अंतर्मनाची शक्ती (intuition) की बोला फुलाला गाठ - देव जाणे

Submitted by वृंदा on 8 February, 2017 - 16:15

अंतर्मनाची शक्ती (intuition) की बोला फुलाला गाठ - देव जाणे

असं म्हणतात की सगळ्यांना अंतर्मनाची शक्ती असते फक्त अनेकांना माहित असते किंवा माहित असले तरी वापरता येत नाही.
अनेकांना पुढे काय घडेल ह्याचा अंदाज येतो (logical thinking )किंवा उत्स्फूर्त (intuition )पणे सुद्धा कळते.

मला सुद्धा अंतर्मनाची शक्ती आपल्यात आहे हा शोध आत्ता म्हणजे २-३ वर्षांपासून लागला आहे किंवा तो माझा भ्रम पण असेन . पण काहीतरी आहे हे नक्की .. माझे लॉजिकल थिंकिंग माध्यम आहे म्हणजे त्या पलीकडे असे नक्कीच आहे . मी माझे अनुभव सहज म्हणून शेअर करतेय .

१. २०१४ ची गोष्ट नुकताच व्हाट्स अँप वापरायला सुरू केलेले . तेव्हाचा हा अनुभव . त्या वर्षी अनेकदा लोक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बद्दल लेख ग्रुप वर पाठवायचे ते पाहून मला खूप अस्वस्थ आणि वाईट वाटायचं जे सगळ्यांनाच वाटते . एकदा मात्र न राहवून एका अशाच ग्रुप ला म्हणाले "आपण काहीतरी करू या " असे वाटत होते की फंडस् गोळा करून (like help age India ) त्यांना पैसे पाठवू या पण कोणी म्हणजे कोणीच प्रतिसाद दिला नाही मग मी पण व विषय सोडून दिला पण आईला म्हणाले " आई , कोणीतरी मोठे माणूस किंवा प्रसिद्ध लोकांनी पुढाकार घेऊन त्या लोकांना मदत केली तर बरं होईन त्यांचे लोक पण ऐकतील ( कारण माझे कोणी ऐकले नाही) " खूप तळमळीने म्हणाले आणि काय आश्चर्य पुढच्याच वर्षी सप्टेंबर २०१५ ला नाना पाटेकर आणि मकरंद अनारसपुरे ह्यांनी "नाम " म्हणून संस्था स्थापन केली आणि हो माझा खूप आवडता नट म्हणजे अक्षयकुमार ने सुद्धा आत्महत्याग्रस्त लोकांना मदत केली !!
मला तर खूप खूप आनंद झाला माझं खरे ठरले त्यापेक्षा काहीतरी चांगली सुरुवात झाली त्याचा !!

२. २००२ ची गोस्ट तेव्हा नुकतंच टीव्ही केबल घेतलेलं तेव्हा "सुरताल" म्हणून गाण्यांचा प्रोग्रॅम लागायचा झी मराठी वर .. तेव्हा एक ६-७ वर्षांची चिमुरडी एका छोट्या स्टुलावर बसून गाणे गायची ..आवाज तर खूप चॅन होता पण त्यापेक्षा ती खूप गोड आणि सुंदर दिसायची मी तेव्हा एकदा म्हणाले " हि मुलगी पुढे हिरोईन होणार बघ " आणि तसंच खरं ठरलं ती म्हणजे "टाइमपास " पिक्चर ची हेरॉईन केतकी माटेगांवकर !!!
अगदी तसंच २००९ ला "लिटल चॅम्प सारेगमपा " ला जेव्हा मी आर्या आंबेगावक ला पहिला तेव्हा ती नववीत आणि सगळ्यात मोठी कॉन्टेस्टंट होती . मी म्हणाले हि छान आहे दिसायला फक्त दात ठीक केले कि छान दिसेन आणि तसं आणि तसाच घडले . आर्या ने हेरॉईन म्हणून सुरुवात "ती सध्या काय करते " मधून केली !!!

