केसरी / स्ट्रॉबेरी हॉलिडेज कंपनीचा खाजगी सहलीचा अनुभव?

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 February, 2017 - 09:45

पुढल्या महिन्यात सिक्कीम, दार्जिलिंग, पेलिंग, लाचुंग सहल करायची आहे. केसरी / वीणाच्या ग्रुप टुर्स एक तर फुल झाल्यात अथवा ज्या आहेत त्यात तारखा सोयीच्या नाहीत. केसरीने मग कस्टमाइझ्ड टुर्स सुचवले व त्यासाठी संपर्क करण्यास वेगळा नंबर आणि ईमेल पत्ता दिला जो @kesari.in आहे.
त्यांना फोन करुन डिटेल्स मागवले. इमेल @kesari.in वरुनच आले पण त्यात "Greetings from Strawberi Holidays!!" असे आले.
मग सर्च केल्यावर लक्षात आले की ते केसरीचे बिझनेस पार्टनर्स आहेत. स्ट्रॉबेरी हॉलीडेज कस्टमाइझ्ड टूर्स करतात आणि अशा टूर्स साठी त्यांचे आणि केसरीचे टाय-अप आहे. म्हणजे केसरीकडुन जर कस्टमाईझ्ड टूर करायचा असेल तर तो स्ट्रॉबेरी हॉलीडेज करतो.
त्यांचे रिव्ह्यु बघावे म्हणुन गुगल शोध केला.

माउथशटवर ७ रिव्ह्युज आहेत, त्यातिल दोन खराब अनुभवांचे तर इतर चांगल्या अनुभवांचे आहेत.
http://www.mouthshut.com/product-reviews/Strawberi-Holidays-Mumbai-revie...
केवळ एवढ्या रिव्ह्युज वरुन कसलाही निष्कर्ष काढणे कठीण आहे.
या रिव्ह्युजबद्दल मी केसरीला विचारले. त्यांचे म्हणणे की आम्ही सगळीकडे सगळ्यात चांगल्या ऑपरेटर्सशीच टाय-अप करतो, तुम्ही निश्चींत रहा.

माबोवर कुणाला केसरी / स्ट्रॉब्रेरी हॉलीडेजच्या कस्टमाइज्ड / खाजगी टूर्सचा अनुभव असल्यास कृपया शेअर कराल का?.
तसेच सिक्कीममधील चांगले टूर ऑपरेटर्स माहीत असल्यास ते पण शेअर कृपया शेअर कराल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा एक मित्र आणि त्याची बायको, हनिमून टूअर करुन आले नुकतेच. त्यांचा अनुभव चांगला होता.
शेवटी आपापला अनुभव खरा. बेस्ट लक !

स्ट्रॉबेरी हॉलीडेज कस्टमाइझ्ड टूर्स करतात हे बरोबर आहे . आणि ते केसरीशीच संलग्न आहेत. ती त्यांची शाखा केसरी भाऊंची मुलगी "झेलम चौबळ " सांभाळते. ती पुण्यावरून हा बिझनेस सांभाळते . त्यांच्या कस्टमाइझ टूर्स चा अनुभव मात्र नाही Happy

मायबोलीवर एक धागा आहे ज्यात प्रवासी कंपन्यांच्या अनुभवाविषयी लिहिलंय.. त्यात मला स्ट्रॉबेरीबद्दल चांगलं वाचल्याचं आठवतं Happy

वीणा वल्डसा आमचा आनुभव चांगला आहे

mi strawberry ani veena donhi tours kelya ahat. Jast farak nahi.Donhikade same experience ahe .u can use either of them

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार.
रीया, जाई तुम्ही सांगीतलेले बाफ बघतो.

देवकी, केसरीचा माझा स्वतःचा अनुभवपण चांगला आहे, पण तो ग्रुप टूर होता. ग्रुप टूर्स मध्ये त्यांचा माणुन जातीने लक्ष घालायला हजर असतो.
कस्टमाईज्ड टूर्समध्ये असे नसते, दुसर्‍या एजंटला ते कॉन्ट्रॅक्ट देतात, म्हणुन खाजगी टूर्सच्या अनुभवाबद्दल जाणुन घ्यायचे आहे. तुमचा वीणा वर्ल्डचा अनुभव ग्रुप टूरचा आहे की खाजगी कस्टमाइज्ड टूर चा?

तुमचा वीणा वर्ल्डचा अनुभव ग्रुप टूरचा आहे की खाजगी कस्टमाइज्ड टूर चा?
>>
तुम्ही देवकी यांना विचारलंय तरी मी उत्तर देते Happy

तीन-चार वर्षांपुर्वी आई बाबांनी वीणा सोबत राजस्थानची ट्रिप केलेली... अर्थातच ग्रूप ट्रिप
अनुभव फार मस्त होता.. त्यांचा गाईड सगळ्यांना सांभाळून घेत होता, जे जे महत्वाचं ते ते सगळं दाखवलं म्हणे Happy

एकच तक्रार केली आईने ती म्हणजे जेवणात सगळेच्या सगळे १५च्या १५ दिवस पनीर होतं Proud

तुमचा वीणा वर्ल्डचा अनुभव ग्रुप टूरचा आहे की खाजगी कस्टमाइज्ड टूर चा?
>>
तुम्ही देवकी यांना विचारलंय तरी मी उत्तर देते Happy

तीन-चार वर्षांपुर्वी आई बाबांनी वीणा सोबत राजस्थानची ट्रिप केलेली... अर्थातच ग्रूप ट्रिप
अनुभव फार मस्त होता.. त्यांचा गाईड सगळ्यांना सांभाळून घेत होता, जे जे महत्वाचं ते ते सगळं दाखवलं म्हणे Happy

