जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग ६

Submitted by Mayur Mahendra ... on 11 February, 2017 - 12:50

अगदी हवेत विरघळून जावा तसा वेब त्या झाडामागून हळूवार दिसेनासा झाला होता.
त्यांना काहीच कळत नव्हतं. एकतर खाली उतरण्यासाठी अंधारात वाट सापडत नव्हंती. आणी त्यात आता वेबही अचानक गायब झाला होता.
" रॉन मला सांग वेब आपल्याला काहीही न सांगताच कूठे गेला असेल रे "
कसलातरी अंदाज लावण्याच्या अनूंशगाने जँक विचारत असावा. कदाचीत त्याला रॉनचं मत जाणून घ्यायचं होतं.
" तो कूठे गेला ते मला कसं माहीत असणार यार. ऑलरेडी आपल्याला खूपच ऊशीर झालाय. त्यात आपण आता वेबचाच विचार करत राहीलो तर घरी कधी पोहोचणार ?" रॉनही कंटाळल्यामूळे थोडा वैतागूनच बोलत होता.
" रॉनचं म्हणनंही बरोबर आहे जँक, वेब तर नेहमीच ईथे येत असतो असं तो स्वतःच म्हणाला होता. म्हणजे आपल्याला न सांगता जरी त्याला घरी जायचं असेल तरी तो एकटा जाऊ शकतोच ना. खाली ऊतरण्याचा मार्ग तर त्याला नक्कीच माहीत असेल. त्यामूळे त्याला शोधण्यात आपण आता वेळ वाया घालवायला नको "
रॉनच्या बोलण्याला साथ देत ज्युलीनेही आपलं मत व्यक्त केलं.
शेवटी नाईलाजास्तव वेबने दिलेला धक्का पचवत तिघंही पोरं पून्हा शांतपणे पूढे चालू लागली. त्यांना डोंगरावरून खाली उतरण्यास खूपच उशीर झाला होता. पण तरीही पायथ्याशी जाणारी वाट माञ त्यांना अजूनही सापडत नव्हती. ते त्या भयान राञीच्या अंधारात नूसते वेड्यासारखे भटकत होते.
जँकच्या मोबाईलची बँटरीही आता संपत आली होती. म्हणून मग जँकने रॉनला व ज्युलीला त्यांचा मोबाईल बंद करण्यास सांगीतला. जेणेकरून जर पूढे गरज भासल्यास, कदाचीत त्यांना पायथ्याशी पोहोचण्यास उशीर झाल्यास त्या दोघांच्या मोबाईलची फ्लँश लाईट त्यांना वापरता आली असती. नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्याच मनात अजूनही वेबचाच विषय रेगांळत होता. पण घरी जाण्याच्या आशेने कोणीही बोलून दाखवत नव्हतं एवढंच.
चालताना कधीकधी मंद वाऱ्याची हलकीशी झूलूक अंगाला स्पशून जाई. क्षणभर गारवा जाणवे पण मग त्यानंतर पून्हा सर्व पूर्वीसारखं शांत होत असे.
आता रातकीड्यांचा आवाजही हळूहळू एेकू येईनासा होत होता. अगदी सगळीकडेच निरव शांतता पसरली होती. कदाचीत वेबच्या अचानक गायब होण्यानेच वातावरणात आभासी भीती दाटून आली असावी.
अगदी चालताना झालेला पायाचा हलकासा आवाजही जिवाचा थरकाप ऊडवी. पण त्यांना घाबरून चालणार नव्हतें.
तीघंहीजण आता अगदी सावधपणे प्रत्येक गोष्टीची चाहूल घेत पूढे जात होते. त्या दाट झाडीतून व काळ्या अंधारातून खाली पायथ्यापर्यतं उतरण्याची वाट सापडणं जवळजवळ अशक्यच होतं. परंतू त्यांनी अजूनही हार मानली नव्हती.
