तो देव व्यर्थ आहे

Submitted by द्वैत on 2 March, 2017 - 00:22

देवास पुजणारा असतो समाज खोटा
झाकून पाप अपुले करती तयास मोठा

केले किती गुन्हे ते माफी पुन्हा मिळावी
करती नवस असा की नियत जरा ढळावी

उरली न लाज कसली देवास लाच देती
सोयीनुसार अपुल्या वाटून देव घेती

जमली अपार माया करणे हिशोब कोडे
पेटीत टाकू थोडे दडवू खिशात थोडे

भक्तीत लोभ ह्यांच्या भक्तीत स्वार्थ आहे
नुसता प्रसाद देतो तो देव व्यर्थ आहे

- dwait

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम बरोबर बोललात द्वैत....

उरली न लाज कसली देवास लाच देती
सोयीनुसार अपुल्या वाटून देव घेती>>>>मस्त!

Hmmmm...have to think ....not all points i agree..but as a poem nice one

देवास पुजणारा असतो समाज मोठा
नाकारुनी तयाला झाकून ठेवी खोटा

केले किती गुन्हे ते माफी कुठे मिळावी
सावरी मनास असे की नियत न ढळावी

पुजून भक्तीभावे देवास भाव देती
सोयीनुसार अपुल्या वाटून कर्म घेती

जमली अपार माया घेऊन जायचे कोडे
पेटीत टाकू थोडे गरीबास देऊ थोडे

भक्तीत नसे लोभ यांच्या भक्तीत नसे स्वार्थ
ठावे असे तयांना दोषी फक्त असे प्रारब्ध

धन्यवाद कावेरी, धन्यवाद मीनल जी
not all points i agree..>>>>
जिंदगी को देखने का अपना अपना नजरीया है
फुलोनसी सजी राह किसिकी किसिका आग का दरीया है