.................................................................................................................................

Submitted by .... on 5 March, 2017 - 21:22

..............................................................................................................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वच कल्ट्सकडून ज्या कोलांट उड्या चालू आहेत त्यांची गंमत पाहून आपण आपले मनोरंजन करून घेऊयात.

सध्या ईव्हीएमवरून असेच मनोरंजन चालू आहे. भाजप जिंकली ते इव्हीएममुळे असे विरोधी कल्ट म्हणतो. तर भाजप कल्ट त्याला रडगाणे म्हणतो. गंमत म्हणजे २००९ च्या निवडणुकांमधे नेमक्या उलट्या भूमिका होत्या दोन्ही बाजूंच्या. आता याचे दाखले देत पुन्हा चिखलफेक. या गदारोळात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पण मंडळी आलटून पालटून नकळतपणे प्रश्न चिन्ह उमटवत असतात. राजकीय प्रगल्भता अशा त-हेने कमाल उंचीला पोहोचलेली आहे.

छान.

अध्यात्मात भक्ती वाढली की द्वेष कमी होतो असे व्यस्त प्रमाण असते. निदान तसे अपेक्षीत तरी आहे.
पण राजकीयभक्तीत भक्ती आणि द्वेष एकत्र नांदतात आणि ते समप्रमाणात वाढत असावेत वाटते. किंबहुना विरोधी कल्टचा जेवढा जास्त द्वेष, तेवढी आवडत्या कल्टची भक्ती सिद्ध होईल असा अलिखीत नियम असावा असे सुद्धा वाटते.

अजून एक गोष्ट त्या वरच्या लेखात घाला. आता सर्वच पक्ष व त्यांची धोरणे इतके सपाट झाले आहेत की कुणीही कुठल्याही पक्षातून कुठेही जाऊ शकतो. अपवाद बहुतेक कम्युनिस्ट पक्षांचा. मात्र ती विचारधाराच लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ते सोडल्यास काँग्रेस मधला राजकारणी आरामात भाजपात, भाजपातला सपामध्ये, शिवसेनेचा काँग्रेसमध्ये असे कुणीही कुठेही कोलांट्या उड्या मारू शकते.
आमच्या सांगलीत संजयकाका पाटील गोमुत्र शिंपडले की थेट भाजपात आणि वर्षानुवर्ष काम करणारा दीपक शिंदे अडगळीत!

एकूण जगभर उजव्या-राष्ट्रीय-धार्मिक पक्षांची चलती आहे. वर्तमानपत्रे नामशेष होत चालली आहेत. इन्स्टंट पोस्ट्स (ट्विटर, फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप) ह्याच बातम्या आहेत. जो पक्ष हे व्यवस्थित सांभाळेल तो जिंकणार. त्यामुळे ज्यांना कॉन्स्पिरसी थेअरी उत्तम सांभाळता येते ते पक्ष तरतील. संघाने नेहेमीच आदर्श आणि 'घडवलेला' इतिहास याचे बेमालूम मिश्रण सांभाळले आहे. त्या मुशीत तयार झालेल्या भाजपाच्या नेत्यांनी त्याचा उत्तम उपयोग केला आहे. त्याउप्पर आता काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे अस्तित्व नेमके कुठल्या तत्त्वांवर आधारलेले असणार हे नक्की नाही आणि भाजपानेच स्वतः काँग्रेसची जागा (सर्वच अर्थांनी - राष्ट्रीय प्रसार, नेते) घेतल्याने त्यांचे अजून अवघड झाले आहे.

लॉकहीड मार्टिनमध्ये पैसे लावा आणि निवृत्त व्हा! युद्ध अटळ आहे.

सपनाजी,
भक्तांचा विरोध करणारेही भक्तच असा निष्कर्ष काढलाय काय आपण?

सपनाजी ..... होते ते आखाडे काय कमी होते जो तुम्ही अजुन एक आखाडा उघडून दिलात!

तुमची पोस्ट कितीही संतुलित असली तरी इथे व्हायचे तेच होणारेय.... आम्ही सोडून बाकी सगळे कसे कुठल्या न कुठल्या तरी कल्टच्या नादी लागलेत हेच सिद्ध करायचा प्रयत्न नेहमीचे यशस्वी कलाकार करणार!

असो!..... चालूद्या!

स्वरूप याना अनुमोदन
छान लिहिले आहे
मलाही हा प्रश्न कायम पडतो की इतका द्वेष या लोकांमध्ये कुठून येतो?

छान लिहिले आहे
एकूणात काय मनोरंजन चालू आहे. >> ह्याला अनुमोदन

पाणी जसे उताराकडे धावते, उष्णता गरम पदार्थाकडून थंड पदार्थाकडे जाते, हवा जास्त दाबाच्या भागातून कमी दाबाच्या भागात जाते, हे निसर्गनियम बुद्धीला लागू पडतात असे दिसते.
समाज, राजकारण, धर्म इ. सर्व काही जिथे कमीत कमी बुद्धिमत्ता लागेल अश्या विषयांकडे वळतात,

म्हणून अमेरिकेत सध्या ट्रंप व त्याचे भक्त यांच्या बुद्धिमत्तेला जे जमेल तेच बोलले वा चर्चिले जाते. भारत, अमेरिका, दोन्हीकडे प्रश्न ज्वलंत व कठीण आहेत. अश्या वेळी समंजस, बुद्धिमान लोकांनी एकत्र येऊन काही करण्यापेक्षा नुसती एकमेकांवर चिखलफेक करून जनतेचे मनोरंजन करणे सोपे, खरे खोटे काहिहि बोलायला अक्कल लागत नाही.
अमेरिकेत तर अत्यंत बेजबदार विधाने करण्यात राष्ट्राध्यक्ष खूपच पुढाकार घेतात.
आता इथे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मायबोलीवरील भक्त येऊन राष्ट्राध्यक्षांच्या विधानाचे समर्थन म्हणून विरोधी पक्षावर चिखलफेक करतील, ते सोपे. ७ वर्षाची मुले जसे त्याने केले मग मी का नाही असे समर्थन करतात तसे. बिचार्‍यांची तेव्हढीच अक्कल, तसेच झाले आहे.

पण गेल्या साठ वर्षात बँका गावोगावी पोहोचू शकलेल्या नाहीत हे काँग्रेसचा कल्ट कधीही मान्य करणार नाही.

....

गावोगावी ब्यान्का होत्या / आहेत / रहातील. पण गावच्या साध्या ब्यान्कात भ्रष्टाचार होतो , हे कारण देवून त्या ब्यान्कांचे सर्वच व्यवहार ठप्प करण्यात आले होते.

पण अमित शहाची पतसंस्था मात्र सुरु होती. Proud

आखाडा नाही हो. क्षणभर मायबोली विसरून जा. सोशल मीडीयाच नाही तर प्रत्यक्षातही हेच चालू आहे. व्हॉट्स अ‍ॅप वर तर आपले ओळखीचे लोक, मित्र, नातेवाईकही मेसेजेस ढकलत असतातच. आजार चांगलाच बळावलाय असे दिसतेय.