अखेर जँकला ज्याची भीती होती तेच घडलं. अचानकच त्याच्या मोबाईलची बँटरी संपल्यामूळे त्याचा मोबाईल स्वीच अॉफ झाला. आणी क्षणार्धात सर्वच दृश्य अंधारून गेलं.
ज्युलीने तर घाबरून किचाळंत लगेचच जँकचा हात घट्ट पकडला.
ही घटना एवढ्या जलद गतीने घडली होती की जँकला देखील त्या वेळी काहीच समजलं नव्हतं. त्यामूळे तोही भीतीने ओरडत ज्यूलीपासून दूर पळत सूटला. पण तेवढ्यात सूदैवाने रॉनने त्याच्या मोबाईलची फ्लँश लाईट चालू केली. आणी पून्हा सर्वाच्यां जीवात जीव आला. एकमेकांकडे बघताना एकाचवेळी तीघांचीही नजर समोरच्या मोठ्या झूपकेदार झाडाकडे गेली. आणी मग ते तीघंही त्या झाडाकडे पाहतच राहीले.
जे झाड जँकने याआधीही पाहीलं होतं. तेच झाड त्यांना पून्हा समोर दिसत होतं. पण जँकने केलेली X ही खूण माञ त्यावर नव्हती.
कोणीतरी मूद्दामूनच ती खूण मिटवण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता.
" पण असं कोण का करेल ?" रॉन
" कदाचीत आपली दीशाभूल करण्यासाठी " ज्युली
" पण कोण ?" जँक
अखेर थोड्या विचाराअंती जँकला सर्वच गोष्टीचां हळूहळू ऊलगडा होऊ लागला.
ते तीघंही फिरून पून्हां-पून्हां एकाच ठीकाणी येत होते. याची आता त्याला जवळजवळ खाञीच पटत चालली होती.
खंरतर त्या तीघांनाही काहीच सूचत नव्हतं. नक्कीच त्यांची काहीतर चूक होत होती. एवढे प्रयन्त करून सूद्धा त्यांना पायथ्याशी पोहोचण्याचा मार्ग सापडत नव्हता.
मग फार वेळ न घालवता आपलं वृक्षपूराण संपवून त्यांनी निमूटपणे पूढचा मार्ग पत्करला. रॉनने व ज्यूलीने तर आता घरी परतण्याची आशाच सोडून दिली होती.
आणी त्यातच भर म्हणून की काय, अचानकच रॉन जागच्या जागी खीलून ऊभा राहीला.
त्याने बाजूच्या दाट झाडीकडे लक्षपूर्वक पाहीलं. मोबालच्या फ्लँश लाईटचे प्रकाशझोत मारून तो तिथे वारंवार काहीतरी पाहण्याचा प्रयन्त करत होता. म्हणे लाईटच्या मंद प्रकाशात त्याला तिथून कोणाची तरी, मानवाकृती सावली धावत गेल्याचं चिञ दिसलं होतं.
" ए तू गप रे रॉन, आता ऊगाचच माझं डोकं खाऊ नकोस, एकतर तो वेब आपल्याला या जंगलात सोडून गेला. आणी तू म्हणतोस त्याचं भूत दिसलं होय तूला. "
" हो रॉन जँक बरोबर बोलतोय तूला कदाचीत भास झाला असेल " ज्युली
" भास वैगरे काही नाही मी, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहीलं. या झाडीतून नक्कीच कोणीतरी धावत गेला होता. "
" रॉन तू खंरच बघीतलंस ना. की ऊगाचच आम्हाला घाबरवण्यासाठी तू त्या वेबसारखी मस्करी तर करत नाहीस ना "
" अरे ही काय मस्करी करण्याची वेळ आहे का जँक, आईशप्पथ मी खोटं नाही बोलत आहे यार. तिथून खरंच कोणीतरी धावत गेला होता."
