पेटुनी आरक्त संध्या...

Submitted by सत्यजित... on 13 January, 2017 - 09:53

पेटुनी आरक्त संध्या,मातला अंगार आहे...
केवडा वा रातराणी..मोगराही फार आहे!

मोकळे बाजार-रस्ते,शांत आहे शहर सारे...
वाटते आहे उद्याचा,वादळाचा वार आहे!

काजव्यांच्या चार ओळी,सारख्या फिरतात येथे...
सांग त्यांना..पेटलो तर,सूर्य माझे सार आहे!

एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी...
त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे!

सांगू नका कोणी मला हा कोणता आहे ऋतू...
आजही या काळजाचा रंग हिरवागार आहे!

सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी...
मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेश भट यांनी लिहीलेले, यशवंत देव यांचे संगीत असलेले नि देवकी पंडित यांनी गायलेले रंगुनी रंगात माझ्या, रंग माझा वेगळा हे गाणे आत्ताच ऐकले. हुबेहूब त्याच चालीवर वरील कविता म्हणता यावी.

वाह! अतिशय सुंदर झालिये..:)
वरती आणायलाच हवी!

एक तुकडा चांदण्याचा,बांधला होता उराशी...
त्याच तुकड्याने नभीचा,चंद्र मी टिपणार आहे!>> वाह!

<<<< सोबती कोणी न माझा,ना कुणाचा सोबती मी...
मी निघालो त्या क्षणाला,काफिला निघणार आहे! >>>>>
हे खूप आवडले...

मस्तच