पासपोर्ट आणि पोलीस….

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 20 January, 2017 - 02:36

पासपोर्ट आणि पोलीस….

२० दिवसांपूर्वी मी नवीन आणि नवऱ्याने रिन्यूअल पासपोर्ट साठी ऍप्लिकेशन केलं. सगळंच ऑनलाईन. पासपोर्ट ऑफिसमध्ये त्यादिवशी तीन-चार तास गेले, पण त्यांनी सांगितलं पासपोर्ट कुरिअर ने येईल आणि सोबत एक पावती. ज्यावर लिहिलं होत पोलीस व्हेरिफिकेशन सुरळीत पार पडलं आणि तसा रिपोर्ट आला कि पासपोर्ट कुरिअरने येईल.

देणाऱ्यांनी न विचारताच सल्ले दिले, "पोलीस घर आयेगी तो चुपचाप हाथ में ५०० रखना.... अगर पासपोर्ट चाहिये तो..." दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनमधून फोनवर झालेलं फॉलो अप... पोलिसांनी स्वतःहून केलेला फोन, "हे नाही ते पोलीस स्टेशन तिथे पेपर्स पाठवू तुमचे, भेटून या... "तिथे (पोलीस स्टेशन) गेल्यावर "कॉन्स्टेबल घरी येतील मग इथे भेटायला या.... या या पेपर्ससोबत " असं आलेलं उत्तर आणि दोनच दिवसात घरी आलेले कॉन्स्टेबल कोकरे... आम्ही दोघे घरात नव्हतोच... घरी पप्पा होते त्यांसोबत केलेली महत्त्वाची चौकशी, डॉक्युमेंट्सची केलेली पडताळणी, आम्हा दोघांसोबत फोनवर विचारलेली उलट सुलट प्रश्न उत्तरे आणि माझ्या मुलींसोबत घालवलेला "फनी " वेळ. "पोलीस काका खूप फनी होते..." हे मुलींकडून आलेलं खेळकर उत्तर आणि "चान्गला माणूस होता" हा पप्पांकडून आलेला प्रतिसाद. ना चहाची मागणी ना सरबताची. "शनिवार किंवा रविवार या या वेळेत दोन दिवसात भेटून जा." नेमकं याच सुमारास हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची वेळ आली. पोलिसांसोबत ची वेळ निघून गेली तर किती वेळ जाईल पासपोर्ट यायला देव जाणे हेच विचार डोक्यात. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच घरी जाण्याअगोदर एकदा पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं. हातात हॉस्पिटलची फाईल घेऊनच पोहारीकर साहेबाना भेटलो. परिस्तिथी तशीच समजावून सांगितली आणि त्यांनी सगळी हातातली कामं बाजूला ठेऊन काही फॉर्म्यालिटीज पूर्ण करून , "ह्यांना (मला ) आधी घरी सोडून, तुम्ही परत या. मी आहे इथे.. मग चौकशीला बसू." असं माझ्या नवऱ्याला सांगून त्यांनी आम्हाला पाठवलं. "थँक्स" म्हटल्यावर, "आम्हाला पण माणुसकी आहे साहेब" एवढंच म्हटले. यथावकाश नंतर नवऱ्यासोबत मीटिंग झाली, चर्चा, वाद, संवाद, गोंधळ... जसं जसं होईल तसं तसं स्टेप बाय स्टेप. तिथून निघताना नवराच गोंधळून गेला... काही देऊ कि नको...? कारण आमच्यासाठी त्यांनी जे केलं ते ती त्यांची ड्युटी होती पण ....... ह्या पण वरच अडलं सगळं... मग कुठे तरी नवऱ्याला त्यांचे हावभाव वाचून निष्कर्ष काढावा असं वाटलं... आणि त्यांच्या चेहऱ्यावर पण त्याला "ड्युटीच केली" हे हावभाव दिसले.

नवरा तिथून परतला... आणि आज आमच्या हातात आमचा कोराकरकरीत पासपोर्ट आला.

आम्हाला पोलिसांमध्ये फक्त माणुसकी आणि ड्युटीच दिसली.

हे सगळं इथे लिहिण्याचा घाट घालण्याचं कारण म्हणजे, नेहमी वाईट काही अनुभवी पडलं कि त्याच्या नावाने आपण टाहो फोडतो... मग जेव्हा कधी काही चांगलं अनुभवलं तर त्याचाही उदो उदो व्हावा हि माझी उद्दात्त इच्छा. "काही चहा पाणी देऊन काही होईल का? " हा प्रश्न आपण जेव्हा एखाद्याला विचारतो तेव्हा त्या अधिकार्यापेक्षा जास्त गुन्हेगार आपण ठरतो ह्याची जाणीव झाली. लोकांनी आम्हाला आधी सांगितलं... की "पैसे द्यावेच लागतील..." पण कोणत्या निष्कर्षावर?. मला हेच सांगायचं आहे की असं काहीच नाहीये... आपल्या सगळ्यांना शॉर्ट कट ची सवय झालीय... आणि म्हणूनच भ्रष्टाचार वाढलाय...

जर लोक सुधारत असतील तर त्यांना सुधारू द्या... उगाच पूर्वदृष्टिकोन ठेऊन त्यांची अब्रू काढू नका... कारण तेही "माणूसच" आहेत... आणि त्यांनाही माणुसकी आहे. ती माणुसकी त्यांना प्रूव्ह करायला लावू नका... त्यांच्यात शोधायला शिका.

आणि सगळ्यांत शेवटी... मनःपूर्वक आभार... मुंबई पोलीस... तुमचे

…...... मयुरी चवाथे - शिंदे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मलासुद्धा पासपोर्ट करता अगदी सुटसुटीत ३ ते ४ कागदपत्र लागले होते...अन पोलिस व्हेरिफिकेशन तर खुपच हसतखेळत झालं होत... Happy

मला का पोलीस व्हेरिफिकेशन लागलं नव्हतं? पत्ता बदलला होता तरी? मी पासपोर्ट ऑफिस मधून टोकन swipe करून बाहेर पडता-पडता पासपोर्ट issue झालाय असा समस आला होता.

मला १५ वर्शान्पूर्वी पासपोर्ट मिळाला तेव्हा , आम्ही कोणीही घरी नसताना पोलीस शेजारयान्कडे चउकशी करून गेले आणि मला स्टेशन ला बोलावून घेतले, तिथे १० मिनिटात जुजबी चउकशी करून मला जायला सान्गितले आणि १५ दिवसात स्पीड पोस्ट्ने पासपोर्ट घरी मिळाला होता.
४ वर्शान्पूर्वी नूतनीकरणाच्या वेळेसही सर्व आवश्यक कागद्पत्रे घेऊन मुन्ढव्याच्या ऑफिचमधे गेलो होतो, आणि एक तासात मोकळा झालो होतो ; कुठलेही पोलीस वेरिफिकेशन न होता एका महिन्यात पासपोर्ट घरी मिळाला होता.
हे दोनही अनुभव हे विनासायास काम झाल्याचेच आहेत.

Pages