रॉनच्या बोलण्याची लय जँकने ओळखली. रॉन कधीच एवढा सीर्यस होऊन बोलत नसे. पण यावेळी माञ तो अगदी ऊतावीळ होऊन सांगत होता. त्याच्या डोळ्यात सत्य झळकत होतं. हे ज्युलीलाही कळल्यावाचून राहीलं नाही. ती आता पूर्णपणे घाबरली होती. क्षणभरात वेबने सांगीतलेला त्या जादुगराचा व राणीचा क्कीस्सा तीच्या नजरेसमोर येऊन ऊभा राहीला होता.
" कदाचीत तो वेबच भूत नसावा ?
छे कसं शक्य आहे. भूताचे पाय तर उलटे असतात ना.
जाऊदे आता हा विषयच ईथे थांबवलेला बरा. नाहीतर माझी भीती आणखीनच वाढत जाईल. मला यापूढे घाबरुन चालनार नाही " ज्यूलीने स्वतःशीच पूटपूटत स्वतःला धीर दिला.
" याचा अर्थ रॉन तूला हे म्हणायचं आहे की आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे तर ?" रॉनच्या बोलण्यातील गंभीरतेचा अंदाज लावत जँक विचारत होता.
" हो अगदी बरोबर बोललास " रॉन
" अरे पण अंस कोण का करेल ?" जँक
" ते मला कसं काय माहीत असणार ? " रॉन
" वेब "
ज्युलीने क्षणार्धात संर्वासमोर मनात लपवून ठेवलेली शंका बोलून दाखवली.
" पागल आहेस का तू ज्युली तो असं का करेल ? "
" मग मला सांग रॉन, वेब असा आपल्याला काहीही न सांगताच अचानक का गायब झाला ?"
" ते मला काय माहीत नाही, पण याचा अर्थ वेबच आपल्यावर नजर ठेवून असेल असं कशावरून ?" रॉन
" यावेळी कोण काय करतंय ते आपल्यासाठी फार महत्वाचं नाही. त्यामूळे आता आपल्याला लवकरात लवकर खाली ऊतरण्यासाठी काय करता येईल याचा विचार करायला हवा " जँक
नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्याच मनात आता भीतीचे वादळ घोगांवू लागले होते. चालून- चालून पायही दूखत होते. आणी महत्वाची गोष्ट म्हणजे एवढी शोधाशोध करूनसूद्धा त्यांना खाली ऊतरण्याची वाटही अजून सापडत नव्हती. त्यामूळे ऊगाचच व्यर्थ भटकण्यामध्ये काही अर्थ नव्हता.
म्हणून मग थोडा वेळ ते एकाच ठीकाणी विचार करत थांबले. एका मोठ्या काळ्या दगडाच्या आडोशाला डोकं टेकून ते विश्रांती घेत बसले होते.
पोरं खूप थकली होती. राञभर वेड्यासारखे फिरून त्यांचा घशाला कोरड पडली असावी. आणी त्यातच त्या काळ्या अंधाराची भीतीही त्यांच्या निरागस मनात आता रूजू लागली होती. ज्युलीच्या घरी कॉल करून कळवावं म्हटलं तर कोणाच्याच मोबाईलला रेजं येईना. खंरतर एवढा ऊशीर झाल्यामूळे घरी सांगण्यात आता काही अर्थ ही नव्हताच म्हणा. पण तरीही नकळत कसलीतरी नाजूकशी हूरहूर माञ प्रत्येकाच्याच मनात दाटू लागली होती. आतापर्यतं त्या तिघांच्या सोबतीला मोबाईल होता. म्हणून त्यांचे फावले होते. नाहीतर त्या दाट जंगलात ईतका वेळ त्यांची काय अवस्था झाली असती याचा विचार देखील करता आला नसता.
त्याने एकदा आपल्या मोबाईवरून नजर फिरवली. आणी मग तो पुन्हा-पुन्हा डिस्प्लेवर काहीतरी पाहत होता.
" काय झालं रॉन, ऊगाचच मोबाईलची बँटरी आता वाया घालवू नकोस. बंद कर " जँक
" हे बघ "
जँकला मोबाईल दाखवत रॉनने पेगं दिला.
