पहाट

Submitted by vijaya kelkar on 16 January, 2017 - 03:34
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पहाट
पहाट झाली, आकाश फाकल, लपली चांदणी
रांगोळी- सडा घाली हसरी उषाराणी
जलकण शिंपणाचे पर्णकुशित मोत्यावाणी
पेला रसगंधाचा घे, वाडे सज्ज फुलराणी
विहग पंख पसरती विहरण्या मुक्तांगणी
निघाली गोधने रानी, ललना रत जालभरणी
ताज्या पवनलहरींवर हिंदोळती सुरेल गाणी
वाट चाले आता नवी सकाळ
होई सुख-दुखाची हातमिळवणी
ढगकाळे- पांढरे देती
एकमेका हुलकावणी
दिनक्रम रोजचा वाटावा नवा
पण मुरलेल्या गुलकंदावणी
वसंत- शिशीरात डोले डहाळी
गात आरती वा विराणी
सदा बहार राहे हिरवा सर्वकाळी
सदाबहार आणी जीवनीं
विजया केळकर _____

कविता छान आहे...
पण ती प्रतिसादात का दिली,नावाखालीच द्यायची ना??

कावेरि-----
कविता देतांना नावाखाली कवितेसाठी जी जागा असते ती स्क्रीन वर दिसतच नव्हती
तर हा पर्याय करून पहिला, असो .
आज कविता नीट पोस्ट करता आली आहे

कावेरि ....... प्रतिसादा साठी धन्यवाद