चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 February, 2017 - 04:35

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्व्व, अदिती चे अभिनंनदन. ट्रेलर मस्त आहे. मुव्ही पण बघणार.
ट्रप्ड चा ट्रेलर बघितला. कळला नाही. फोन आहे लॅपटॉप आहे, फ्लॅट्च्या आतमधे आहे, ईतका काय पॅनिक व्हायच?

ट्रप्ड चा ट्रेलर बघितला. कळला नाही. फोन आहे लॅपटॉप आहे, फ्लॅट्च्या आतमधे आहे, ईतका काय पॅनिक व्हायच?

चारजर नसेल.. किंवा लाईट नसेल..त्या मजल्यावर तो एकटाच असेल...उगाच पॅनिक कशाला होईल नाहीतर?

ट्रॅप्ड च्या ट्रेलर मधे असे पण दाखावले आहे, त्या ईमारती मधे तो एकटाच असतो, लाइट जातात, फोन ची बॅटरी संपते, पाणी पण नाही...

काॅमिक्स लहानपणी खुप आवडायचे त्यावेळेस सुपरमॅन व स्पायडरमॅन ही आवडीची कॅरॅक्टर्स होती. नंतर पुढे हाॅलीवुड मुळे यात भर पडली एक्स मॅन, एव्हेंजरस , आयरन मॅन ह्या सर्वांची. हाॅलीवुड वाल्यानी ह्यावर जबरदस्त चित्रपट काढली दर्शक पुढील भागाची उत्कंठेने प्रतिक्षा करायचे. काल परवा Xmen सिरीज मधला Logan पाहिला जबरदस्त होता तर ह्या सर्व सिरीज पाहताना असे वाटत रहायचे की ही दुनिया कुठे तरी आहे एवढे जबरदस्त चित्रिकरण असायचे तर असाच अनुभव देणारा आपला स्वदेशी चित्रपट बाहुबली होता त्याचा दुसर्‍या भागाचा ट्रेलर पाहिला हा भाग पण जबरदस्त दिसत आहे . . . .

खास रुन्म्यासाठी माहीती
बाहुबली २ मधले १-२ गाण्यांचे संपुर्ण VFX शाहरुख च्या रेडचिली कंपनीने बनवले आहे.

Sonakshi Sinha & Ranbir Kapoor - 1969 - Trailer (Kishore/Madhubala, 2016)

https://www.youtube.com/watch?v=8kk_12iaWv0

रणबीर कपूरला अश्या अवतारात बघून आजकाल भितीच वाटते तो पिक्चर बघायची...
सोनाक्षी सिन्हा मधुबाला झालीय .. आणि तो किशोर कुमार ...
ट्रेलरमध्ये सर्वात चांगले काही वाटले असेल तर ते शेवटी मधुबालाचे ओरिजिनल फोटोग्राफस !

१९६९ चा ट्रेलर फेक आहे. मी सुद्धा फसले.. Lol
भारी आहे पण ... तरीच मी बोल्लो की मध्येच ओम शांती ओम ची एक झलक दिसलेली.. ते थिएटर आणि कारवाला सीन.. बाकीचे सीन कुठल्या पिक्चरचे आहेत? रणबीरचे ते बॉम्बे वेलवेट की काय त्यातले का? करण जोहरपण दिसलेला वाटते.. आणि सोनाक्षीला कुठून उचललाय?

अंजली, तुमच्या भाचीच्या मुवीबद्दल दाखवतायेत एबीपी माझावर. आदिती इनामदार, राहूल बोस, खरी पुर्णा तिघंही आलेत.

राहूल बोस मराठीपण बरं बोलतो. नटसम्राटमधे त्याचाच बंगला आहे आणि मराठी चित्रपट बघतो.

बेगम जान मधे विद्या बालन परत एकदा बाजी मारणार असे दिसतेय.. संवाद चांगले वाटताहेत. आशा भोसलेचे गाणे पण आहे त्यात.

अलिकडे काही तरुण, ट्रेलर्सची चिरफाड करुन, कथेबद्दल अंदाज वर्तवताना दिसतात. त्या क्लिप्स पण छान वाटतात बघायला. भरपूर डोकं चालवतात. बाहुबली २ बद्दल बरेच अंदाज वर्तवलेत.

अलिकडे काही तरुण, ट्रेलर्सची चिरफाड करुन, कथेबद्दल अंदाज वर्तवताना दिसतात. त्या क्लिप्स पण छान वाटतात बघायला.
>>>>
प्लस ७८६
मला सुद्धा आवडतात त्या बघायला

मी असा अजून ट्रेलर बघितला जो मला फेक वाटतोय. करीना आणि रणबीर कपुरचा. त्यात बरेच वेक अप सिड मधले प्रसंग आहेत. कुणी बघितला का? खरा आहे की फेक?

मी असा अजून ट्रेलर बघितला जो मला फेक वाटतोय. करीना आणि रणबीर कपुरचा. त्यात बरेच वेक अप सिड मधले प्रसंग आहेत. कुणी बघितला का? खरा आहे की फेक? >>>> तोच ना ज्यात रणबीर कपूरला cancer झालेला दाखवलाय. करीना कपुर त्याची बहीण दाखवलीय. अतुल कुलकर्णी च्या Happy Journey ची स्टोरी होती ती. Family Matter असे काहीतरी नाव होते त्या मुवीचे. मी बघितलाय तो ट्रेलर. फेक आहे तो.

कॉमेंट वाचल्या की कळते काय खरे काय खोटे ते...
ज्यांना ते खोटे आहे हे खात्रीपूर्वक कळते ते हा आपला शोध स्वतःपाशीच ठेऊ शकत नाहीत, कॉमेंटतातच.
हल्ली मी एकेका विडिओखालील कॉमेंटही वाचायला सुरुवात केलीय. शाहरूख, सलमान वगैरेंचे फ्यान आमीरखानच्या पिक्चरच्या ट्रेलरखालीही आपापसात भांडत असतात.

'सायलेंस' मराठी सिनेमाचा ट्रेलर पाहिला. गजेंद्र अहिरंचा आहे. सत्यघटनेवर आधारित आहे. नागराज मंजुळेंचा अभिनय पहायला आवडेल.

Pages