नव्या युगाचा नवा शिवाजी

Submitted by गवंडी ललिता on 2 March, 2017 - 05:19

नव्या युगाचा नवा शिवाजी

नव्या युगाचा नवा शिवाजी
आज आमच्यात घडू दे
आज तुतारी वाजवून
स्वर गगनी भिडू दे
घराघरात आमुच्या
तोच शिवाजी जन्मू दे
सावित्रीच्या लेकी आम्ही
पदर जिजाऊचा घेऊ दे
शिकवू आम्ही गनिमीकावा
डाव भ्रष्ट तो उधळू दे
संस्काराची तलवार घेऊन
माय बहिणींना रक्षु दे
मळवट माथी आई भवानीचा
नाद मराठमोळा असू दे
गर्जना आमुची माणुसकीची
रचना जातीची नसू दे
शिकवण ही हो शिवरायांची
आठवण अंतरी असू दे
नव्या युगाचा असा शिवाजी
घराघरात जन्मू दे
ललिता गवंडी

Group content visibility: 
Use group defaults

सुन्दर!! !
गर्जना आमुची माणुसकीची
रचना जातीची नसू दे
शिकवण ही हो शिवरायांची
आठवण अंतरी असू दे
नव्या युगाचा असा शिवाजी
घराघरात जन्मू दे>>>>अप्रतिम......... . Happy

मला कालच तुमची आठवण झाली होती... Sad

छान