३. मला थोडीफार पत्रिका कळते माझ्या एका मैत्रिणी ची सहजचं पत्रिका पहिली ( मी ज्योतिषी नाही आणि चुकून पण होणार नाही ... कारण नंतर सांगेन ) तर तिच्या पत्रिकेत "प्रेम विवाहाचे " योग होते आणि तिचे पण एका मुलावर प्रेम होते पण घरचे जात वेगळी म्हणून विरोध करत होते म्हणून त्याच्याशी लग्न होईल का म्हणून विचारात होती .. मी म्हणाले "काळजी करू नकोस .. घरचे कितीही विरोधात असले आणि अरेंज मॅरेज साठी कितीही प्रयत्न केले ..मुले पाहिलीस तरी तुझे लव्ह मॅरेज च होणार " तसंच खरं झालं त्या मुलाशी लग्न झालं पण माझ्यामनात ते लग्न यशस्वी होणं नाही असं मन सांगत होतं आणि झालंही तसंच खूप वर्षांनी कळले तीच त्या मुलाशी डिवोर्स झाला आणि लगेच तिचे दुसरे लग्न ठरले आणि मजा म्हणजे त्या मुलाने मागणी घातली आणि तिला हि आवडत होताच म्हणजे दुसरेही लव्ह मॅरेज !!

साल २००७ ची गोस्ट असेन अजून एक मैत्रिणीची पत्रिका पाहिली पण सगळीकडे डिव्होर्स चे योग होते पण मी तसं तिला सांगितलं नाही नंतर कळलं कि तिचे वैवाहिक लाइफ चांगले नव्हते आणि लवकरच डिव्होर्स घेणार आहेत आणि तो झालाही .. मला त्याचे खूप मनापासून वाईट वाटले !!!

४. साल २०१४ असेच एका मैत्रिणीची पत्रिका बघून सांगीतल की तु आणि तुझा नवरा नक्कीच abroad ला जातील आणि लगेच २-३ महिन्यात गेली पण !!( आजकाल १० पैकी ८ जातात ..त्यामुळे हा फक्त योगायोग होता ) मला खरंतर बघून नाही कळत पण सगळे उत्स्फूर्त पणे बोलून गेले !!

५.साधारण एप्रिल २०१४ ची गोस्ट असेन मी जवळच्या ' खंडोबा ' मंदिर ला आई बरोबर गेले . तेव्हा मी आई ला खंडोबा चा इतिहास विचारत होते
पण ती म्हणाली फारशी माहिती नाही तेव्हा मी म्हणाले ' खंडोबाची ' माहिती कुठून मिळाली तर बरे होईन किंवा ह्यावर कुठली सिरीयल यायला हवी आणि काय आश्चर्य लगेच म्हणजे मे २०१४ पासून "जय मल्हार " नावाची सिरीयल सुरु झाली !!

अनेकदा मी जे बोलते तसंच नंतर घडते किंवा तशी बातमी कानावर येते.

मजा म्हणजे मी जे काही खात असेन म्हणजे भेळ , एकादी भाजी किंवा काही खाण्याचं विचा येत असेन तसंच थोड्यावेळाने t.v सिरीयल मध्ये दिसते . मला ह्याची मात्र खूप गम्मत वाटते.

असे अनेक आणि बरेच अनुभव आहेत फक्त खंत म्हणजे स्वतःबद्दल काही फारशी intuition नाही . एवढा आठवतंय २००४ ला खुप अस्वस्थ होते खूप म्हणजे खूपच !!! पुढचा आपला काळ कठीण आहे हे मला आतून वाटत होते ( कदाचित कुणाला नकारात्मक विचार वाटेन ) आणि तसच झालें कठीण काळ अजूनही संपला नाही त्यात अनेक ज्योतिष वाऱ्या झाल्या पण समाधान नाही उलट काही ज्योतिष लोकांमुळे उरले सुरले hopes पण संपलेत ( काही चांगले पण ज्योतीषी असतील )आणि मिळाला तो म्हणजे नुसता मनस्ताप !!!( अजूनही अस्वस्थ आहे आणि मी ह्यावर काहीतरी लिहावे असे वाटते .. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढली तरी चालेन पण ज्योतीषीच्या नादी लागू नये .. तुम्हाला फक्त संताप आणि मनस्ताप मिळेल .. म्हणजे कसं आ बैल मुझे मार )

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वृंदा, तुमची वरची पोस्ट महान आहे म्हणजे ज्या पोस्टवर कोपरापासून हात जोडण्यात आले ती पोस्ट..
>>त्या मुलाला एक ४ वर्षाची मुलगी आणि २ वर्षाचा मुलगा आहे . बायकोचे वय पण बरेच तरुण म्हणजे २२-२३ आहे>> हे कसं? १८ पूर्ण व्हायच्या आतच लग्न लावून दिलं का?

