पसारा

Submitted by mrsbarve on 27 February, 2017 - 15:57

माझं कपड्यांच कपाट मी कशी आवरेन याची मला खूपच काळजी असते ,कारण ते सतत अस्ताव्यस्त होत असत,मी रोज ते लावत बसत नाही.बर्याचदा धुतलेले कपडे घड्या करून सोफ्यावर किंवा चक्क लिविन्ग रूम च्या कार्पेटवर गठ्ठे करून ठेवते आणि आठवडाभर त्यातले कपडे उचलून घातले जातात .नवर्याला हे अज्जिबात आवडत नाही ,तो सारखे टोमणे मारतो,किंवा चिडतो मग मी मूक ,बधिर आणि आंधळ्याचे नाटक करते,आणि डोके शांत ठेवून मला ज्या गोष्टी महत्वाच्या वाटतात त्याच करत रहाते.

पण आजच्या दिवसात काही तरी वेगळ घडल ,पिल्लुच्या शाळेत त्याच्या गाण्याच्या कार्यक्रमाला गेले,त्यामुळे जिम ला सुट्टी मग घरी येउन थोडावेळ फेसबुक वर टी पी केला मग थोडावेळ योगाचा क्लास झाला,पण आजचा दिवस काही सरता सरेना!मग मी कधी नव्हे ते कपड्यांच्या घड्या प्रत्येक रूम मध्ये जावून कपाटात निट रचल्या ,शेवटी मास्टर कपाटात आले,सर्व बाजूनी कपडे लोम्ब्काळत माझ्या अंगावर धावून येत आहेत असे वाटले. कलोजेट मध्ये पाय ठेवायला जागा नाही हे कित्येक आठवड्यांनी मला जाणवले. मग आजी सोनियाचा दिनू आला ,मी क्लोजे ट आवरायला घेतले. एका कोपर्यात जे.सी.पेनीची मोठठी प्लास्टिकची पिशवी होती ती उचलून त्यात काय आहे ते पाहिले,तर अहो आश्चरय्म !त्यात मस्त आजुनी टैग हि न काढलेले कधीतरी विकत घेतलेले तीन ट्युनिक्स सापडले.!मग मी ते छान घड्या घालून एका कप्प्यात ठेवले,त्यांना जरा माणसात आल्यासारखे वाटले असेल असे वाटुन आपल्यातल्या संवेदन शिलतेचे कौतुक केले !आणि 'अलवार' हा क्षण असाच असतो का असे वाटले. Happy

मग बाजूला काही आईनी दिलेली चांदीची भांडी एका पिशवीत होती ती उचलून वर निट ठेवली. माझ्या आईची एक लग्नातली ट्रंक होती तिची आठवण झाली ,ती उघडायची म्हणजे खूपच काही तरी मोठ्ठी गोष्ट असायची कारण ती पत्र्याची ट्रंक छान मोत्ठ्ठे कुलूप तोंडावर घेऊन ,पलंगाच्या खाली अगदी जपून ठेवलेली असायची,त्यात आईचे दागिने आणि चांदीची भांडी असायची .ती अगदी मोजक्या वेळीच बाहेर यायची.त्या पेटीतून अत्तर्दाणिचा वास यायचा …… त्यात आमची बाळ्लेणि ,आईने तिच्या रुखवतात केलेले भरतकामाचे एक टेबल्क्लोथ होते,गुलाबाच्या फ़ुलांचे …ते हे सारे आठवून गेले… मग मी माझ्या चांदीच्या भांड्यांचा वास घेतला …अगदि थेट तसा येत होता … मस्त वाटलं

बरेच चुडीदार त्यांच्या ओढण्याच्या आठवणीने व्याकूळ होऊन इकडे तिकडे लोळत होते,त्यांची आपल्या ओढ ण्या शी गळाभेट घडवून आणली . कांहीना घड्या तर काहीना हैंगर नशिबी आले. हळु हळू क्लोजेट मधला पसारा कमी होऊन जिकडे तिकडे जमीन/कार्पेट दिसू लागले. भारतीय कपडे आणि अमेरिकन कपडे वाली मिळाल्यासारखे अभिमानाने घड्यामध्ये आणि हैगर मध्ये विराजमान झाले .

