भाव

Submitted by वैशाली अ वर्तक on 13 February, 2017 - 11:53

आपल्या मराठी भाषेत एक भाव शब्द पहा कसा वेग वेगळ्या ठिकाणी वेगळा अर्थ.
भाव

भाव म्हणजे मोल वस्तूंचे
भासता उणीव मुल्य चढे
असता मुबलक उतरे भाव
अर्थ शास्त्राचा नियम खास
भाव दिसे अर्थतंत्रात

दडला भाव नर्तन-चित्रात
साकार होई तो कला दर्शनात
होता भावपूर्ण अभिनय
मूर्तीमंत तो उतरे कलेतून
भाव वसे हर-एक कलेत

शब्दा विना कळते सारे
सहज घडे संवाद जीवात
भाव नजरेने सांगे मनीचे
वसशी भाव अंतरंगात
चेहरा सांगे भाव क्षणात

धन दौलत नकोस तयास
नकोच व्रत वैकल्याचा भार
हवा नजराणा भाव भक्तीचा
भोळ्या भावाचा सदा भुकेला
देव पाही भाव भक्तात

प्रेमळ भाव आईचे हृदयी
वडीलांचे ठायी उदात्त भाव
सदा निरागस बाल्याचे दिसती
शांत निर्मळ प्रसन्न भाव
प्रभो ,दिसती तव नयनात
वैशाली वर्तक

Group content visibility: 
Use group defaults

छान कविता
(थोडा खोडकर भाव == जास्त भाव नाही खायचा हं )

खर आहे.विजया ताई भाव खाणे.ऐट दाखविणे वा तोरा मिरविण्या सारखे .असा भावा स्वभावाचा दाखवायचा/लिहावयाचा होता. पण राहिले