गांजलेले, खच्ची झालेले लोक ज्योतिषाकडे का जातात ? मायबोलीवर येऊन धागे काढावेत त्यांनी. मोफत सल्ला मिळेल.

अतुल, माहितीपूर्ण पोस्ट Happy इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

>>>>> उदाहरणार्थ: एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी ग्रह ताऱ्यांची स्थिती अमुक अमुक असेल तर त्या व्यक्तीचे आयुष्य अमुक अमुक प्रकारचे असते असे आजवरचे अनुभवजन्य ज्ञान आहे. यामध्ये मनाच्या किंवा अतींद्रिय शक्तीचा संबंध जवळ जवळ नाहीच. अर्थात हे माझे वैयक्तिक मत. <<<<
याबाबत, मी आधीच्या पोस्ट्मध्ये लिहिल्याप्रमाणे, केवळ ग्रहगणित व त्यांचे अंशात्मक योग बघुन, निरनिराळ्या प्रकारच्या कुंडली मांडून भविष्य सांगता येतेच. त्यास अतिंद्रीय शक्ति हविच असे नाही. पण असल्यास उत्तम. का ते पुढे सांगतो.
मात्र यामध्ये "ज्यास शक्य" आहे, तो सुतावरुन स्वर्ग गाठण्यासारखे, अतिंद्रीय शक्तिं वापरुन घेऊ शकतो.

बंव्हशी, पूर्वायुष्य बघताना अतिंद्रिय शक्तिंचा वापर फारसा करावा लागत नाही, मात्र भविष्यकाळ बघताना, पुढील पाचपंचवीस वर्षांतील गोचर ग्रहयोग अगदी पाठ असले तरीही, त्यामुळे होण्यार्‍या असंख्य कॉम्बिनेशन्स (रचनांमुळे) काय होईल "ते नेमके सुचायला, उत्स्फुर्तता येऊन नेमक्या महत्वाच्या त्याच योगांवर लक्ष केंद्रित होण्यास अतिंद्रिय शक्तिंची मदत होते, असे माझे स्वानुभवाचे मत आहे.

लिंबुजी आपण मत व्यक्त केलेत ते अनेक ज्योतिषी करतात. फक्त श्री श्री भटांसारखे लोक मात्र ज्योतिषाला विज्ञानच्या मान्यतेचा आग्रह धरतात.
http://mr.upakram.org/node/991 यातील क्रमांक ६ चा मुद्दा

तुम्ही लेमन टेमन न म्हणता लिंबुजी म्हटलंय. Wink<<
अगदी टंकताना मनात आलच होत कुणाच्यातरी लक्षात येईल म्हणून . अंतस्फूर्ती... दुसर कायं? Happy

>> हो पण मी काही गंडे दोरे , रत्ने ,यज्ञ , नवस , उपास तपास नाही करत !!
का नाही करत? वरील उपायांनी फायदा झाला असं छातीठोक पणे सांगणारी कित्येक लोकं भेटतील.

>> तुमच्यासारख्या विज्ञानवादी लोकांना जगायचा आणि बोलायचा अधिकार आहें तसंच श्रद्धाळू आणि अंध श्रद्धाळू लोंकांनाही !!
ओ काय तुम्ही सारखं सारखं जगायच्या अधिकाराबद्दल बोलताय!! हा अधिकार इथे कधी आणि कोणी नाकारला?? उगाच स्ट्रॉमॅन बनवायचा आणि वाद घालायचा Angry

बाकी तुम्ही स्वतः पण विज्ञानवादी दृष्टिकोनातून प्रवास करत आहात ना? (संदर्भ : माझा स्वतःचा प्रवास तरी विज्ञानवादी दृष्टिकोनातून श्रद्धा -अंधश्रद्धा कडे चालला आहे) मग बाकी विज्ञानवादी लोकांना का टाकून बोलताय?

@ टग्या : मी कुणाला टाकून बोलत नाही. प्लिज असे काही बोलू नका . मला वाद हि घालायचा नाही .दॅट्स इट Happy

@ अमितव : तुम्हाला माझी पोस्ट , माझे बोलणे अगदी मी स्वतः माणूस म्हणून आवडत नसेन तरी काही हरकत नाही. फक्त एक विनंती आहे प्लिज तुम्ही जे मला "तुमच्या भविष्यात केवळ आणि केवळ भरभराट आहे. पांढरं घर मिळेल तुम्हाला " ते काढून टाकू शकाल का . मला खरंच आवडले नाही आणि खूप वाईट वाटतंय . बाकी मला काहीच बोलायचे नाही. धन्यवाद .

