जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १०

Submitted by Mayur Mahendra ... on 1 March, 2017 - 11:28

जँकला आता चांगलीच झोप येत होती. नकळत त्याच्या डोक्यात एक तीव्र सनक येऊन गेली. तरीही डोळे न ऊघडताच त्याने झोपण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला. परंतू त्याला पून्हा शांतपणे झोपताच आलं नाही. कारण अचानकच
सूss सूss सूsss सारखा कसलातरी मोठा आवाज झाला होता. आणी त्या आवाजाने जँकचं लक्ष वेधून घेतलं होतं. मग तो आवाज क्षणाक्षणाला खूपच वाढू लागला. ईतका की त्याचे डोळे आपसूकच आकस्मीतरीत्या ऊघडले गेले. मग हळूहळू पापणीची ऊघडझाप करून तो एकाएकी स्वतःशीच पूटपूटू लागला.
" ही काय कीरकीर आहे रे, आणी हा न थांबणारा एवढा मोठा आवाज तरी कसला ?
मी नक्की आहे तरी कूठे ? "
बंद खीडकीच्या एका छोट्याशा फटीतून येणाऱ्या प्रकाशाने त्याचे डोळे पाणावले. शरीर जड झालं होतं. हात-पायही खूप दूखत होते. त्यातच भर म्हणून की काय डोक्यातील तीव्र वेदनांनी कळस गाठला होता.
मग जँकने हळूवार बाजूला मान वळवून पाहण्याचा प्रयत्न केला. त्याने पाहीलं डावीकडे एका कोपऱ्यात ज्युली डोळे मीठून निपचीत पडून होती.
तीला पाहताच जँकला थोडं हायसं वाटलं. गूहेत घडलेल्या काही ठरावीक घटना अगदी यावेळीही त्याच्या डोळ्यांसमोर येत होत्या. अगदी शेवटच्या क्षणी त्याच्या डोक्याला मार लागून खूप रक्त वाहीलं होतं. पण हे बघण्यासाठी तो त्यावेळी शूद्धीवरही नव्हता.
ज्युलीला समोर पाहताच तीला जागं करण्यासाठी तो कसातरी धडपडत हळूहळू ऊभा राहीला. पण अचानकच त्याचं डोकं पून्हा ठणकू लागलं. जखम जरी खोलवर झाली नसली तरी त्याचं डोकं माञ आता खूपच दूखत होतं.
मग कसंतरी एका हाताने डोकं पकडत तो हळूहळू ज्युलीपर्यतं पोहोचला. ती कदाचीत अजूनही बेशूद्धच असावी म्हणूनच की काय त्याने तीला हाताने जोरात हलवलं. पण तीला जागच येत नव्हती. शेवटी नाईलाजास्तव त्याने बाजूच्या वॉटर मशीनमधील पाणी हाताच्या ओजंळीत घेऊन तीच्या तोडांवर शीपडलं. तेव्हां कूठे ती थोड्या वेळाने हळूहळू शूद्धीवर आली.
तीच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता. केस अगदीच विस्कटले होते. कदाचीत तीच्या डोळ्यांवर अजूनही झोप असावी.
मग हळूहळू पापणीची ऊघडझाप करून ती आजूबाजूला पाहू लागली. कदाचीत ती काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत होती.
" जँक आपण कूठे आहोत आता ?" ती अडखळतच बोलली. खरंतर तीला काहीच आठवत नव्हतं.
मग जँकनेही तीच्या प्रश्नाला प्रतीऊत्तर म्हणून नकारार्थी मान हलवून प्रश्नार्थक मूद्रेन तीच्याकडे पाहीलं.
तेवढ्यात अचानकच तो सूss सूss सूsss सारखा आवाज त्यांना पून्हा ऐकू येऊ लागला. त्या मोठ्या आवाजाने जँकचं लक्ष वेधून घेतलं. तो आवाज खिडकीच्या बाहेरूनच येत होता. म्हणून तो कसला आवाज आहे ते पाहण्यासाठी जँक हळूहळू खिडकीजवळ गेला. त्याने विन्डो ऊघडून बाहेर पाहीलं. आणी मग काही क्षण तो पाहतच राहीला. समोर एक विलक्षण, खूपच मोठं, सफेद व तपकीरी रंगाचं भव्य ईजींन कपांर्टमेटं असलेलं विशाल जहाज होतं.
