मुंबई मेरी जान

Submitted by Sanjeev.B on 17 January, 2017 - 06:59

जुन्या हिंदी चित्रपट गाण्यातुन जे मुंबई आपल्या दिसत असतं त्यात एक ठळक गोष्ट जे जाणवतं ते म्हणजे ट्राफिक आणि तेव्हाचं समाज. त्या काळी रस्त्या वर आरामात फेरफटका मारता येई, पण नंतर नंतर हे चित्र बदलायला लागलं. सदर लेखात आपण अशीच काही गाणी पाहु.

सर्वात प्रथम जे गाण मला आठवतं ते म्हणजे सी आय डी (१९५६) चित्रपटातले जॉनी वॉकर वर चित्रीत केलेलं ए दिल है मुश्किल हे गाण, ह्या गाण्या मध्ये मुंबई चे जे वर्णन केलं आहे ते एकदम यथार्त आणि कालातीत आहे. त्या गाण्यात पहा ट्राफिक कसं आहे ते आणि आज मरिन लाईन्स चर्नी रोड ला पहा !!!
https://www.youtube.com/watch?v=7Xu44aq8Fog

नंतर जे गाणं आठवतं, ते अनाडी (१९५९)चित्रपटातले राज कपुर वर चित्रीत केलेले किसे की मुस्कुराहटो पे हो निसार हे गाणं. ह्या गाण्यात ही ट्राफिक एकदम विरळ आहे. ह्या गाण्यात मला सगळ्यात जास्त जे भावतं ते म्हणजे राज कपुर एका चणे विक्रेत्याला जे जीवनाचं तत्वज्ञान सांगतो व तो चणे विक्रेता राज कपुर ला चणे देतो, तर राज कपुर त्या चणे विक्रेत्यांस जे आभार प्रदर्शन करतो ते मस्त आहे
https://www.youtube.com/watch?v=69pPYkGiEAQ (२.०० ते २.३० पर्यंत चे क्लिपिंग पहा)
हे गाणं मला वाटतं बॅन्डस्टॅन्ड परिसरात चित्रीत केला आहे.

चित्रपट : आवारा (१९५१), गाणं : आवारा हु. ह्या गाण्यात पहा राज कपुर जेव्हा कोळींणीं च्या ट्रक मध्ये जेव्हा चढतो, तेव्हा ती बायकां च्या मुद्राभिनय पहा आणि जेव्हा ती बायका जेव्हा राज कपुर ना ट्रक च्या बाहेर जाण्यास सांगतात तेव्हा काहीच ट्राफिक दिसत नाही.
https://www.youtube.com/watch?v=VY1pWTek2sY (१.०० ते १.४० पर्यंत चे क्लिपिंग पहा)

नंतर नंतर काळ बदललं, कृष्णधवल सिनेमा, रंगीत झालं, शहर अजुन विकसीत होत गेल्या, शहरात गर्दी वाढत गेली, समाजाचे मानसिकता बदललं.

१९७१ साली प्रदर्शित झालेली अंदाज (राजेश खन्ना आणि हेमा मालिनी) मधील जिंदगी एक सफर है सुहाना आणि १९७६ सली प्रदर्शित झालेली बैराग (दिलीप कुमार, सायरा बानु आणि लिना चंदावरकर) मधील सारे शहर मे आप सा कोई नही कोई नही.
https://www.youtube.com/watch?v=8wZDU-DDTOU

https://www.youtube.com/watch?v=PFv9eNvPvuI

अंदाज मध्ये राजेश खन्ना हेमा मालिनी बरोबर फिरत असताना गेटवे ऑफ इंडिया आणि जुहु वर गर्दी पहा, आणि बैराग मध्ये गावाहुन मुंबईत आलेला दिलीप कुमार च्या पाठी लागलेले मवाली पहा, आधीच मुंबईतले उंच बिल्डिंग्स पाहुन घाबरलेला दिलीप कुमार, त्यात त्याच्या पाठी लागलेले मवाली, दिलीप कुमार ने जो अभिनय केलं आहे, मस्तच.