@सायो : पोस्ट आवडली नसेन पटली नसेन काहीच हरकत नाही . शेवटी मी माझे अनुभव माझ्या दृष्टिकोनातून लिहिणार . असो. तुम्ही म्हणालात मुलीचे वय २२-२३ कसे तर नक्की वय मलाही माहित नाही पण साधारण २५ च्या आत आहे एवढेच कळले . गावाकडे अजूनही मुला मुलीची लग्ने खूप लवकर वयात होतात आणि मी स्वतः पहिले आहे .

>>>> लिंबुजी आपण मत व्यक्त केलेत ते अनेक ज्योतिषी करतात. फक्त श्री श्री भटांसारखे लोक मात्र ज्योतिषाला विज्ञानच्या मान्यतेचा आग्रह धरतात. <<<< शक्य आहे.

"अंतस्फुर्ति" वगैरे बाबींवर आम्ही काही बोलू लागलो तर बहुसंख्य विज्ञानवादी वरील (अलिखित) उदाहरणे देउन प्रश्न निकालात काढतात. पण प्रश्न शिल्लकच रहातो की अंतस्फुर्ति वगैरे बाबत विज्ञान काय म्हणते? खरे तर विज्ञान काय म्हणते असे म्हणण्या ऐवजी स्वतःस "विज्ञानवादी/बुप्रावादी" समजणारे लोकं काय म्हणतात?

असे आहे, की न्युटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, हे घासुन घासुन गुळगुळीत झालेले वाक्य असंख्यवेळेस सामोरे येऊन गेले. तर या न्युटनला तो शोध कसा काय लागला अशी माहिती काढली तर कळले की, झाडावरुन पडणारे फळ पाहुन न्युटनला गुरुत्वाकर्षणाबाबत काहीएक सुचले.

आता न्युटनच्या काळापर्यंत हजारो वर्षात मानवजातीतील यच्चयावत मानवाला वरुन काहीतरी खाली पडताना दिसलेच असेल, तरी गुरुत्वाकर्षणाबाबत सुचायला न्युटनला इतकी हजारोवर्षे जावि लागुन त्याला तसे काही सुचणे ती एकमेव घटना ठरली. पण तरीही या सुचण्याला एकतर "अंतस्फुर्ति" म्हणायचेच नाही, वा म्हणले तरी "विज्ञानवादी/बुप्रावादी" त्या अंतस्फुर्तिची चिकित्सा एकतर करणार नाहीत, केलीच तर त्यास कोणता तरी योगायोग्/सिंन्ड्रोम / वा मेंदुतिल केमिकल लोचा/वा अपवाद म्हणुन त्या "अंतस्फुर्तिची" वासलात लावणार, या अंतस्फुर्तिचे अस्तित्व येनकेनप्रकारेण नाकारणार . हा कसला "वैज्ञानिक दृष्टिकोन ते मला कधीच कळले नाहीये........
कदाचित माझी "अंतस्फुर्ति" हे वैज्ञानिक्/बुप्रावाद्यांचे थोतांड समजुन घ्यायला कमी पडत असेल... Proud