जँक त्या नावासरूला पाहताक्षणी स्वःला विसरून गेला होता. तो त्या खिडकीजवळ ऊभा राहून वंशीत झाल्यासारखा कसलीच हालचाल न करता अगदी स्तब्धपणे त्या जहाजाकडेच निरखून पाहत होता. एवढं मोठं जहाज त्यांच्या ऊभ्या आयूष्यात त्याने कधी पाहीलं नव्हतं.
जँक काहीही न बोलताच एवढा वेळ विन्डोजवळ ऊभा आहे हे पाहून मग ज्युलीही त्याच्याजवळ गेली. ती फक्त तोडं ऊघडं ठेवत डोळे विस्फटून पापणी न हलवता त्या भव्य जहाजाकडे पाहत राहीली.
" Owesome यार " नकळत तीच्या तोडांतून शब्द निघाले.
तो अथांग, अमर्याद पसरलेला, शांत, धीरगंभीर एखाद्या तत्ववेत्याप्रमाणे भासणारा विशाल जलसमूदाय आणी त्यात अवघ्या सागर भूमीवर कर्तत्व गाजवून आपली बिरादारी मीरवणारं ते भव्य जहाज.
अगदीच मनमोहक, नयनरम्य दृश्य होतं ते.
त्या विशाल जहाजाकडे पाहता पाहता नकळत क्षणभरासाठी का होईना पण जँकची नजर खाली पाण्याकडे गेली.
फक्त पहावं ते नवल एवढंच म्हणायचं आता बाकी राहीलं होतं.
ते दोघंही समूद्रसपाटीपासून जवळजवळ तीस-पस्तीस फूटाच्या ऊंचीवर एका भव्य जहाजात ऊभे होते. ज्युलीचा तर या सर्वावर विश्वासच बसत नव्हता. ती ऊगाचच वेड्यसारखी पाय वर करून त्या खिडकीबाहेर तोडं काढत आजूबाजूला पाहण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. तीने डावीकडे पाहीलं, ऊजवीकडे पाहीलं, खूपच दूरपर्यत पसरलेलं ते विशाल जहाज पाहून ती भारावून गेली. पण अगदी त्याच क्षणी तीच्या मनाच्या एका कोपऱ्यात कसलीतरी नाजूकशी हूरहूरही दाटून येत होती.
आता स्वतःच्या घरापासून, मिञांपासून नकळत त्या दोघांनीही एका अमर्याद सागरात प्रवेश केला होता.
" पण जँक मला अजूनही समजलं नाही. की आपण ईथे या जहाजात कसे काय पोहोचलो ?
म्हणजे आपण तर त्या गूहेत होतो ना ?" ज्युली अगदी अाच्छर्याने जँकला विचारत होती.
" मला तरी असं वाटतंय की त्या वेबने व त्याच्या साथीदारानीच आपल्याला ईथे आणलं असणार " जँक
" अरे मी विसरलेच रॉकी आणी रॉन कूठे आहेत " ज्युली
" काय माहीत गं, वेबने त्या दोघांना कूठे ठेवलंय. " जँक
" म्हणजे त्या दोघांविषयी तूलाही काहीच कल्पना नाही का रे " ज्युली
" अगं आपण दोघं जेव्हां त्या दोघांना शोधण्यासाठी त्या अंरूद गूहेत गेलो होतो ना तेव्हां तू नकळतच माझ्या मागून गायब झाली होतीस आणी मग त्यांनंतर थोड्या वेळाने अचानक माझ्या डोक्यावरही कूणीतरी जोरात वार केला. आणी मी खाली पडलो. मग त्यानंतर पूढे काय घडलं मला काहीच आठवत नाही.
