जावे वाटे दूर....दूर

Submitted by मीनल कुलकर्णी on 21 January, 2017 - 05:04

जावे वाटे दूर.......दूर

जावे वाटे दूर.......दूर
एक अनामिक हुरहूर ....
दाटलेला कंठ
मनसागर संथ
बसलेला घाव वर्मी
जगण्याची देई उर्मी
मौनस्वरात भिजलेले
निशब्द असे सूर....
जावे वाटे दूर.......दूर
एक अनामिक हुरहूर ...
पाऊलखुणा उगा उमटतील
वाळूतच त्याही मिटतील
पुन्हा मागे वळून पाहता
लुप्त होतील क्षणात रेषा
समोर दिसले क्षितीज जरी
मनी दाटते काहूर....
जावे वाटे दूर.......दूर
एक अनामिक हुरहूर ....
सोबतीला नकोत कुणी
सावलीही जशी पाहुणी
नकोच हातामधे हात
कल्पित क्षणभराची साथ
ना शुक्रतारा ना सांजवारा
नसावे चांदणे ते फितूर...
जावे वाटे दूर.......दूर
एक अनामिक हुरहूर ...
पायात अदृश्य बेडी
डोळ्यात स्वप्न वेडी
वाटेवरती असतील काचा
तरी असेन मी फक्त माझा
सभोवती नसेल माझ्या
आभासी जग हे भेसूर...
जावे वाटे दूर.......दूर
एक अनामिक हुरहूर
- मीनल

Group content visibility: 
Use group defaults

छान!