शब्दांचा संप..

Submitted by Akshayaj on 3 March, 2017 - 10:16

आठवणींचा बोजवारा उडाला आहे;
कुणास ठाऊक कसा, शब्दांनी मात्र आज संप पुकारला आहे..

आत असंख्य भावनांचं काहूर माजलेलं असतानाही वरकरणी सारं काही शांत आहे;
कुणास ठाऊक कसा, शब्दांनी मात्र आज संप पुकारला आहे..

आपलं आपलं म्हणत जपलेलं भावविश्व एका क्षणात उध्वस्त होऊन गेलं आहे;
कुणास ठाऊक कसा, शब्दांनी मात्र आज संप पुकारला आहे..

अपेक्षाभंगाचं अटळ दुःख पचवताना निष्ठुर वास्तव सामोरं आलं आहे,
कुणास ठाऊक कसा, शब्दांनी मात्र आज संप पुकारला आहे..

मनाशी साचलेले अनेक कढ आतल्याआत जिरवताना हृदय मात्र दगड बनलं आहे;
कुणास ठाऊक कसा, शब्दांनी मात्र आज संप पुकारला आहे..

Group content visibility: 
Use group defaults