पण मला जेव्हां जाग आली तेव्हां तू तीथे एका कोपऱ्यात पडून होतीस. "
" ते सर्व ठीक आहे रे पण तूला काय वाटतं वेबने त्या दोघांना कूठे ठेवलं असेल. ?" ज्युली
"मला माहीत नाही गं. ते दोघं कूठे आहेत. कदाचीत वेबने त्यांना आपल्यासोबतच या जहाजामध्ये आणलं असावं. कीवां ते दोघं त्या गूहेतून सूखरूप निसटलेही असावेत. तू त्यांची फार काळजी करू नकोस.
कारण रॉनसारखा एक हूशार डीटेक्टीव्ह रॉकीसोबत असताना त्याच्या जिवाला कसलाच धोका राहणार नाही. जरी वेबने त्या दोघांना पून्हा पकडलं असलं तरी रॉन नक्कीच स्वतःला व रॉकीला त्या मणसांपासून सूखरूप ठेवेल. याची मला अगदी खाञी आहे. "
विचारात बूडून गेलेलं त्याचं मन पून्हा भानावर आलं. तोपर्यतं ज्युली पूरती सावरली होती. तीला तीच्या घरच्यांची खूपच आठवण येत होती. पण घरी कॉल करून कळवण्यासाठी तीच्याकडे यावेळी मोबाईलही नव्हता. वेबने त्या दोघंचेही मोबाईल त्यांच्या नकळतच काढून घेतले होते.
" माझ्या आईची काय अवस्था झाली असेल रे, तीने तर मला शोधून-शोधून अख्या सोसायटीत धूमाकूळ घातला असेल " ज्युली
हो, मला त्याची कल्पना आहे गं. आपण एकदा का या रूममधून सूखरूप बाहेर पडलो ना की मग आपण तूझ्या आईला घरी फोन करून सर्व काही सांगन टाकूू.
अगदी त्या वेबच्या स्मग्लीगंबद्दलही " जँक यावेळी माञ थोडा रागानेच बोलला.
सर्वच घटना अगदी आकस्मीतरीत्या अचानकच घडल्या होत्या. ते दोघंही थोडावेळ शांतपणेच बसून विचार करत राहीले. वेबने त्या दोघांनाही त्यांच्या नकळत त्या जहाजात आणलं होतं. आणी जहाजातील एका रूममध्ये त्यांना कैद करून ठेवलं होतं. शीवाय त्या रूमचा दरवाजाही वेबने बाहेरून लॉक करून ठेवला होता.
" पण ज्युली मला एक अजूनही कळंल नाही की तू ईथे कशी काय ?, तू तर त्या गूहेतून अचानक गायब झाली होतीस ना ? जँकने शेवटी न राहवून शांततेचा भंग करत ज्युलीला पून्हा प्रश्न केला.
" अरे मी जेव्हां त्या गूहेमध्ये तूझ्या मागून येत होती ना. तेव्हां वेबने नकळतच गूगीचं औषध असलेला एक सफेद रूमाल माझ्या नाकाला लावला होता. मग हळूहळू माझ्या डोळ्यांसमोर अंधार वाढू लागला. आणी त्यांनतर पूढे काय झालं. मला काहीच आठवत नाही रे. " ज्युली
" पण तरीही एक गोष्ट माञ मला अजूनही समजली नाही की त्यांनी आपल्याला या जहाजातच का आणलं ?
ते आपल्याला दूसऱ्या ठिकाणीही ठेऊ शकले असतेच ना ? मग ऊगाचच.... " जँकने तीला पून्हा प्रतीप्रश्न केला.
" तूला आठवतंय रॉकीने आपल्याला काय सांगीतलं होतं. ती माणंस नक्कीच त्या खजाण्याच्या शोधात आहेत. तूझ्याकडून त्यांना त्या गूप्त खजाण्याच्या संदर्भात कसल्यातरी माहीतीची अपेक्षा असा......." ज्युली
" पण मला तर कोणत्याच खजाण्यासंदर्भात कसलीच कल्पना नाही गं. शीवाय फक्त येवढं विचारण्यासाठीच ती माणंस आपल्याला काही ईथे घेऊन येणार नाहीत. नक्कीच या मागे त्यांचा दूसरा काहीतरी हेतू असावा " ज्युलीचं वाक्य अर्धवट तोडतच जँक म्हणाला.