वृंदाजी, स्वतः ची फसवणू क करून घेणे कृपया थांबवा. जगायचा अधिकार सर्वांना आहे. तो प्रश्न इथे नाहीच. पण अंध श्रद्धा फैलावू नका.
ते खूप पैसे घेतात ज्योतिषी त्यांचा तरूण मुलगा वारला वगैरे कथा अगदीच काहीतरी संबंध जोडलेली आहे. हार्ट अ‍ॅटेकची अनेक कारणे असतात. आजकाल तरूण मुलांना सदो ष जीवन पद्धतीमुळे व मधुमेह सिगरेट दारू व्यसनांमुळे लवकर हार्ट चे त्रास सुरू होतात. जे ते वारले त्यांची मेडिकल हिस्टरी बघा. वडिल ज्योतिष सांगतात ह्याचा काहीच संबंध नाही. ते अनाथ असते तरी अश्या हिस्टरी मुळे जायचे तेव्हा वारले असते. असले किस्से वाचून इतर लोकांची दिशा भूल होउ शकते. जीवनात समोर येणार्‍या परिस्थितीचा स्वीकार करून प्रसंगी लढून त्यातून मार्ग काढायचा असतो. ज्योतिष वगैरे ने काही होत नाही. परिस्थितीची जाणीव पाहिजे. तुमच्या इतर पोस्टी पाहता वडिलांचा दुरावा आला आहे. घरून काम करणे आवश्यक आहे. असे समजते तर दुरावा दु:ख ह्यांना धीराने सामोरे जा व जीवनात नेटाने उभ्या राहा. आपण मानसिक दॄ ष्ट्या व्हल्नरेबल असतो तेव्हाच अंध श्रद्धेचा घाला आपल्यावर होतो व सोपी स्वस सोल्युशन्स हवीशी वाटतात. पण टेक द ट्रू टफ वे आउ ट ऑफ एनी सिचुएशन. ह्यामुळे तुम्ही मनाने स्ट्राँग व्हाल. डिप्रेशन वगिअरेचा त्रास होत असेल तर तपासण्या करून घ्या. व औषधे घ्या.
इंट्युइशन योगायो ग ह्या सर्व अगदी सेकंडरी गोष्टी आहेत. प्रत्यक्ष अनुभव, फिजिकल डाटा महत्वाचा. सत्य महत्वाचे. त्या वर लक्ष द्या तुम्हाला खूप शुभेच्छा.

आता न्युटनच्या काळापर्यंत हजारो वर्षात मानवजातीतील यच्चयावत मानवाला वरुन काहीतरी खाली पडताना दिसलेच असेल, तरी गुरुत्वाकर्षणाबाबत सुचायला न्युटनला इतकी हजारोवर्षे जावि लागुन त्याला तसे काही सुचणे ती एकमेव घटना ठरली.
>>>>

मी शाळेत साधारण दुसरीत असताना ईतिहासाच्या बाईंना हा प्रश्न विचारलेला. जेव्हा बाई फळ्यावर लिहीत होत्या तेव्हा त्यांचा खडू तुटून खाली पडला. मी एकटाच वर्गात हसलो, ते देखील पहिल्या बाकावर बसून. बाईंनी उचलला तोच खडूचा तुकडा आणि मारला मला. पण नेम चुकला तसे मी पुन्हा हसलो. त्यांनी मग डस्टर उचलला. चुकून यावेळी नेम चुकवायला जमला नाही तर.., या भितीने मग मी बाईंचे ध्यान दुसरीकडे वेधायला त्यांना हाच प्रश्न विचारला, बाई तुम्ही कधी विचार केला आहे की तुमच्या हातातून तुटलेला खडू खालीच का पडला, तो वर का नाही गेला किंवा हवेतच का नाही तरंगला... गंमत म्हणजे तोपर्यंत गुरुत्वाकर्षण नावाचा प्रकार मला माहीतही नव्हता, दुसरीच्या सिलॅबसमध्येही नव्हता. थोडक्यात मी थेट न्यूटनसारखा विचार केलेला. पण बाईंनी याचे कौतुक करायचे सोडून उलट मला म्हणाल्या, उगाच आगाऊपणा करू नकोस, स्वतःला काय न्यूटन समजतोस का? गंमत म्हणजे मला तेव्हा न्यूटन हे नाव माहीतही नव्हते..
अवांतर वाटत असल्यास क्षमस्व, पण सांगायचा मुद्दा हा की सुचत असते आपल्यालाही काहीबाही, बस्स आपल्याला उत्तेजन न मिळाल्याने आपण त्याचा पाठपुरावा करत नाही ईतकेच. उगाच त्या न्यूटनचे कौतुक करू नका. आणि एका सायंटीस्टला घेऊन अंधश्रद्धा पसरवू नका..

न्यूटनला फलज्योतिष, हस्तसामुद्रिक, अंक्ज्योतिष, बीजभविष्य, पोपटज्योतिष याचे जराही ज्ञान नव्हते. यावरून तो मंद असावा असे म्हणतात. त्याला फक्त सफरचंद आवडायचे. लहान पणापासून स्वतःसहीत कित्येक वस्तू खाली पडायच्या पण त्याच्या डोक्यात कधी म्हणून प्रश्न आला नाही, पण झाडावरून सफरचंद काय खाली पडले, त्याला दिव्य ज्ञान झाले
बरं त्याच्याच डोक्यात सफरचंद पडले, जर नारळाच्या झाडाखाली झोपला असता तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला असता का ?
अशा माणसाला प्रसिद्धी देऊन मोठा करणे हा पुरोगाम्यांचा कट आहे.