१९७५ साली प्रदर्शित झालेली छोटी सी बात ह्या चित्रपटात अमोल पालेकर, विद्या सिन्हा ला पटवत असतो.
न जाने क्यो होता है यु जिंदगी के साथ ह्या गाण्यात विद्या सिन्हा, अमोल पालेकर साठी बस स्टॉप वर थांबलेली असते, असरानी स्कुटर वर येतो आणि तिला लिफ्ट ऑफर करतो, ती नकार देते आणि बस स्टॉप वर थांबते, थोड्या वेळाने बस ही येतं, पण ती ते बस सोडुन देते. ऑफिस मध्ये ही दिवस भर ती त्याच्या (अमोल पालेकर) बद्दल विचार असते, ऑफिस सुटल्यावर तिला वाटतं कि रोजच्या सारखं अमोल पालेकर तिच्या घरा पर्यंत तिचा पाठलाग करणार, पण तसे काही होत नाही. दुसर्‍या दिवशी दोघे ही बस मध्ये असतात, एक सिट रिकामी होते, तर त्यात विद्या सिन्हा बसते, तिच्या बाजुला अमोल पालेकर बसायला जातो तर लगेच दुसराच कुणीतरी बसतो. हे सर्व आज ही असंच होतं
https://www.youtube.com/watch?v=NC1yM-9Jwrk

जानेमन जानेमन तेरे दो नयन हे गाणं पहा, त्यात ही त्या काळ चे मुंबई चे ऑफिस रुटिन छान दाखवलंय.
https://www.youtube.com/watch?v=ats8Y1yzgPI

१९७६ साली प्रदर्शित झालेले बातो बातो मे ह्या चित्रपटातले हे गाणं पहा, सुनिए, कहिए .............. बातो बातो मे प्यार हो जाएगा. हे मला वाटतं बॅन्डस्टॅन्ड वर चित्रीत केलं गेलं आहे. मुंबई लोकल ट्रेन, बॅन्डस्टॅन्ड वर फिरणं, अहाहा एकदम नोस्टॅलजिक.
https://www.youtube.com/watch?v=TOK8aLrOjFQ

१९७८ साली प्रदर्शित झालेलं मुकद्दर का सिकंदर मधलं हे गाण, रोते हुए आते है सब, हसता हुआ जो जाएगा, वो मुकद्दर का सिकंदर जानेमन कहलाएगा. ह्या गाण्यात ही बरंच मुंबई दर्शन आहे. परत बॅन्डस्टॅन्ड (नॉट शुअर), वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (सांताकृझ) .
https://www.youtube.com/watch?v=MSgbs_NuWoY

१९७६ साली प्रदर्शित झालेले अमिताब बच्चन आणि मौशुमी चतर्जी अभिनीत मंझिल ह्या चित्रपटातले,रिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन. हे गाणं तर मला फारच आवडतं, पावसातली मुबई फारच छान चित्रीत केलं आहे, हुतात्मा चौक, गेटेवे ऑफ इंडिया, मरिन लाईन्स, मुंबई युनिवर्सिटी समोर ची मैदान . मरिन लाईन्स ला ते बाकड्या वर बसुन शेंगदाणे खाणे, आहाहा मस्तच.
https://www.youtube.com/watch?v=dcLQ7AwRAjk

असंच एक गाण आहे सावन बरसे तरसे दिल (अक्षय खन्ना आणि सोनाली बेंद्रे अभिनीत) सिनेमा : दहक (१९९९)

डॉन (१९७८) चित्रपटा मध्ये पण सुरुवातीलाच एक गाणं आहे, इ है बंबई नगरिया तु देख बबुआ, सोने चांदी की नगरीया तु देख बबुआ......... ह्या गाण्यात तर मुंबई चे एक एक ठिकाण चे मजेदार वर्णन आहे.
https://www.youtube.com/watch?v=X2F3EvboX_Q

ही शेवटची दोन तीन गाणी आहेत त्यात आताची मुंबई दिसते फुटपातो के हम रहने वाले (चित्रपट : मशाल (१९८४)) आणि ममैया केरो केरो केरो ममा (चित्रपट : अर्जुन (१९८५))
https://www.youtube.com/watch?v=mpuMkLTu9es
https://www.youtube.com/watch?v=iwcTUEaFyi8

सो गया यह जहा, सो गया आस्मा, सो गयी है सारी मंझिले ओ सारी मंझिले, सो गया है रस्ता (चित्रपट : तेजाब (१९८८) ) हे गाणं मुंबईत चित्रीत केलंय की नाही ते नक्की आठवत नाही.