मग तिथेच कोलेजच्या मार्क्शिट्स फ़ाइल आणि शाळा कॉलेजातून जिंकलेल्या वक्तृत्व स्पर्धांची सर्टिफ़िकिटे सांभाळणारी फ़ाइल सापडली … हाहा हि आता पसार्यात जमा झालेला खजिना हे जाणवून थोडेसे कडु कडू वाटले …

मग एक जुना अल्बम सापडला किति तरी जुने फोटो आणि आठवणी पण सापड्ल्या . त्याना आपण पसार्यातहि जपायचे आहे हे पुन्हा एकदा स्वत:ला बजावून झाले .

आपल्याला यातल्या बर्याच गोष्टींची आता काहीही जरुरी नाही मग त्या टाकून दिल्या तर? असे वाटले पण तो विचार नंतर मलाच खूप क्रूर वाटला.
मु ळात आपण पसार्याला का वाईट म्हणतो हा साक्षात्कारि प्रश्न पडला आणि जे जपतो त्याला आपण पसारा का म्हणतो हा उप प्रश्ण हि पडला. मग वाटलं कि रोज या गोष्टींची जाणिव नाही होत ,गरज नाही पडत म्हणजे आपण यात गुंतलेले नाही आहोत..मग याला पसारा म्हणताना वेगळ का वाटत आहे…?

पण तरीही डोळ्यांना दिसणारा पसारा आवरला गेल्याने मन प्रसन्न झाले …. एव्हढ्यात खालच्या कप्प्यातील एका लाल काश्मिरी शालीकडे लक्ष गेले . काही वर्षापूर्वी याच शालीशी गाठ बांधून शेल्याने तिच्याबरोबार मिरवले होते. हळूच हसले.शालीवरून हात फ़िरवला. तिची घडी निट होती,लग्नातल्या अत्तराचा वास मला येतो आहे असा मला भास तरी झाला … मी नवर्याला हाक मारून ती शाल दाखवली ,त्याने प्रथमच क्लोजेट इतके सुंदर दिसतंय हे नोटीस केले ,मग म्हणाला ही शाल कुठली?

मी मनातल्या मनात "डोम्बल" म्हणाले आणि शाल ठेवून दिली…

क्लोजेट मधला पसारा तरी आवरला,म्हणुन सुखी समाधानी झाले … आणि त्यानिमित्ताने आठवलेले क्षण ,झालेल्या अनंत जाणिवा यांचा डोक्यात झालेला पसारा उलगडत लेख लिहू लागले!

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिले आहे, आपल्या आठवणींना असे शब्दांत उतरवणं हे सुध्दा मनाचे क्लोजेट आवरण्यासारखेच असते.

मी मनातल्या मनात "डोम्बल" म्हणाले आणि शाल ठेवून दिली… विमेन आर फ्रॉम व्हीनस, मेन आर फ्रॉम मार्स! त्याला तो तरी काय करणार?

मी फार पसारा घालत नाही किंवा वेळचेवेळी आवरून ठेवते पण तरीही काही काही ठिकाणी रिलेट करता आलं. थोडा असो कि जास्तं पसारा आवरणे म्हणजे आठवणींच्या देशात मुक्त सैर असते, हे खरं Happy
"एका कोपर्यात जे.सी.पेनीची मोठठी प्लास्टिकची पिशवी होती ती उचलून त्यात काय आहे ते पाहिले,तर अहो आश्चरय्म !त्यात मस्त आजुनी टैग हि न काढलेले कधीतरी विकत घेतलेले तीन ट्युनिक्स सापडले.!" >> हे वाचून २ महिन्यापूर्वी केलेली शॉपिंग बॅग अजून उघडलीच नाहीये हे लक्षात आले. या कन्टेन्ट बद्दल खरंच आभार Happy Happy Happy