावनिक विकासही होईल. भावनिक दृष्ट्या मुले स्थिर होतील.
मुलांना मुद्दामहून नवनवीन गंमत गाणी ऐकवावी, नवीन खेळ शिकवावे, गोष्टी सांगाव्या , निसर्गाशी जास्तीत जास्त ओळख करून द्यावी जसे चांदोमामा, सुर्य, फुलपाखरू , झाडे , फुले दाखवणे.मुलांना खेळायला घेऊन बाहेर जावे. अधिकाधिक माणसांशी त्या बाळाचा परिचय होईल, संवाद घडेल हे ही कटाक्षाने बघावयास हवे. मुलांना टीव्ही वरील गोष्टी दाखवण्या पेक्षा आपण वेळ काढून त्यांना गोष्टी ऐकवायला हव्यात. मुलांना कौतुकाने स्पर्श करणे, त्याच्याशी बोलणे, त्यांना गाणी ऐकवणे या गोष्टी अगदी आवर्जून करायलाच हव्या.
पाऊस दाखवणे अनुभवायला नेणे, फुले माती दगड यांना स्पर्श करू देणे, झाडावरची फळे फुले, मावू , भूभू त्यांना ओळख करून द्यावी. मुलांचे शिकणे ही प्रक्रिया सतत चालू असते. आपण मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी लागते. मुलांची आनुवंशिकता, कुटुंब व परिसर या गोष्टींवर त्यांची जडणघडण होते. घरातल्या माणसांचे ते सतत निरीक्षण करत असतात आणि मग स्वतः तसे वागण्याचा प्रयत्न करतात.
सतत का? आणि काय हे प्रश्न त्यांच्या मनात रुंजी घालत असतात. प्रत्येक छोट्या गोष्टीचा अनुभव त्यांच्या साठी महत्वाचा असतो. कारण ही माहिती म्हणजे त्यांच्या constructive रचनेचा पाया असतो त्यावर मग इतर माहितीचे मजले चढत असतात. आपण त्यांना कृती शिकवण्यास मदत करावी . त्यामुळे हे मी केले ही भावना असतेच पण त्यांचातला जो स्व असतो तो ही वाढीस लागतो. मुलांना सतत प्रश्न पडत असतात, त्यांच्या प्रश्नांचे कुतूहलाचे निरसन , प्रश्नाची उत्तरे आपण त्यांना द्यायला हवी. मूल मोठं होत असताना आपला त्यांच्याशी सतत संवाद घडायला हवा. कारण आपल्या प्रश्नांची उत्तरे पालक देतात आणि ते सांगतात ते बरोबर असते अशी सवय मुलांना लागेल. मग हाच संवादाचा सेतू पौगंडावस्थेतही फार उपयोगाचा ठरतो कारण त्या अनघड अवस्थेत मुलांशी जास्तीत जास्त बोलायला हवे, त्यांना समजावून घेणे आवश्यक असते.
प्रथमतः: मुलांना प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा असतो. तो घेऊ द्यावा. हे करू नको ते करू नको म्हणून त्याला सतत अडवू नये . त्यामुळे एक नकारात्मक भावना वाढीस लागते. त्या ऐवजी अनुभव घेऊ द्यावा. आणि मग त्याचे फायदे तोटे त्याला समजावून सांगावे. त्यातील धोक्याची जाणिव करून द्यावी,. अनुभव घेतला की मुलांना आपोआप त्या सांगितलेल्या गोष्टी पटू लागतात.
दुसरी गोष्ट मुळांच्या हट्टाची व त्यांना केलेल्या शिक्षेची.
आपल्या इच्छा पूर्णं करून घेण्यासाठी मुले हट्ट करतात. परंतू त्यांचा प्रत्येक हट्ट पूर्णं करणे हे त्यावरचे उत्तर नाही. मुलांचे सगळे म्हणणे मान्य करणे हेच मूळी त्याचा विकासाच्या दृष्टीने घातकच. त्यामुळे मुलांना समजावून सांगावे. होकार आणि नकार या दोन गोष्टी असतात हे त्यांना समजायला हवे. त्यांच्या हट्टाला कधी युक्तीने, कधी खरे खरे कारण सांगून, युक्तीच्या गोष्टी रचून समजावून सांगावे.
हळू हळू मुले ही समजायला लागतात.शिक्षा करणे हा मार्ग शक्यतो टाळावा शिक्षेने मुलांच्या मनात एक प्रकारची नकारात्मकता पोहोचते. त्यांच्या सन्मानाला धक्का पोहोचतो. शारिरीक इजा दिसली नाही तरी मानसिक इजा पोहोचते. मुलांचा वागण्यातून ती जाणवते. तेव्हा समजावून सांगणे हा पर्याय आहे. शिक्षा ही मुलांच्या आत्मविश्वासाला लागलेले ठेच आहे तसाच हट्ट करणे हा अडथळा आहे. आपण नाजुकपणे अडथळा दूर करायला हवाच आणि ठेच लागून नये म्हणून जपावयास हवे.
मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते ती सकारात्मक गोष्टीत कामी आली पाहिजे यावर आपला कटाक्ष हवा. जसे खेळ खेळणे, काही कामे त्यांना आवडतील अशी जसे झाडांना पाणी घालणे, आपले चप्पल बूट व्यवस्थित ठेवणे अशी अनेक कामे करू द्यावीत. चित्रे काढणे काही कौशल्य शिकणे यामध्ये त्यांना जाणिवपूर्वक पूर्वक रमू द्यावे.
अर्थात मागच्या भागात म्हटल्या प्रमाने हा मोठा विषय आहे. पण आपण सध्या पाच एक वर्षा पर्यंतचे मूल आणि आपण हे पाहिले. त्यात अजून बरेच काही तुमचे स्वानुभव भर घालणारे असतील आणि मार्गदर्शक असतील

