मुलगी म्हणून का?

Submitted by गवंडी ललिता on 30 January, 2017 - 00:02

मुलगी म्हणून का?

विनवते आई तुला जन्म घेवू दे पोटी
आई म्हणण्याचं भाग्य उजळू दे ओठी

अंकुरु दे जीव माझा आई तुझ्या उदरी
जन्म घेण्या आधी नका मारू अंतरी

जन्मी माझ्या येईल सुखाची भरती
जगभर पसरेल मग तुमचीच किर्ती

आईबाबा करू नका माझी अवहेलना
दारी तुमच्या वाहील हो समृद्धीचा झरा

‘स्त्री’ मीही आहे, अंगी माझ्या लीनता
मुलासाठी तुम्ही असे का हो झगडता ?

नका होवू उदास, जरी मी असे मुलगी
म्हतारपणी तुमच्या असेल माझी सलगी

- ललिता गवंडी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हृदयस्पर्शी कविता !! ‘मुलगी नको’ असं म्हणणारे अनेक महाभाग आपल्या समाजात आजही मोठ्या संख्येने आहेत, पण या संकुचित विचारसरणी पलिकडे आपल्या लेकीवर निखळ प्रेम करणारे आई-वडीलही आहेत. मुलगीसुद्धा मुलाएवढीच सक्षम असते हे सर्वानी समजून घेतले तर स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल!

नका होवू उदास, जरी मी असे मुलगी
म्हतारपणी तुमच्या असेल माझी सलगी तुमच्या सगळ्याच कविता अप्रतिम असतात. ही कविता पण लय भारी...!

‘स्त्री’ मीही आहे, अंगी माझ्या लीनता

मुलासाठी तुम्ही असे का हो झगडता ?

नका होवू उदास, जरी मी असे मुलगी

म्हतारपणी तुमच्या असेल माझी सलगी >>>>खुप छान..... ताई.

खुपच छान !!
अत्यंत ओघवती आणि अर्थपुर्ण भाषा !!