कविता : कुटुंब आणि वाद

Submitted by भागवत on 13 March, 2017 - 07:24

कोणी दुसर्‍याला समजण्यात व्यस्त आहे
कोणी कुरघोडी करण्यात मस्त आहे
इथे सगळ्यांना आप-आपले मत आहे
वादविवाद, घर याचं गहिरे नातं आहे

सरड्या प्रमाणे रंग बदलतात इथे
पश्चातापा मुळे आत जळतात इथे
समई प्रमाणे तेवत राहतात इथे
जीवाला-जीव लावणारे असतात इथे

विनाकारण उगाच झुंजतात माणसं
इतरांवर विश्वास ठेवून गंजतात माणसं
नात्यातला गुंता वाढवतात माणसं
वेड पांघरूण जगतात माणसं

स्वभावाला औषध थोडेच असते
सगळ्यां सोबतच मन रमवायचे असते
भांडणामुळे मन मात्र रूसत असते
विसंवाद तरी फॅमिली एकत्र असते

कुटुंबा साठी द्यायला वेळ नाही
आचार आणि विचाराचा मेळ नाही
नात्यातला गुंता वाढवणे खेळ नाही
कुटुंब फक्त राग, द्वेषाची भेळ नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users