" मग मला सांग जँक, रॉनला व रॉकीला त्यांनी आपल्यापासून दूर का ठेवलं असेल." ज्युली
" ते काय मला माहीत नाही गं. कदाचीत आपण चैघंही एकञ राहू नये अशी त्यांची योजणा असावी. कीवां त्यामागे आणखीन काही कारण असावं " जँक पटकन ऊत्तरला.
त्या दोघांनाही आता हळूहळू घडलेल्या सर्वच घटनांची पूसटशी कल्पना येत होती.
" जँक मला काय वाटतं की रॉकीला कैद करून त्या माणसांना नक्कीच तूझ्यापर्यतं पोहोचायचं होतं. शीवाय रॉकीने त्या माणंसाचं बोलण चोरून ऐकलं होतं ना. म्हणूनच तर आपली दीशाभूल करून वेब आपल्याला ईकडेतीकडे फीरवत होता. आणी त्यामूळेच तर आपण घरी देखील पोहोचू शकलो नाही " ज्युली पहील्यादांच काहीतरी लॉजीकल बोलत होती. जँक तीचं म्हणनं अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. पण त्याला काहीच समजलं नाही.
" रॉकीशी आपली त्या गूहेत भेट होणं हा निव्वल एक योगायोग होता.
आपण तीघं जण तर फक्त त्या डोगंरावर फिरण्यासाठीच गेलो होतो. पण त्याच संधीचा फायदा घेत वेबने आपल्याला अडचणीत टाकून फसवलं. आणी मग तो आपल्याला ईथे या जहाजात घेऊन आला.
" मला तरी असं वाटतय की त्यांनी रॉनला व रॉकीला देखील या जहाजातच आणलं असेल. कारण ते दोघंही त्या गूहेतूनच अचानक दिसेनासे झाले होते बरोबर
म्हणजे त्यावेळी त्यांना नक्कीच वेबने पकडलं असणार " जँक
" हो, कदाचीत
पण जँक आपल्याला पकडणारी ती माणंस नक्की कोण आहेत. आणी त्या माणसांचा आपल्याला पकडण्यामागे नक्की काय हेतू आहे हे जरी आपल्याला समजलं ना तरी सर्वच गोष्टीचां ऊलगडा होणं शक्य होईल." ज्युलीने अगदीच विषयाला दूजोरा दिला होता.
" हो गं. पण त्यासाठी आपल्याला अगोदर या रूममधून तर बाहेर पडायला हवं ना. वेबने जाणूनबूजून या रूमचा दरवाजा बाहेरून बंद केला आहे. " जँक.
ज्यूली आणखीन पूढे काही बोलणार तेवढ्यात अचानकच बाहेरून कोणाच्यातरी चालण्याचा हलकासा आवाज आला. मग त्या व्यक्तीने जवळ येऊन त्यांच्या रूमचा दरवाजा ठोठावला. त्यामूळे दोघांचही लक्ष दरवाज्याने वेधलं. त्या दरवाजालाच खालच्या बाजूने एक छोटासा मीनी डोर बसवण्यात आला होता. अगदी ईमर्जन्सीच्या वेळी बचावासाठीच त्या मीनी डोरची रचना करण्यात आली असावी. मग तो मीनी डोर बाहेरूनच त्या व्यक्तीने ऊघडला. आणी त्याबरोबर दोन जेवणाची ताटं आत सारण्यात आली. मग तो डोर आपोआपच बंद झाला.
त्यांनी काल राञीही काहीच खाल्ल नव्हतं. त्यामूळे जेवण पाहताच त्याच्या पोटात चूलबूल सूर झाली. काहीही न खाता ऊपाशी पोटी झोपणं म्हणजे निव्वल मूर्खपणा आहे. हे न समजण्याईतपत तरी ते दोघं मूर्ख नव्हतेच म्हणा.
मग फार वेळ न घालवता लगेचच त्या दोघांनी ती ताटं रीकामी केली. थोडं पोटात गेल्यामूळे त्यांना आता जरा बंर वाटू लागलं होतं.
