इनोदी कथा

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 26 February, 2017 - 14:01

गावरान, मस्त लिहिलंय. 'शंकर पाटीलांची' आठवण झाली.

पण भाषा बर्‍याच ठिकाणी कळत न्हवती. >>हि कोणत्या विशिष प्रांताची भाषा आहे का?

> बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरची ही बोलीभाषा आहे. ( प्रामुख्याने बुलढाणा, खामगाव, मेहकर, नांदुरा -शेगांवचा काही भाग आणि मुख्य म्हणजे आमचा चिखली तालुका.)
बुलढाणा जिल्हा विदर्भात आहे पण इथली भाषा वर्हाडीपेक्षा थोडी वेगळी आहे. बुलढाणा हे उंचावर वसलेलं आहे (घाट) घाट उतरल्यावर जे तालुके लागतात तो घाटाखालचा भाग. ( मोताळा, मलकापूर, वगैरे तालुके) इथून खानदेश जवळ असल्याने भाषेवर खानदेशी प्रभाव जाणवतो. थोडक्यात इथली भाषा म्हणजे वैदर्भी + वर्हाडि
घाटावरचे जे तालुके आहेत ( खासकरून चिखली, मेहकर) ते मराठवाड्याला जवळ असल्याने इथली भाषा म्हणजे वर्हाडी+ मराठवाड्याची भाषा ( जालना आणि औरंगाबाद जिल्हा)
कथेतील भाषा हीच आहे.
याच कारणामुळे असेल, आमच्या जिल्ह्यातील भाषा ओळखणे थोडं कठीण आहे.
मी अकोला, नागपूर भागात जातो तेव्हा लोक विचारतात तुम्ही मराठवाड्याचे का आणि औरंगाबादला जातो तेव्हा लोक म्हणतात तुम्ही वर्हाडातले का? :))

मस्त कथा, अ‍ॅस्ट्रॉनॉट!! हाही लेख मला मिरासदारांच्या गोष्टींइतकाच झकास वाटला. तोडीस तोड.
(एकच निगेटिव कमेंट - तो 'खंडागळ्यायचा प्लॉट' वाला प्रसंग थोडा कॄरतेचा वाटला.)

खुपच ग्रामीण भाषा असल्याने पुर्ण वाचु नाही शकले. फक्त राउतबाईंचा किस्साच वाचला. भाषा कळाली नाही की कंटाळा येतो मला Sad

Pages