सांजवेळचे गीत

Submitted by राजेंद्र देवी on 18 January, 2017 - 01:28

सांजवेळचे गीत

आज मी व्यथित आहे
उर्वरीत आयुष्य व्यतीत आहे
सुख हे माझ्यासाठी कथित आहे...
दु:ख हेच माझे अतीत आहे

बंदिस्त या साऱ्या वेदना
सांगू कोणाला, कोण मित आहे
मुखवटे घालून जनात हसतो
हे सारे विहित आहे

एक तुझीच आठवण
तिच आज लिहितं आहे
स्वप्न ते भंगले जे
सांजवेळचे गीत आहे

राजेंद्र देवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांजवेळचे गीतं >>> तं वर अनुस्वार हवा असेल तर सांजवेळची गीते असा बदल करा शीर्षकात.
व्यथितं >> इथेही अनुस्वार ?

बाकि कवितेतल्या भावना पोहोचल्या. यमकांचा मारा झाल्यासारखे वाटले. हळू हळू वृत्तात, तालात लिहायला जमेल. त्यासाठी शुभेच्छा !