डोळे झीरमत आले होते. सकाळी लवकर जाग आल्यामूळे खरंतर त्या दोघांचीही झोप पूर्ण झाली नव्हती. शीवाय आता जेवणामूळे त्यांना सूस्ती चढली. आणी मग हळूहळू डोळे मीटत ते दोघंही झोपेच्या आहारी गेले.
जेव्हां जँकला संध्याकाळी जाग आली तेव्हां त्याचं डोकं पून्हां ठणकत होतं. ऊघड्या खिडकीतून थंडगार वारा आत येत होता. लाटांच्या आवाजानी आणी तेजोमय प्रकाश कीरणांनी त्या दोघांचीही सूखद झोप आता पूरती हिरावून घेतली होती.
ऊठावसंच वाटत नव्हतं. ती तळमळ, घडलेल्या घटनांनी मनात कळ्ळोल माजवला होता. थंडगार फर्शीला डोकं टेकून झोपल्यामूळे फरशीचा थंडावा मनाला ऊब देत होता. त्याचा अनूभव घेताना नकळत जँकचं लक्ष त्या आवाजाकडे गेलं.
अगदी तोच सूss सूss सूsss सारखा ईजींनाचा आवाज जो या आधीही त्याने एेकला होता.
तो आवाज नक्कीच त्या मोठ्या जहाजाचा असावा हे समजण्यासाठी जँकला फार वेळ लागला नाही.
" ऊठ ज्युली " जँकने तीला झोपेतूनच जांग केलं.
" काय आहे " तीची चांगलीच झोपमोड झाली होती.
" तूला ऐकू येतोय का तो आवाज " जँक
" कसला आवाज.....मी आता झोपतेय नंतर बोल " असं म्हणत ज्युलीने जँकच्या बोलण्याकडे दूर्लक्ष करत पून्हां झोपण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
मग जँक ते मोठं जहाज पाहण्यासाठी आवाजाचा मागोवा घेत पून्हा खिडकीजवळ गेला. पण बाहेरही त्याला कोणतंच जहाज वैगरे काही नजरेस पडलं नाही.
" जर बाहेर मला सकाळी दिसलेलं ते मोठं जहाज नाही तर मग हा आवाज कूठून येत असेल " जँक स्वतःशीच पूटपूटत विचार करू लागला.
प्रयत्न करूनही झोप न आल्यामूळे मग ज्युलीही फ्रेश होऊन जँकसोबत बोलू लागली.
" काय रे मगाशी तू मला काय सांगत होतास " ज्युलीने आळस देतच जँकला विचारलं.
" तूला तो आवाज येतोय का ? " जँक
" कसला? " ज्युली
" जहाजाच्या ईजींनाचा " जँक
" नाही रे " ज्युली
" जरा थांब " असं म्हणत जँकने पून्हा खाली फरशीला कान लावले.
" काय करतोयेस तू जँक " ज्युली जँककडे पाहून गालातच हसत म्हणाली.
" अगं मी ज्या ईजींनाच्या आवाजाविषयी तूला विचारत होतो ना. तो आवाज ईथूनच खालून येतोय.
म्हणजे आपल्या रूमखाली ईजींन कम्पार्टमेटं आहे तर " जँकने डोळे मिचकावतच ज्युलीला सांगीतलं. आणी ते सांगतांना त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी आंनद पसरला होता.
मग थोडा वेळ शांत राहून तो कसलातरी विचार करण्यात मग्न झाला. त्याला काहीतरी गवसलं होतं.
नक्कीच त्याच्या मनात त्या रूममधून बाहेर पडण्याची आगाऊ कल्पना जल्म घेत असावी.

क्रमशः
पुढील भाग लवकरच............

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच रे भावा...!!! कथे मध्ये आता 'इंटरेस्ट' वाढत चालला आहे, प्लीज, कथेचे पुढचे भाग टाकायला उशीर करु नकोस, नाही तर कथे मधला पुर्ण 'इंटरेस्ट' निघुन जाइल....!!!