आक्रोश

Submitted by गवंडी ललिता on 2 February, 2017 - 02:21

आसपास घडणारे अमानुष घटना ऐकल्यानंतर मन विषण्ण होऊन जाते........
आणि आईच्या आक्रोश दाही दिशांनी न्यायासाठी झगडतो.....................

आक्रोश

नऊ महिने नऊ दिवस वाढवले पोटी
विचार नव्हता मनात मुलगा मुलगी खोटी....

तान्हुलं असावं गुणी हर्ष हाच होता मनी
आईपण दिले जगी याहून नाही थोर कुणी......

आज आक्रोश निनादतो दाही दिशांनी
कधी काय होईल न येते ध्यानी मनी......

कोवळ्या जीवाचा जीव त्यांनी घेतला
धीर कसा धरू ? अरे रक्त सडा शिंपला........

कधी मिळेल न्याय ? निरपराध जीवाला
बाळ येईल कसं ? काय करू उपायाला...........

नको तुमची आश्वासनं पांढरपेशी मनाला
कशाला खोटी सहानुभूती मीच आवरते मनाला......

ललिता गवंडी

Group content visibility: 
Use group defaults

मस्त !