भाज्यान्चे रन्ग कसे टिकावणे

Submitted by दीपाकुल on 17 January, 2017 - 06:50

भाज्यान्चे रन्ग कसे टिकावणे? मी जेव्हा भाज्या करते तेव्हा भाज्याचा मूळ रन्ग न रहाता त्याना काळपाट रन्ग येतो......
काही टीप्स असतील तर सन्गा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नेमक्या कुठल्या भाजीसाठी विचारता आहात ?. लोखंडी कढई, काळा मसाला, करपलेले मसाले अश्या अनेक कारणांनी भाजीला काळा रंग येऊ शकतो.
काही भाज्या नैसर्गिक रित्याच, शिजल्यावर रंग बदलतात ( उदा लाल कोबी )

पालेभाजी शेवटी घालुन कमी शिजवावी. फळभाज्यांचा रंग वर दिनेशदांनी म्हंटल्याप्रमाणे अनेक कारणांवर अवलंबुन आहे. कुठ्लिही भाजी फार शिजवु नयेच. कांदा, बटाटा, गवार, वांगी, भोपळा वगैरे शिजवावे लागते. बाकीच्या भाज्या फार शिजवत नाही मी.

काळ मासाला नाही वापारात मी. हिरवि मिर्र्ची किन्वा लाल तिखाट पूड वापरते. तरीही फ्लावर, कोबी, घेवडा , वान्गी, मटार
अश्या भान्ज्यन्चा रन्ग बदलतो. फार शिजवतही नाही. आणि लोखंडी कढईही नाहीं वापरत. रन्ग बदलल्यमुळे दिसायला चन्गल्या नाही दिसत. Sad

शिजवल्यावर भाज्या रंग बदलतात. मी दुसऱ्या कारणांसाठी भाज्या आधी वाफवून घेते आणि नंतर तयार फोडणीत वाफवलेल्या भाज्या घालून, परतून उतरवते, भाजीचा रंग फारसा बदलत नाही. अर्थात मी हे रंगासाठी करत नाही पण तुम्ही करू शकता. मी वाफवण्यासाठी स्टीमर वापरते. शिट्टीवाला कुकर नाही वापरत कारण त्यात माझ्या हातून भाजी जास्त वाफून गिच्चगाळ होते.

वांगी वाफवता येणार नाहीत, ती शिजवावीच लागणार, वाफवून चव जाणार. फ्लोवर, मटार वाफवला कि अजिबात रंग बदलत नाही, कोबी वाफवायची गरज नाही, नुसता मोठी आंच ठेऊन झटपट परता, रंग टिकेल. घेवडा वाफवून थोडा रंग बदलतो.

पालेभाज्या, ग्रीन बीन्स ब्लांच करावे. त्याने रंग टिकून राहतो.
त्याची कृती अशी आहे
१. एका भांड्यात पाण्याला उकळी आणायची (रोलिंग बॉईल)
२. धुतलेली भाजी (न चिरता) त्यात टाकायची आणि २-३ मिनटं शिजू द्यायची
३. वरील स्टेप चालू असताना एका भांड्यात थंड (बर्फ घातलेले) पाणी करायचे
४. उकळते पाणी फेकून भाजी गार पाण्यात टाकायची
५. फोडणी करत असल्यास कांदा, टोमॅटो मसाला वगैरे शिजला की अगदी शेवटी ब्लांच केलेली भाजी त्यात टाकायची.

http://www.bhg.com/recipes/how-to/cooking-basics/how-to-blanch-vegetables/
ही लिंक बघा. सगळ्याच भाज्यांना हे उपयोगी आहे. मी फक्त पालक आणि मटार साठी वापरते. कारण पनीर करताना ते काळे पडले की चांगले दिसत नाहीत.

प्रयत्न करुन बघते ब्लांचचा. अजूनही काही ट्रिक असतील तर सान्गा़. मी ऑफिस मध्ये बघते ना तर सगळ्यन्च्या
भाज्यन्चे रन्ग छान दिसत असत्तात.

फोडणीत लाल तिखट घालू नका. मीठ्,तिखट सर्व घालून भाजी शिजायला ठेवता का? अशावेळी रंग बदलत असावा.माझ्या घरी माझ्या वनिताने कांदा-बटाट्याची भाजी वर दिल्याप्रमाणे केली होती.मळकट रंग आला होता,त्यानंतर तिला हे पदार्थ टप्प्या टप्प्याने घालायला सांगितल्यावर आता तिची भाजी चांगली दिसते/असते.

१. एका भांड्यात पाण्याला उकळी आणायची (रोलिंग बॉईल)
२. धुतलेली भाजी (न चिरता) त्यात टाकायची आणि २-३ मिनटं शिजू द्यायची
३. वरील स्टेप चालू असताना एका भांड्यात थंड (बर्फ घातलेले) पाणी करायचे
४. उकळते पाणी फेकून भाजी गार पाण्यात टाकायची
५. फोडणी करत असल्यास कांदा, टोमॅटो मसाला वगैरे शिजला की अगदी शेवटी ब्लांच केलेली भाजी त्यात टाकायची.>>>

ह्या सगळ्या पायर्‍यांमध्ये भाजी चिरायची कधी?

देवकी, मग तिखट मीठ् हे कधी घालायचे? मी जनरली फोड्णी करुन भाजी टाकते आणि थोड्या वेळाने तिखट मीठ् घालते......
पालकाची पातळ भाजी करताना तर आधी कूकरला शिजवून घेतली तर हिरवा रन्ग तर अजिबात येत नाही आणि मिक्सरला न शिजवाता काधली
तर चान्गली चव नाही लागत....

@ मंजुडी
सॉरी हहा
४ आणि ५ च्या मध्ये. गार झाल्यावर अर्थात