पाहुणे

Submitted by द्वैत on 25 February, 2017 - 05:43

येणार्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परिक्षेसाठी शुभेच्चा देण्यासाठी म्हणून येणार्या काही अतिरेकी पाहुण्यानसाठी म्हणून

पाहुणे

हे पाहुणे येतात घरी जेव्हा,वाटते आज आपलीच शिकार आहे
कारण घरच्यान्पेक्शा ह्यानाच जास्त,माझ्या भविष्याची चिन्ता चिकार आहे
शम्भराहून एक कमी ही ह्यान्च्यासाठी भिकार आहे
अन टक्क्यान्वरुनच ठरवणार हे, की पोरग कीती हुशार आहे

हौस, मौज, कला, छन्द ह्यान्च्यासाठी जणू विकार आहे
त्याच्यात थोड रमण म्हणे आयुष्याचा जुगार आहे
अहो हे देखील ठेवतात काही हौस काही छन्द
ह्यान्च्यादेखील मनात कधी मुरतो गुलकन्द
तोन्डी नाही लागली म्हणून द्राक्ष आम्बट फार आहेत
अन टक्क्यान्वरुनच ठरवणार हे, की पोरग कीती हुशार आहे

आमचा पोरगा अमुक करतो, ते कठीण चिक्कार आहे
तुमचा तमुक ते काय करतो, त्याला दिवस थोडे बेकार आहेत
अहो दोन पेपर वाचून हे बणतात सर्वज्ञानी
आणि उपदेशानी घायळ करतात असले ऋषीमुनी
ह्याना सहन करण म्हणजे खरच अत्याचार आहे
अन टक्क्यान्वरुनच ठरवणार हे, की पोरग कीती हुशार आहे

ह्यान्चे मार्गदर्शन जैसे अद्भुत साक्षात्कार आहे
गोन्धळलेल्या अभिमन्युला ह्यान्चाच काय तो आधार आहे
अहो बाणाहून तीक्श्ण जहरी ह्यान्चे खोचक सल्ले
अन सन्धी मिळताच करतात असे अतिरेकी हल्ले
ह्यान्च्या असल्या सौजन्याचा आता हाहाकार आहे
अन टक्क्यान्वरुनच ठरवणार हे, की पोरग कीती हुशार आहे

- द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त ........
दुसऱ्यांची काळजी अन् दिव्याखाली अंधार असतो

अगदी बरोबर लिहिलंय तुम्ही द्वैत! पाहुण्यांनी परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन निघून जावं तर नाही पुढील शिक्षणापासून ते मार्केटमधे कोणत्या क्षेत्रात काय चालू आहे या सगळ्या विषयी सांगून पोरांचा वेळ वाया घालवणार.