अमा धन्यवाद . तुमची कळकळ योग्य आहे . फक्त एक सांगते कि मी अंधश्रद्धा पसरवत नाही आणि हो तुम्ही सांगितले ते योग्यच आहे कारण आत्तापर्यंत आलेल्या माहितीनुसार त्या मुलाचा मृत्यू हा अयोग्य जीवनशैली किंवा स्वतःबद्दलचा हलगर्जीपणा , तपासण्या करून न घेणे ,घरच्यांपासून त्रास लपवणे यामुळे झाला आहे. राहिला माझ्यामुळे इतर लोकांची दिशा भूल होउ शकते तर असे होणार नाही कारण कोणी माझ्या बाजूने आहेत असे वाटत नाही आणि सगळेच स्वतंत्र्य विचाराचे आहेत Happy

मला स्वतःला पर्सनल बोलायला फारसे आवडत नाही . पण अशा लेखांमुळे उगाचच आपले पर्सनल लाईफ आणि विचार लोकांना कळतात तर ते मात्र मी नक्की सुधारेन Happy

राहता राहिला डिप्रेशन चा प्रश्न तर मला ह्याबद्दल फक्त एवढाच बोलायचंय की मनाने कमजोर तर कधी कधी स्ट्रॉंग माणसे पण त्याची शिकार होतात . आपल्या इथे त्याचा इतका अवेअरनेस नाहीये . मग कुणाबद्दल वाईट ऐकले , आत्महत्या केली की आपण जागे होतो पण तेही तेवढ्यापुरतेच !! त्याचे मात्र मनस्वी खुप वाईट आणि खंत वाटते !! Sad

The POWER of Your Subconscious Mind
Joseph Murphy
वरील पुस्तक अंतर्मनाच्या शक्तिवरच लिहिलेय.
नेटवर फुकटात उपलब्ध आहे.

हो चांगले आहे पुस्तक आणि द सीक्रेट पण छान आहे अर्थात ज्यांचा ह्या गोष्टीवर विश्वास त्यांच्यासाठीच !!निदान सेल्फ हेल्प साठी तरी वाचायला काही हरकत नाही

पण मला स्वतःला "किमया अंतर्मनाची " पुस्तक हे प्रा . मधुकर दिघे ह्यांचे खूप आवडते . मुंबईला खार ला असतात . अतिशय छान आणि सुटसुटीत आहे . विदेशी छाप नाही !! आणि हो अंतर्मन खरे असेन किंवा खोटे पण शब्दात सामर्थ्य असते असे मला तरी वाटते Happy

@taimur ; अहो मी कधी म्हटलंय की intuition किंवा भविष्य वरचे पुस्तक आहे . त्यात positive विचार आणि अंतर्मन (subconcious mind ) बद्दलच सांगितले आहे

>>वृंदाजी, स्वतः ची फसवणू क करून घेणे कृपया थांबवा. जगायचा अधिकार सर्वांना आहे. तो प्रश्न इथे नाहीच. पण अंध श्रद्धा फैलावू नका.<<
अमा, तसे ते नसावे. या प्रकारच्या लोकांना प्रामाणिकपणे जे वाटते ते ते शेअर करत असतात. त्यामुळे स्वत:ची ती फसवणूक नसते. राहिला प्रश्न अंधश्रद्धेचा तर त्यांच्या दृष्टी ने तो त्यांच्या समजूतीचा / श्रद्धेचा भाग असतो. आपल्या विचारांचा /श्रद्धेचा भाग प्रसार करण्याचे स्वातंत्र्य अनेक जण घेत असतात तसे तेही घेतात. ते पटण्या/ न पटण्याचे स्वातंत्र्य बाकी सर्वांना असतेच. त्याचे समर्थन वा प्रतिवाद करण्याचे ही असते . यातूनच सकस अशी चर्चा होते,

ऋ तु दुसरीत असलं काही विचारलेलंस? कित्ती कित्ती ग्रेट तु. तेव्हापासुनच असा आहेस ना.

