फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू!!!

Submitted by विद्या चिकणे-मांढरे on 14 March, 2017 - 05:49

गोष्टीची सुरुवात.....

‘Shashank, Could you do me a favor?’
‘आता काय? काय राडा केला आहेस नवीन? नसत्या उठाठेवी करतोस अन मला निस्तरायला लावतोस. हे बघ....'
'अरे बाबा! काही उठाठेव नाही केलीये मी, एक कॅन्डीडेट येणार आहे संध्याकाळी तेव्हढं इंटरव्युव्हचं बघशील का?'
'अजिबात नाही! मला खूप कामं आहेत, प्रोजेक्टची डेडलाईन आहे. आज टाईमपास केला तर वीकेण्डला यावं लागेल. तुझं तू बघून घे. आणि काय रे, तू कुठे चालला आहेस? जायचंच होतं तर इंटरव्युव्ह उद्यासाठी ठेवायचा ना.'
‘अरे! शिल्पाचा बड्डे आहे आज, अन मी साफ विसरलो. मघाशी फोन करून परत कधींच भेटू नकोस म्हणाली. आधी जाऊन माफीनामा सादर करावा लागणार आहे, केवढ्याला पडतो काय माहीत. आधीच मी त्या टेन्शनमध्ये आहे, त्यात तू अजून ज्ञान नको देऊस यार! आज मदत कर पुन्हा नाही मागणार कधींच.'
'हा डायलॉग गेल्या वर्षभरात कमीत कमी ३६५ वेळा मारलायस...'
'क्या करू यार, या डायलॉग शिवाय तू कन्व्हिन्स पण होत नाहीस ना!’, म्हणत राजेश पळाला.
'अरे यार! हा राजेशपण ना.....’, असे पुटपुटत शशांकने पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं खुपसलं.
.
.
‘Shashank! the candidate is there for an interview’, समीरच्या या वाक्याने शशांकची तंत्री भंगली अन लॅपटॉपमध्ये खुपसलेलं डोकं वर काढत तो त्याला म्हणाला, 'please send her in interview room.’
समीर गेला अन शशांक केबिनमध्ये येऊन बसला अन त्याच्यापाठोपाठ मनवासुद्धा!'
नजरानजर झाली अन पुढच्याच क्षणी दोघांच्याही तोंडातून, 'तू?' असा शब्द निघाला एकांचवेळी!
'अरे शशांक! किती दिवसांनी भेटतोयस अन तेही असा, as an interviwer!'
‘I can’t believe this, what a pleasant surprise, Manava!’
‘अरेरे! पण तू इथे आहेस म्हणल्यावर मला काही इथे काम नाही करता येणार', मिश्कीलपणे मनवा बोलली.
'का? असं का बोलतेस?'
'अरे! मी समोर असताना तुझं कामांत लक्षण लागणार आहे का? कॉलेजमध्ये तरी अभ्यास कुठे करायचास?', डोळे मिचकावत मनवा म्हणाली.
'अशी, वेड लावणारी माणसं बरोबर असताना अभ्यासांत कोणाचं लक्ष लागतंय’, शशांकच्या या वाक्यावर दोघेही खळखळून हसले.
मग शशांकनेच विषय बदलला.
'अगं, दिल्लीत होतीस ऐकलं होतं. पुण्यांत केव्हा आलीस? आणि घरचे सगळे कसे आहेत?'
'घरचे सगळे? कि श्री…?'
'हा तेच ते', जरासा वैतागून शशांक बोलला.
'श्री.....नाहीये आता या जगात', म्हणत मनवाने डोळ्यांत तरळणारी आसवं हळुवार टिपली.
‘What? अगं पण हे कसं? कधी?....'
'मागच्या वर्षी एप्रिलमध्ये त्याच्या आई-बाबांना घेऊन देवदर्शनाला गेला होता. एका भरदाव ट्रकने त्यांच्या गाडीला उडवले, अन गाडीचा पार चक्काचूर झाला. अन हे तिघेही.....'
‘Oh, I am Sorry! अच्छा म्हणून तू हे नोकरी वगैरे….मनवा कसलीही मदत लागली, तर मी आहे हे विसरू नकोस. अगदी हक्कानं सांग. आई बाबांकडे रहातेस का आता? हे बघ हे असं होतं, म्हणून मी तुला नेहमी सांगायचो कशाला ती स्कुटी-बीटी चालवतेस? ते जाऊ दे, मला सांग आज कशी आलीयेस तू इथे? तुझी स्कुटी घेऊन नाही ना आलीस?.... हे बघ…. मनवा', समजुतीच्या स्वरात शशांक बोलत होता.
अन काहीतरी आठवून मनवा पुढे म्हणाली, 'तू अगदी जसा होतास तसाच आहेस. 'काळजीवाहू सरकार! किती काळजी करतोस रे...’'.
'अन तूही तशीच आहेस, नाजूक फुलपाखरासारखी! गैरसमज नको करून घेऊस मनवा, पण जवळपास वर्ष झालं आता त्या गोष्टीला. तुला तुझ्या भविष्याचा विचार करावा लागेल. किती दिवस अशी एकटी राहणार? कुणाचातरी आधार.....'
कसलासा विचार करून मनवा मधेच बोलली, 'शशांक! या शनिवारी काय करतोयस?'
'काही विशेष नाही, संपदा माहेर गेलीये बाळंतपणासाठी? नववा चालू झालाय ना?'
'Oh wow, Congratulations! मग घरी ये ना, शनिवारी’,
पर्समधून कार्ड काढून देत मनवा 'भेटू शनिवारी' असे म्हणून निघून गेली. अन शशांकची पुन्हा तंत्री लागली. पण यावेळी कामामध्ये नाही, तर कॉलेजच्या आठवणींमध्ये!
शनिवार उगवला अन शशांकने मनवाकडे जायची तयारी केली. त्याच्या डोक्यांत विचारांनी नुसतं थैमान घातलं होतं, मनवा गेल्यापासून. का बोलावलं असेल तिने घरी? माझ्याशी लग्नासाठी नकार दिल्याचा पश्चाताप तर होत नसेल ना तिला? अन होत असेल अन ती तसं बोलली तर काय करायचं? बिचारी! काय काय भोगलंय तिने या वयात, अजून तिशीही नाही ओलांडली. तुझ्या आधाराची गरज आहे म्हणाली तर? असो, बघूया तिथे गेल्यावर. असंही या मनवाच्या मनाचा थांग लागणं महाकठीण. दोन वर्षांच्या रिलेशनशिप नंतर एक दिवस अचानक म्हणाली, ‘शशांक आपली वेव्हलेंथ काही जुळत नाही. आपण पुढे नको जायला, नको लग्नाच्या बंधनात अडकायला’. मी तिला समजावायचा किती प्रयत्न केला पण 'नाहीच' म्हणाली....असो, भूतकाळ उगाळून काय उपयोग आहे आता. एक मैत्रीण म्हणून तरी तिला आधार दिलाच पाहिजे', असे मनाशीच ठरवत त्याने बूट पायात घातले अन तिने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला……

गोष्टीची लांबी बघता, इच्छा नसूनही, गोष्ट दोन भागांत सादर करणे क्रमप्राप्त असल्याने पुढची गोष्ट...पुढील भागांत...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users