अर्थात मागचा भागात म्हटल्या परमाने हा मोठं विषय आहे. पण आपण सध्या पाच एक वर्षा पर्यंतचे मूल आणि आपण हे पाहिले. त्यात अजून बरेच काही तुमचे स्वानुभव भर घालणारे असतील आणि मार्गदर्शक असतील अजून आता भावनांकवर लिहायचे आहे ते पुढील भागात बघू

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कावेरी, ... Happy धन्यवाद, मी जे वाचते ,ते मला उपयुक्त वाटले तर येते लिखाणात
माधवा Happy धन्यवाद , वाचून प्रतिक्रिया दिली त्या बद्दल मनापासून आभार

हा भाग बालमानस आणि मेंदूशास्त्र यावर आधारलेला झाला. या सगळ्या मध्ये आता मुले आणि भवताल , मुले आणि शाळा यापेक्षा मुले आणि भावनांक यावर लिहायला हवे

खुपच छान माहिती!

माझ्या मते कालपरत्वे जे जे नव नविन उपकरणे येतात त्यांचे परिणाम ही बाल मनसावर होत असतात! त्या त्या बदलांचा कालानुरुप अंगिकार असतो आणि त्यानुसार मुलांना काय हवे काय नको काय केल्याने काय होइल ह्यांचा देखिल विचार व्हायला हवा!
आमच्या वडलांसमोर बोलायची आमची प्राज्ञा नव्हती अभिमानाने मुलांवर बिंबविल्याने त्यांचा तुमच्याविषयी आदर वाढेल का? शिक्षेचे प्रकार, बक्षिसांचे प्रकार, समजावण्याचे प्रकार हे देखिल कालपरत्वे बदलत जातात... त्यांच्या आजुबाजुचे वातावर्ण ह्याचा देखिल परिणाम होत असतो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा....
पुर्वी शाळेत छडी खावी लागली की 'छडी लागे छम छम विद्या येई घम घम' असे म्हटले जायचे! आता छडी मारण्याआधीच गुरुजींना घाम फुटेल!
अजुन बर्‍याच मुद्यांचा अंतर्भाव करता येईल अर्थात पुढील भागाची प्रतिक्षा!

माझ्या मते कालपरत्वे जे जे नवनवीन उपकरणे येतात त्यांचे परिणाम ही बालमानसावर होत असतात! त्या त्या बदलांचा कालानुरुप अंगिकार असतो आणि त्यानुसार मुलांना काय हवे काय नको काय केल्याने काय होइल ह्यांचा देखिल विचार व्हायला हवा!.>>>>> हो अगदी.काय होत काळानुरुप नवीन जे काय येते त्याचा परिंणाम सभोतालावर होतो . आणि सभोताल बालमन घडवत असतो. आता हेच पहाना अगदी लहान मुल पण लिलया मोबाईल घेते , तो खेळायला घेते...लहान मुलाना जिथे आपल्या काळात आपण मुले एक ते शंभर लिहायला शिकायचो, तेच पाटीवर गिरवत असायचो , पाठ करायचे त्या वयात आज मुलाना टी.व्ही च्या चॅनेलचे नंबर पाठ असतात. म्हणजेच काळानुरुप माध्यमे बदलली, त्यानुरुप त्यांची क्षमता निर्माण झाली. बदल झाला नक्कीच..आणि तो बदल आपण जाणून घेऊन तसे वर्तन आपले करावयास हवे, हा बदल समजावुन घ्यायला हवा.

शिक्षेचे प्रकार, बक्षिसांचे प्रकार, समजावण्याचे प्रकार हे देखिल कालपरत्वे बदलत जातात>>>>>> हेच अभिप्रेत आहे आजच्या पालकांकडुन..समजवण्याचे प्रकार व पध्दती बदलायला हव्यात.
आता छडी लागे छम छम या गोष्टी खरेच योग्य आहेत का यावर मतमतांतरे आहेतच. काहींना योग्य वाटते शिक्षा हवी..पण मानसशास्त्रा या गोष्टी चूकीच्या आहेत हेच सांगते..अर्थात दोन्ही बाजूंचा विचार व्हावयास हवाच. नाण्याला दोन बाजू असतात तसेच एकांगी विचार करून चालत नाहीच. शिक्षा असावी पण शिक्षेचे प्रकार वेगळे असावे असे मला वाटते. जसे तुझे चुकले म्हणजे काय झाले हे मुलाला समजावून सांगावे , शिक्षा म्हणुन हवे तर थोडा काळ आता मी तुझ्याशी बोलणार् नाही. असेही म्हणता येते. केवळ मार देण्याचा फार विपरित परिणाम होतो , मेन्दूशास्त्रज्ञांचेही निष्कर्ष आहेत की मार देणे , खुप शिक्षा करणे या गोष्टींमुळे आक्रमक होतात, अर्थात इतर अजूनही या गोष्टीवर प्रकाश टाकू शकतील,

अं...

वाचला लेख.

जाताजाता,
शिक्षा, अर्थात पनिशमेंट व बिहेवियर मॉडिफिकेशन, यांचा परस्पर संबंध आहे का? का आहे?

जर मुलांना शिक्षा करणे इतके वाईट असेल, (शिक्षेची तीव्रता, कशी करावी, का करावी इ. बद्दल पुन्हा कधीतरी) तर मोठ्यांना शिक्षा करणे वाईट की चांगले?

मग जेल, सक्त मजूरी, फाशी, मालमत्तेवर जप्ती, इत्यादि शिक्षा समाजात का सुरू आहेत अजूनही?

रच्याकने : नवजात शिशू भाषा कशी शिकते, हा एक भला मोठ्ठा चमत्कार आहे, असे माझे मत आहे Wink त्याला अनेक भाषा एकाच वेळी ऐकवून कन्फ्यूज करू नये, असे माझे स्पष्ट मत आहे. अशा भाषांना एक्स्पोज केलेली मुलं धेडगुजरी स्टाईलने बोलतात, हा अनुभव आहे. उदा. हनुवटी नामक स्वतःच्या शरीरातला अवयव कोणता, उजवे डावे हे शरीराचे कोणते भाग आहेत, सदतीस म्हणजे नक्की कोणता आकडा, इ. बाबत घोर कन्फ्युजन असलेली पिढी पाहतो आहेच.
आधी आईची भाषा उमगू देत, मग इतर शिकायला बालपणाची १२ वर्षे आहेत. तेव्हाही शिकण्याची क्षमता तितकीच शक्तीशाली असते. (शिकण्याची कपॅसिटी तितकीच स्ट्राँग असते)

सर्व लेख छान आहे. Happy

>>>> हे करू नको ते करू नको म्हणून त्याला सतत अडवू नये . त्यामुळे एक नकारात्मक भावना वाढीस लागते. त्या ऐवजी अनुभव घेऊ द्यावा. <<<<
पण याचबरोबर, "काय वाट्टेल ते कर" अशी मोकळीकही असु नये, जशी ती हल्ली सर्रास बघायला मिळते. मुलांना "नकार देखिल" याच वयात पचवायला शिकवायला हवे. मग तो कोणत्याही गोष्टी/हट्टाबाबत असेल. (जास्तकरुन लहानपणी "नकार" न शिकलेली मुलेच मोठेपणी "एकतर्फी आक्रमक" प्रेमाचे मार्ग अनुसरू शकतात, नव्हे तसेच वागतात).
आपली आर्थिक श्रीमंती/तुटेल फुटेल ते नुकसान सहन करण्याची क्षमता, मुलांना "नकार शिकविण्याच्या" आड येत नाही ना हे जरुर बघावे लागते. एक उदाहरण आहे, लिंबीचा एक भाचा, आता दुसरीत आहे, लहानपणापासुन हूड, अति लाड, आत्तापर्यंत दोनदा एलईडी टीव्ही चा स्क्रिन चक्क मुठीने ठोके मार मारुन फोडुन झाला आहे . कॉप्म्युटरच्या डीव्हीडी प्ल्येयरची वाट लावुन झालीये, जे डोक्यात येईल करण्याची मुभा आहे. नुकसानीचे तिस चाळीस हजाराचा खर्च त्यांना झेपू शकतोय , पण मुलाच्या एकंदरीत "वृत्तिचे" काय ? अशी मुले दुसर्‍यांकडे गेल्यावरही उपद्रवी ठरतात, व लोकांकडच्या बहूमुल्य वस्तु कशाही हाताळून नुकसान करतात हा सर्रास अनुभव आहे. अन हे घडत असताना पालक "मख्खासारखे" नुसते बघत असतात, हात लावणे दूरच, एकाही शब्दाने असे करु नकोस हे सांगणे नाहीच्च, शिवाय, "अहो आमचा हा बाळ्या की काळ्या ना, अगदी नेहेमी अस्सेच करतो हो" असे मोठ मोठ्याने हेल काढीत लाडेलाडे कौतुकाने त्याच बाळ्यासमोर सांगत रहातात, याचा परिणाम व्हायचा तोच होतो, ते म्हणजे त्या बाळ्याकाळ्याच्या मेंदुतील न्युरॉन्स, हे असे कसेही वागले तरी ते चालतेच, तेच कौतुकाचे" असा कायमस्वरुपी सिनॅप्स तयार करुन ठेवतात.
नुकतेच सधन झालेले आईबाप, नवश्रीमंत, वा कष्टाशिवाय पैसा मिळणारा/कमी कष्टात अति कमाई असलेल्या सध्याच्या पालक वर्गात अशा लाडावलेल्या व त्यामुळे शेफारलेल्या मुलांचे प्रमाण असहनीय इतके वाढताना दिसत आहे.

आ.रा.रा
.मी संशोधन कामात व्यस्त असल्यामूळे .तुमच्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायला उशीर होतोय,
शिक्षा, अर्थात पनिशमेंट व बिहेवियर मॉडिफिकेशन, यांचा परस्पर संबंध आहे का? का आहे? >>>>> शिक्षा आणि वागण्यातील बदल याच सन्बन्ध आहेच. काय आहे आपल्या मेंदूची रचना त्रिस्तरीय असते..पहिल स्तर असतो बौध्दिक स्तर, दुसरा स्तर असतो भावनिक स्तर आणि तिसरा स्तर असतो सगळ्यात खालचा त्याला सरपटणार्‍या प्राण्याचा स्तर किंवा खालचा स्तर म्हणतात..तो प्राथमिक असतो त्यात भुक, प्रजोत्पादन, स्वसंरक्षण याबाबत तो कार्यरत असतो. मुलांना मारले की आपोआप तो स्तर कार्यरत होतो म्हणजे रक्तपुरवठा त्या स्तराकडे व्हायला लागतो व स्वसंरक्षण हे कार्य घडते , मग पळुन जाणे, आक्रमक वृत्ती या वेळेस दिसुन येते.... थोड़कयात मुले स्वसंरक्षणासाठी आक्रमक होतात...तेव्हा शिक्षांचा असा नकारात्मक परिणाम मुलांवर होतो.

नवजात शिशू भाषा कशी शिकते, हा एक भला मोठ्ठा चमत्कार आहे, असे माझे मत आहे Wink त्याला अनेक भाषा एकाच वेळी ऐकवून कन्फ्यूज करू नये, असे माझे स्पष्ट मत आहे. अशा भाषांना एक्स्पोज केलेली मुलं धेडगुजरी स्टाईलने बोलतात, हा अनुभव आहे.>>>>>> नवजात शिशू ऐकुन भाषा शिकते. मुख्यतः मूल स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतःच करत असते. न्युरोसायंटिस्टच्या मते मेंदूत ब्रोका आणि वर्निक ही क्षेत्रे असतात. मुल जन्म्ला आल्यापासुन जे शब्द ऐकते ते त्याच्या कानावाटे मेंदूच्या वर्निक क्षेत्राकडे जाता , तिथे ते साठवले जातात, त्यांचे आकलन केले जाते आणि मग ब्रोका क्षेत्र ते शब्द कृतीशील करतो..म्हणजे मुल तसे शब्द बोलू लागते. मुलांना एका पेक्षा अधिक भाषा कानावर पडल्या की ती त्या भाषांचे वर्गीकरण आपला मेदू करत असतो. त्यामूळे सरमिसळ न होता त्या भाषा आकलन होतात आणि बोलताही येऊ शकतात. पहिली दोन वर्षांचा काळ मेदू बाधणीचा काळ म्हणतात, त्या काळात एकाहून अधिक भाषा मुलांच्या कानावर पडल्या की त्याला त्या भाषा येतात.

लिंबू.. धन्यवाद Happy
"काय वाट्टेल ते कर" अशी मोकळीकही असु नये, जशी ती हल्ली सर्रास बघायला मिळते. मुलांना "नकार देखिल" याच वयात पचवायला शिकवायला हवे.>>>>> अगदी बरोबर..मुलांचे नाहक हट्ट पुरवू नये. त्यासाठी आपण सजग असावयास हवे..हट्ट , लाड यातील सीमारेषा आपण आधी निर्धारित करायला हवी, अती लाड मुलांसाठी घातकच आणि पुरवलेले हट्ट त्यांच्या विकासातील अडथळे म्हणावे लागतील.

नकाराची सवय ही व्हायला हवीच मुलांना...केवळ नकार देऊ नये, त्या नकारामागची कारणे सांगावी..कधी युक्तीने..कधी काही गोष्टी सांगुन त्यातील नकारात्मकता सांगता येतेच ना. फक्त नकार दिला की मुले हा नकार का म्हणुन गोंधळतात आणि मग हवेच अशा हट्टाला पेटतात. नकार ऐकुन घेणे तयमागची कारणे यांची मुलांना सवय लावावी .शिक्षा करणे हा त्यावरचा उपाय नाहीच. आणि वाटेल ते कर ही मोकळिक त्याच्या विकासात योग्य ठरत नाही.

नुकतेच सधन झालेले आईबाप, नवश्रीमंत, वा कष्टाशिवाय पैसा मिळणारा/कमी कष्टात अति कमाई असलेल्या सध्याच्या पालक वर्गात अशा लाडावलेल्या व त्यामुळे शेफारलेल्या मुलांचे प्रमाण असहनीय इतके वाढताना दिसत आहे.>>>>> ह्या विधानाशी सहमत. लाड करणे आणि हट्ट पुरवणे हे पालकांनी स्वतः पाळावयाची बंधने आहेत. मुलांशी संवाद हा फार मोठा आणि महत्वाचा भाग आहे. संवाद नसेल तर हे अती लाडाचे परिणाम दिसुन येतात. मुलांना त्यातील नकारात्मकता कळतच नाही. त्यातील धोके, काय वाईट , काय चांगले याची समज आपण मुलांना करूअ द्यायची. अती लाड, फाजील लाड हे मुलांसाठीच वाईट असतात..त्याच्या सर्वांगिण विकासातला अड्थळा आहे हे प्रथम आपण समजून घ्यायला हवे. आमच्या लहानपणी आम्हला मिळाले नाही..मुलांना आता देऊ शकतो तर का नको म्हणायचे? हा विचार प्रथम बाजूला करावसाय हवा. दुसरा विचार मला परवडते मग मी करतो लाड हा दुसरा विचार, पालकांनी करायला नकोच. काय योग्य आणि काय अयोग्य हे प्रथम आपण समजून घेऊन तसे वर्तन करावयास हवे. त्याचे परिणाम मुलांवर काय होतील हा विचार ही करायला हवा.

