थंडी

Submitted by vijaya kelkar on 17 January, 2017 - 04:03

थंडी

आगमनाची चाहूल लागता
सज्ज झाले सारे स्वागता
रंग -ढंग न्यारे-न्यारे
परि वाटती बहु प्यारे
टाकले पहिले पाऊल
गुलाबी , दंग प्रेमी युगुल
सोनेरी हिमशिखरांवर
मोतिया तृणपर्णावर
वाजते पाऊल वाजते
कसे पण ऐकू नाही येत
चूप रहावे** नाहीतर
कडाक्याचा धाsक
गारठली रात्र- पहाट
ऊब हवी, ऊब हवी
मायेची ऊब,
गोधडीची ऊब,
दुलईची ऊब,
शेकोटीची ऊब
ती आली नि
पाव्हणं शेकोटीला आलं
शेकोटीला आलं
यावं यावं शेकोटीला यावं

विजया केळकर_____

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults