गझल कि पझल

Submitted by संजय मेहेंदळे on 21 January, 2017 - 20:57

Hard Core गझल fans ची क्षमा मागून ....(म्हणजेच कोणीतरी माझी कविता वाचेल अशी आशा बाळगून)

मी कोण आहे, ते सांगणार नाही
पण सांगल्या वाचून, जनांसी कळणार नाही
(आता बोवा काय करावं .....)
.
मी पाहतो दिक्काला पलीकडे, दृष्टीला माझ्या सीमाच नाही
जाऊ दे ना बे....; चष्मा काढला तर वाचताही येत नाही
(आता बोवा कॅ क्रावं .....)
.
मी लांघतो हिमालय अन दऱ्या-खोऱ्या, कुठली आडकाठी नाही
उंची मोज आधी; साडेपाच फूट.... जाऊ दे, जमणार नाही
(आता बोवा कॅ क्रावं .....)
.
मी शारदेचा तन्मणी, तारांगणास मजवांचून शोभा नाही
काय सांगावं आता?..... गल्लीत कुत्रं देखील ओळखत नाही
(आता बोवा कॅ क्रावं .....)
.
"तू लिही वा न लिही"
(To be OR Not to be.... वाहवा… क्या बात है संजय!!)
कुणालाही काही फरक पडणार नाही
.

Group content visibility: 
Use group defaults

Lol