एकच तक्रार केली आईने ती म्हणजे जेवणात सगळेच्या सगळे १५च्या १५ दिवस पनीर होतं Proud

तुमचा वीणा वर्ल्डचा अनुभव ग्रुप टूरचा आहे की खाजगी कस्टमाइज्ड टूर चा?
>>
तुम्ही देवकी यांना विचारलंय तरी मी उत्तर देते............धन्यवाद रिया.
मानव, उशीराबद्द्ल क्षमस्व.माझा अनुभव ग्रूप्टूरचा आहे.,पण २ महिन्यांपूर्वी माझ्या कझिनने केसरीची खाजगी कस्टमाइज्ड टूर केली होती.तिचा अनुभव मस्त होता.वर दिनेशदंनी म्हटल्याप्रमाणे शेवटी आपापला अनुभव खरा.

पुढल्या महिन्यात सिक्कीम, दार्जिलिंग, पेलिंग, लाचुंग सहल करायची आहे. >> मानव, तू स्वतःचं स्वतः सगळं बुकिंग करून जावंस असं मी सुचवेन. हॉटेल.कॉम वरून हॉटेल्स, अपार्टमेंट हवं असेल तर एअरबीएन्बी वापर. बागडोगरा एअरपोर्ट बाहेरून टॅक्सीज उभ्याच असतात. दार्जिलिंगला जायला. तिथल्यातिथे ठरवून जायचं. बरेचदा हॉटेलचा पिकअप असू शकतो. हॉटेलमध्ये गेल्यावर तिथे त्यांना विचारून अथवा बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सीजमधून दिवसाभराकरता टॅक्सी ठरवायची. दार्जिलिंग, सिक्कीम ही टुरिस्ट ठिकाणं असल्यानं अजिबात त्रास होत नाही टॅक्स्या मिळवायला. रेटस बारगेन करता येतात सिझननुसार.

फक्त एक कॉशन. टॅक्सीवाला तुम्हाला आत बसवलं की आधी डिझेल भरायला जाईल. त्यावेळी तो तुमच्याकडून पैसे घेतो. आणि दिवसभर फिरून झाल्यावर दिवसाअखेरीस हिशोबाच्या वेळी आपण ते सकाळचे अ‍ॅडव्हान्स दिलेले पैसे विसरतो. (आम्ही केलेला हा वेंधळेपणा. ७०० रु, जास्तीचे दिले त्याला.) ते तेवढं नीट लक्षात ठेव.

इथेही नजर टाक : ग्लेनबर्न टी-इस्टेट, दार्जिलिंग : एक आगळावेगळा अनुभव - http://www.maayboli.com/node/48388 या लेखात शेवटाच्या पानावर दार्जिलिंग झू चे ही फोटो आहेत.

मानवभाऊ, स्वतःच बुकिंग केलेलं उत्तम, हल्लीच ट्रॅव्हल ट्रायांगल नावाच्या अजून एक साईट बद्दल तपास लागला आहे, बिझनेस मॉडेल थोडे वेगळे आहे. ते लोक आपल्या बजेट नुसार कस्टम टूर सुद्धा करून देतात.

रीया, राजस्थानचे कूक्स सुगरण, रोज रोज पनीर शीकरण असावे बहुतेक. Proud
देवकी धन्यवाद, उशीर क्षमस्व काय त्यात?

केसरीचे कस्टमाइज्ड टूर्स पण त्यांनीच आखलेले आहेत, आणि त्यात आपल्याप्रमाणे हवा तसा बदल करुन बरेच महाग होत आहे आणि खास करुन सिक्कीम टूर बद्दल पूर्ण क्लॅरीटी नाही असे वाटते.

मामी छान माहिती. इतर माहिती वाचून माझापण कल स्वत:च स्वत: टूर कण्याकडे जात होताच. सिक्कीम टुरीझमला फोन केला त्यांनी पण चांगली माहिती दिली, इथे येऊन प्लानिंग करु शकता म्हणाले. तुझा फोन नं देशील का?
ग्लेनबर्न टी इस्टेट एकदम झक्कास. केरळमध्ये आम्ही अशा इस्टेटीत राहिलो होतो खूप वर्षांपूर्वी. पण ग्लेनबर्न्च्या साईट वर एका रात्रीचे रेट ३६ हजार सांगताहेत, टू मच! तुम्ही किती दिले होतेत?
http://www.glenburnteaestate.com/tariff.html

सोन्याबापू, ती साईटपण चेक करतो. तसेच एकाने गंगटोक मधलेच footprint holidays recommend केले आहे गंगटोक लाचेन आणि लाचुंग टूर्ससाठी. त्यांचे रिव्ह्युज खूप चांगले आहेत.

आपलं आपण करा arrange खूप जास्त मजा येते आणि खर्च निम्मा येतो स्वातंत्र्य खूप मिळते . आम्ही नेहमी आपले आपणच जातो .

आम्ही मागच्या वर्षी maldives ट्रिप केली आहे. वीणा वर्ल्डने. customized टूर होती. सोबत गाईड वगैरे नव्हता,पण त्यांचा एक माणूस फोनवर सतत available होता. Emergencyमधे आलेला एक प्रॉब्लेम विव च्या लोकांनी अगदी मध्यरात्री सोडवला होता.

मध्यरात्री म्हणजे , problem createच मध्यरात्री झाला, पण त्यांनी तो सोडवण्यात चोखपणे आणि तात्काळ मदत केली. एकूण अनुभव खूप छान आणि relaxingहोता.