अर्ली हार्ट अ‍ॅटेकचे खरे कारण वेगळे आहे. तो का आला त्याचा घटना क्रम वेगळा आहे. पण अशे नॅरेशन वाचले की जे लोक आधीच व्हल्नरेबल आहेत ते हो नक्की असेच काहीतरी असेल. मी आयुष्यात काहीतरी पाप केले व त्याची सजा म्हणून नातेवाइकाला हार्ट अ‍ॅटेक आला असे समज करून घेउ शकतात व त्यांचे गिल्ट वाढू शकते. प्रत्येक जण आपापल्यावेळेला जातेच. कोणी थांबवू शकत नाही. अगदी एका घरात प्रेमाने नांदणार्‍या सुस्वभावी लोकांचे जीवन आलेख पण प्रत्येकी वेगवेगळेच असतात. आपल्या मराठीत कावळा बसायला व फांदी तुटायला एक गाठ अशी म्हण आहे. तसे होउ नये.

माझे मिस्टर वारले त्या आधी शनिवारे संध्याकाळी मी घरासमोर चालत होते व ऑरेंज ड्रेस घातलेला एक माणूस एकदम समोर आला व पैसे मागितले. नेमके मी किल्ली घ्यायला आली असल्याने हातात काहीच पैसे नव्हते. रात्रीतून नवर्‍याला हार्त अ‍ॅ टेक येउन तो वारलाच.
मग नंतर विचार करताना मला खूपच दिवस असे वाटत असे की आपल्याला साडेसाती चालू आहे. ते शनी महाराजच आले असतील आपण काही देउ शकलो नाही. व त्याचा मृत्यू झाला. पण दोन्ही घटनांचा परस्पर संबंध काहीही नाही. त्याने सत्तरच्या दशकात पहिली सिगरेट कधी ओढली असेल तेव्हाच त्याचा मृत्यू निस्चित होता. आम्ही फक्त विटनेस. हे सर्व ज्ञान मला नंतर विचार करून आले व ते गिल्ट काढून टाकताना फार प्रयास झाले. ऑब्जेक्टिव थिंकिंग रिअली वर्क्स. भावना प्रधान होणे, मला इंट्युइशन चे वेगळे ज्ञान आहे वगैरे समजणार्‍या लोकांनी हॉगवर्ट मध्ये अ‍ॅडमिशन घ्यावी. खर्‍या अवघड जगात व जीवनात असली थॉट प्रोसेस काम करत नाही.

त्याने सत्तरच्या दशकात पहिली सिगरेट कधी ओढली असेल तेव्हाच त्याचा मृत्यू निस्चित होता
>> जे सिगरेट ओढत नाहीत ते हार्ट अटॅकने मरण पावत नाहीत? अचानक हार्टअ‍टॅकने मृत्यू ची अनेक कारणे असतात. धडधाकट निर्व्यसनी माणसे क्षणात थंड होतात. आणि चेनस्मोकर, दारुत धुत्त असणारे वर्षानुवर्षे जगतात. त्यामुळे मृत्यूचा कार्यकारणभाव वैज्ञानिक कसोटीवर (तीही लिमिटेड वॅलिडीटी वाली) खरा ठरला तरच मानणार हा हट्ट अनाठायी आहे. खर्‍या जगात दोन अधिक दोन चार असे सरळ उत्तर नसते. प्रत्यक्ष जीवन इतकं सिम्पल आणि क्लिअर नसतं.

शेवटी कितीही उड्या मारल्या तरी नशीब हा जो भाग आहे, वैयक्तिक आयुष्यातला हा नाकारु शकत नाही. विलासराव देशमुखांसारख्या गडगंज श्रीमंत, राजकारणी व्यक्तीला, ज्याचे लाखो फॉलोअर्स आहेत, जगातले सर्वोत्तम डॉक्टर्स, इस्पितळं, तंत्रज्ञ दिमतीला आहेत, प्रत्यारोपणासाठी एक अवयव मिळत नाही, आणि कैक गरिबांच्या महागड्या शस्त्रक्रिया मोफत होऊन जातात तेव्हा नशिब मानावेच लागते.

आणि हो, जी ज्योतिषी, भिक्षुकी, पुजापाठ करणारी मंडळी आहेत त्यांनी त्या व्यवसायाचे पावित्र्य नाही राखले तर पुढच्या पिढीला त्रास भोगावे लागतात, ज्यांनी सचोटीने-निरपेक्षभावाने कार्य केले त्यांच्या पुढच्या पिढ्यांची भरभराट झाली हेही अनुभव आहेत.

तसेच सरकारी खात्यातून जनसामान्यांना नाडून हरामाचा पैसा खाणार्‍यांचे सर्व पैसे स्वतःच्या, मुलांच्या आजारपणांमधे खर्च होतात, लाभत नाहीत असेही बघितले आहे. तेव्हा ही अंधश्रद्धा आहे असे म्हणून टाळू नका. ह्याचा जास्तीत जास्त प्रसार करा.

तसेच सरकारी खात्यातून जनसामान्यांना नाडून हरामाचा पैसा खाणार्‍यांचे सर्व पैसे स्वतःच्या, मुलांच्या आजारपणांमधे खर्च होतात, लाभत नाहीत असेही बघितले आहे. >> याचा अर्थ मंत्री, आमदार खासदार प्रामाणिकपणाने काम करतात.

आणि हो, जी ज्योतिषी, भिक्षुकी, पुजापाठ करणारी मंडळी आहेत त्यांनी त्या व्यवसायाचे पावित्र्य नाही राखले तर पुढच्या पिढीला त्रास भोगावे लागतात, ज्यांनी सचोटीने-निरपेक्षभावाने कार्य केले त्यांच्या पुढच्या पिढ्यांची भरभराट झाली हेही अनुभव आहेत.

हे सर्वच व्यक्तीना लागू आहे.

सपनाताई, आमदार-मंत्री-खासदार आपले आजार, व्यक्तिगत समस्या सार्वजनिकरित्या जाहिर करतील तर कदाचित कळेलही.. Happy
उसकी लाठी होती है ना, उसकी आवाज नही होती... पण बहुत जोर से पडती है..

मला एक प्रश्न खूप दिवसांपासून पडतोय आणि मला त्याचे उत्तर हवे आहे . कुणाला वेडेपणा वाटेनंही पण मला जो पर्यंत मिळत नाही उत्तर तो पर्यंत नाही स्वस्थ बसत आणि हो मी ह्या बाबतीत खूप गंभीर आहे .

असं म्हणतात की कर्म तसे फळ आणि ते मान्य हि आहे . जसं खूप अभ्यास केला म्हणजेच कर्म केले की पास होणे हे फळ मिळते . मी अगदी बेसिक उदाहरणच घेतले आहे . मग अनेक लोक वाईट कर्म करतात त्यांचे वाईट झाले असे नाही .ठीक आहे वाईट झाले नाही ते चांगलेच आहे कारण कुणाचेच वाईट नको होवो हे अगदी ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात . पण त्याहीपेक्षा जे चांगलीच कर्मे करतात . अगदी कायिक , वाचिक आणि मानसिक कर्म चांगले केले तरीपण त्यांना चांगले फळ मिळत नाही . तर अनेकांचे म्हणणे असते मागच्या जन्मीचे कर्म वाईट असेन . पण ह्याचेच खूप आश्चर्य वाटते !!!

देव इतका कसा हळूहळू काम करतो कर्माबद्दल . ह्या जन्माचे फळ हे ह्या जन्मीचे हवे ना ! का म्हणून कॅरी फॉरवर्ड ???
आजकल तर फास्ट चा काळ आहे . सगळंच इन्स्टंट आहे मग कर्माच्या बाबतीत असे कसे देव करतो ?? का कर्माच्या सिस्टिम मध्ये बिघाड आहे !!
का हे पण थोतांड आहे???? आणि जर खरच मागच्या जन्मीचे भोग / कर्म असेन तर ते का नाही कळतं ?? अनेक अध्यात्मिक गुरु , ज्योतिष म्हणत असतील की तुझे चांगले होणार नाही प्रगती होणार नाही तर ते मागच्या कर्मामुळे मग ते मागचे कर्म का ते सांगू शकत नाही ???मला नक्कीच जाणून आहे माझे मागचे कर्म कदाचित त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे कदाचित मिळतील !! पण असे कोणी मला भेटलेच नाही . कुणाला असे विचारणे खूप irritating वाटेन पण मला जाणून घ्यायचे आहेच !!!

कदाचित हे कळले (चांगले किंवा वाईट कर्म ) तर मन तरी शांत होईन . आपले असे कसे त्याचे उत्तर मिळाल्यामुळे जे काही दिवस आहेत ते accept करून आनंदात तरी माणूस राहीन ना !!! Happy

कर्म हि कन्सेप्ट मान्य असली तरी मागच्या जन्मीचे कर्म / भोग हे काही माझ्या पचनी पडत नाहीच्च !!!

Pages