सवय

Submitted by आरपार on 6 March, 2017 - 18:01

भोगले एवढे दुःख की...
भीती वाटावी छोट्या सुखाचीही.

सोसले जास्त उन्हाळेच की...
भिववावे पावसाच्या एका सरीनेही.

खावी लागली एवढी औषधे की...
चुकल्यासारखे व्हावे गोळी नसणेही.

पोखरले सतत चिंतांनीच की...
बेचैन करावे निश्चिन्त क्षणानेही.

झेलली इतकी अवहेलना की...
खात्री लागावी प्रेमळ शब्दाचीही.

भिनला एकटेपणा अंगात इतका की...
गर्दी व्हावी कुटुंबियांचीही.

भंगल्याच एवढ्या अपेक्षा की...
अस्वस्थ करावे निरपेक्षतेनेही.

पाहिली वाट मरणाचीच की...
शंका यावी जगावे वाटले तरी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.