वावावा

मेंदूची रचना व कार्यपद्धतीबद्दल बरीच माहिती मिळते आहे. धन्यवाद! Wink

आपण म्हणता, त्याप्रमाणे शिक्षा केली तर मुले सुधरण्याऐवजी अ‍ॅग्रेसिव्ह बनतात. तसेच गुन्हेगारांना शिक्षा केली तर ते अधिक वाईट बनतात. बरोबर ना?

स्मिता, सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद.
खरे तर मुल सुसंस्कारित करणे ही एक तारेवरची कसरतच आहे. समजुन उमजुन घेऊन केले तर सहज सोपे, अन्यथा अवघड.

लिंबू, खर म्हटल तर तारेवरची कसरत आहेच. पण एक सांगू का मुलाना समजुन उमजून घेणे तसे फार आनंददायकच. पुन्हा आपल्यालाही बालपण जगता येतेच. त्याचा फायदा दुहेरीही होतो आपल्याला आणि मुलांनाही.
सगळ्या पसार्‍यात एक गोष्ट कायम अधोरेखीत होते बघ ती म्हणजे संवाद. मनमोकळा संवाद जर मुलांसोबत असेल तर सोपे होते त्यांना सम़जुन घेणे आणि समजावून सांगणे पण. प्रत्येक गोष्तीतली सुक्षम भेदरेषा मात्र आपण पाळायलाच हवी. त्यांचे ऐकायचे म्हणजे वाटेल ते नाही. हट्ट पुरवायचे, लाड करायचे पण त्याला ही सीमारेषा निश्चित हवी. त्यांना व्यवस्थित समजून सांगीतले तर मुल अगदी सम़जुन घेतात.
आता यात मुख्य अडथळा येतो तो सभोतालाचा. काय होते आपण घरात एक सांगतो मुलांना पण बाहेर त्यांना सगळीकडे ते दिसत नाही. मग त्यांच्या डोक्यात विसंवाद वाढायला लागतो. जसे मी माझ्या मुलाला सांगायची असे करायचे नाही, ते असे असे चांगले नाही. तर दुसर्‍या दिवशी तो म्हणायचा अमुक एक मित्र तर करतो, त्याला त्याची आई नाही अडवत. मग तू मलाच का नको म्हणते. मुलांच्या या प्रतिक्रिया कायम असतात कारण घरात आपण सांगणे आणि बाहेर गेल्यावर त्यांना दुसरे अनुभवास येणे यात फरक पडतोच. मला प्रश्न आही इतर मुलांचे ही आई वडिल थोड्या फार फरकाने माझ्या वयाचेच असतील ना..त्यांची जडण घडण पण मी ज्या कालावधीत लहानाची मोठी झाली त्याच काळात असेल ना..मग ते का नाही असा विचार करत?
वर तू म्हणतोस ते झालेय नवश्रीमंत वर्ग कायम वरल्या वर्गाची बरोबरी करण्यात मशङुल. त्यामुले चांगले काय नकी याची समजच हरवलीय. पोटतिडकीने संगावेसे वाटते अरे बाबांनो हे मुलांसाठी बरे नव्हे. मुलांच्या हाती मुबलक पैसे देणे पॉकेटमनीच्या नावाखाली. त्यांना वाढदिवसाला गाड्या भेट, मोबाइल भेट देणे..हा त्यांचा मोठे पणा मिरवणाचा सोस मुलांना किती मारक ठरतो याचा विचार सहसा ते करत नाही. वर आम्ही देऊ शकतो... आमचा क्लास वेगळा तेव्हा आम्ही असे वागतो या ज्या समजुती करून घेतल्या आहेत त्या मारक आहेत.