" काय ?"
" अरे वेड्या वाजले बघ कीती ?"
" किती ?"
" अडीच "
" काय ईतका वेळ कधी निघून गेला. एवढा ऊशीर झाला ईथे आपल्याला ?"
" मला नाही वाटत. की आता आपण घरी पोहोचू "
येणारा प्रत्येक क्षण अगदी घरी परतण्याच्या आशेवर विरजण घालू लागला होता.
" मला आता फिरून-फिरून खूपच कटांळा आलाय यार "
" मलाही " पून्हा तोडांचा मोठा आ वासून पेग देतं रॉनने ज्यूलीच्या बोलण्याला दूजोरा दिला.
आपण यावेळी अंधारातून खाली कसे काय उतरनार आहोत ?" जँक
" मग काय करायचं, आता काय ईथेच आपलं बस्तान मांडायचा विचार आहे की काय तूझा " रॉन
" हो बरोबर बोललास, आता राञीचे आपण खंरच खाली उतरू शकत नाही "
" काय वेडा झालायेस का तू जँक ........... आपलं ठीक आहे. पण ज्यूलीचं काय ? तीच्या आईने तर आतापर्यतं सगळ्या सोसायटीत धूमाकूळ घातला असेल. तूला आठवंतय ना आपल्यासोबत ज्युलीला त्यांनी कीती वेळा पाहीलंय ते. त्यांचा पहीला संशय तर आपल्यावरच असणार "
" हो रे रॉन, आई खूपच काळजी करत असेल माझी. पण ठीक आहे, तूम्ही आता ठरवलंच आहे तर आपण राञभर ईथेच थांबू मग सकाळी लवकर ऊठून घरी जाऊ "
" आणी जर तूझ्या आईने विचारलं राञभर कूठे होतीस तर..........तर काय सांगणार आहेस तू ?" रॉन
" सांगेन की मैञीनीकडे झोपले होते. तीचा बर्थ डे होता म्हणून तीने मला राञी तिथेच थांबण्याचा आग्रह केला "
" हो आणी तूझ्या आईला हे सर्व खरंच वाटेल नाही का ?"
" मग काय करायचं आहे मी, तू तरी सांग ?" ज्युली यावेळी थोडीशी वैतागूनच बोलली.
" मला तरी असं वाटतं की आपण आजची ऊरलेली राञ ईथेच काढली पाहीजे. आणी मग सकाळी लवकर ऊठून घरी जाऊया" ज्युलीला शांत करत जँक समजावत होता.
" ठीक आहे मग, मी माझ्या आईला काय सांगायचं ते सांगेन "
" good,
ठरलं तर मग, आपण एखादी चांगली जागा बघून तीथे झोपूया. हवं तर जागं राहूया. आणी सकाळी लवकर ऊठून घरी जाऊ " जँक
" हो ज्युली, जँक बरोबर बोलतोय. या अंधारात आपण आता खरंच खाली ऊतरू शकत नाही "
अखेर रॉननेही त्या भयान जंगलात राञ काढण्याच्या निर्णयाला संमती दिली होती.
" सो गाईज लेट्स एनजॉय द वाईल्ड टूनाईट " रॉन
" कसलं एनजॉय मी तर आता ताबडतोब झोपणार आहे "
" मी पण "
" मग मी काय राञीचे मच्छर मारत बसणार आहे काय? "
" चालेल माझी काहीही हरकत नाही "
" माझीही "
" तुमच्या तर " रॉन
खरंच या वेळेला घरी परतणं त्या तीघांनाही जवळजवळ अशक्यच होऊन बसलं होतं. अखेर एकञ विचार करून त्यांनी जंगलातच राञ काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतू येणारा प्रत्येक नवा क्षण त्यांच्यासाठी जीवघेण्या समस्या घेऊन येणार होता.

क्रमशः
पुढील भाग लवकरच............

भाग ७ साठी
http//www.maayboli.com/node/61712

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users