परिंदा (१९८९) चित्रपटात बरंच मुंबई दर्शन पहायला मिळत.

वांद्रा किल्ल्यावर (बॅन्ड स्टॅन्ड च्या ही पुढे, आज जिथे लँड्स एन्ड (ताज) आहे तिथे ) चित्रीत झालेली गाणी जे आठवतात त्यात १९७१ साली प्रदर्शित झालेली बुढढा मिल गया (रात कली एक ख्वाब मे आयी और गले का हार हुई) आणि २००३ साली प्रदर्शित झालेली वैसा भी होता है (तुटा तुटा एक परिंदा ऐसे टुता के जुड ना पाया).
रात कली गाण्या मध्ये तर किल्ला तर फारच प्रशस्त आणि स्वच्छ ही दिसत आहे .

https://www.youtube.com/watch?v=N4J1kZ5F8Yc
https://www.youtube.com/watch?v=9Ered22Xy4E

तर मित्रांनो (आणि मैतरणिंनो सुध्दा बरं का) काही गाणी सुटले असतील तर तुम्ही भर घाला.

धन्स Happy

संजीव बुलबुले (१७०१२०१७)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान संकलन.
देख कबीरा रोया मधे, शुभा खोटेचे एक गाणे आहे, त्यात ती वरळी सी फेस वरून जाताना दाखवलीय, तो हि अगदी रिकमाच होता.
गोरेगावच्या आरे कॉलनीत बरीच गाणी ( जूना अदालत वगैरे ) तेव्हाही ती बाग रिकामीच असायची.

पण संजीव तरी एक आहे, पुर्वी शुटींगसाठी बरीच गर्दी हटवायचे. आतासारखे खर्‍या गर्दीत शिरुन, छुप्या कॅमेराने चित्रीकरण होत नसे सहसा.

कई बार यूहीं देखा है - रजनीगंधा
तुम्हे हो न हो मुझको तो इतना यकीं है, दो दिवाने शहरमे - घरोंदा

छान लेख आणि यादी...

बाकी तुम्ही गाण्यात दिसणार्‍या मुंबईबद्दल लिहिले आहे पण मुंबईचे गाणे म्हणताच एक चटकन आठवणारे म्हणजे, टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह ..

लाख लाख रोज आके, बस जाते है
ईस शहर से दिल लगाके, फस जाते है
सोने की राहों मे सोने को जगाह नही......
साला ईधर तो फूटपाथ भी हाऊसफुल है
शोला है, या है बिजुरिया,
दिल की बजरीया,
बंबई नगरीया ....

मला जुण्या मुंबई चे चित्रीकरण बघायला खुप आवडते>>> मलाही!!!

त्याकाळचे लोकांचे पेहराव, त्यांचे कॉटनचे कपडे, फोर्ड मॉरिस मोटारी, ते कलाकुसरीचं फर्निचर, मोठाले पियानो, रेडिओग्राम, कोपऱ्यातली उंच लंबकाची घड्याळे, सायकली, व्हिक्टोरिया बग्गी, ट्राम, बेस्ट बसेस, आगगाडी आणि तिचे लाकडी डबे, त्या ठोss आवाजाच्या बंदुका, हार्मोनियमवरची गाणी, ते भुवया उंचावणारे आणि तोंडात चिरूट नाचवणारे व्हीलन नाहीतर हिरो/हिरोईनचा बाप हे सर्व बघताना मी गुंग होऊन जातो.