सूर ते सुचवून जातो

Submitted by द्वैत on 3 March, 2017 - 15:56

मी जरासा स्तब्ध होतो अन पुन्हा अस्वस्थ होतो का आता सामोरी माझ्या तो असा निर्धास्त येतो

एकटा असतो मी आता लाखदा सांगून झाले
का असा मग सांजवेळी मेघ हा बरसून जातो

कोण आहे देऊ कोणा फुल वेलींची ती उपमा
का बगीचा त्रास देण्या हा असा बहरून येतो

बंद करतो दारेखिडक्या चांद रातीला आता मी
का असा मग डोळे मिटता चांद तो उजळून येतो

सोडूनी तो गाव आता मी किती हा दूर आलो
का इथेही तोच रस्ता जवळूनी डीवचून जातो

विसरुनी गेलो कधीचा त्या गीताचे सूर मी
का आता बेभान वारा सूर ते सुचवून जातो

- द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users