दिल दोस्ती दुनियादारी - भाग १

Submitted by अक्षय. on 13 January, 2017 - 08:18

[मोबाइल ही गरज राहिलेली नसून ते व्यसन झाला आहे. मुंबई-पुणे-मुंबई मधील मुक्ता बर्वे यांचा फेमस dialogue. आपल्या आयुष्यातल्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा ज्यात आणखी एका गोष्टींची भर पडलीय मोबाइल (free wifi). तर ह्या २१ व्या शतकात घराघरात गाजत असलेला वाद म्हणजे आमच्या काळात आम्ही हे करायचो आमच्या काळात आम्ही ते करायचो (खरतर ते करतही होते असो). तुमच्या सारख्या तरूण पोरांनी तालीमीत गेलं पाहिजे आणि तुम्ही काय करता सकाळी उठल्या पासून नुसता त्या मोबाइलमध्ये. तर ह्या दोन पिढी मधला वाद थोडासा bridge करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या मालिकेतले पात्र घेऊन करतोय.So presenting Addiction in दिल दोस्ती दुनियादारी. ]
(मुंबईत एकाच प्लॅटमध्ये भाड्याने राहणार्‍या सहा मित्रांची ही गोष्ट आहे. त्यांपैकी सुजय मुख्य भाडेकरू आहेत. मीनल, ॲना , रेश्मा, आशुतोष व कैवल्य हे बाकीचे पोटभाडेकरू. हे साही मित्र फक्त रूम शेयर करत नाहीत तर ते त्यांचे जीवन, एकमेकांची सुख-दुःखेपण शेयर करतात. मीनल ही एक ज्युनियर ॲक्ट्रेस असते, तर ॲना ही ड्रेसडिझायनर आहे. सुजय एक सॊफ्टवेअर कंपनीत आहेत, तर कैवल्य हा गायक आहे.
हे साहीजण मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून आले असून एकमेकाच्या मदतीने मजामजा करत कसे जगावे हे दाखवतात. निकम आजी ह्या त्यांच्या शेजारी असतात.)

सकाळी सकाळी रेश्मा स्वयंपाकघरात काहीतरी बनवत होती. काहीतरी नाही ती पोहेच बनवत होती. तेवढयात आशू तिथे डोळे चोळत येतो.
आशू :- ताई काहीतरी खायला देणा पटकन भुख लागलेय.
रेश्मा :- काय अरे आशू दात तरी घास आधी असच काय मागतोय.
आशू :- घासले ना ताई देणा पटकन भुख लागलेय.
रेश्मा :- कसे घासले.
आशू :- आस काय करते ताई दात कशाने घासतात ब्रशने.
सुजय :- हो रे आशूबाळा दात ब्रशनेच घासतात पण स्वतःच्या.
आशू :- स्कॉलर तेवढ कळतं मला.
कैवल्य :- बाळ आशूतोश कधी विकत घेतलेलास तू हा ब्रश.
रेश्मा :- अरे काय हे झालं का सुरू तुमचं सकाळी सकाळी पोहे केलेत गरम गरम खाऊन घ्या.
मिनल:- आरे यार रेश्मा परत पोहे.
रेश्मा :- हो पटकन खाऊन घे आणि हा सुजय येताना भाजी आणशिल का??
सुजय :- हो office सुटल की घेऊन येतो. आशू दिवसभर काहीतरी खात बसलेला आसतोस तेवढे माझे कपडे इस्त्री करून आण जरा.
आशू :- बस काय यार स्कॉलर मला पण असतात कामं.
कैवल्य :- किंजलची पिशवी उचलायची.
आशू :- आवडत मला ते..
रेश्मा :- अरे काय हे सकाळी सकाळी. मिनल शुटिंगला जातेयस ना ??
मिनल :- हो का गं ??
रेश्मा :- जाता जाता वाण्याकडे सामानाची यादी देऊन जा संध्याकाळी घेऊन ये.
(अपेक्षेप्रमाणे सगळे आपआपली कामे विसरून येतात.)
रेश्मा :- अरे सुजय आलास आणि हे काय भाजी कुठे आहे ???
सुजय :- ये यार साँरी विसरलो मी आणायला त्याचं काय झालं मी निघालो तेव्हा एक महत्त्वाचा फोन आला त्या गडबडीत विसरलो.
रेश्मा :- काय अरे सुजय मी भाजी संपलीय अस सांगून पण तू कसा काय विसरू शकतोस ??
सुजय :- विसरलो आता करना थोडं अँडजस्ट. आशू माझे कपडे आणलेस का इस्त्री करून मला उद्या मिटिंगला जायचंय.
(तोपर्यंत मिनल येते तिचं नेहमीच गाणं म्हणत
बादल पे पाँव है, या छूटा गाँव है
अब तो भई चल पड़ी अपनी यह नाव है!!)
रेश्मा :- मिनल वाण्याकडे लिस्ट दिलीयसना चल आपण घेऊन येऊ त्यांनी सामान काढून ठेवले असेल.
मिनल :- भेंडी विसरले यार काय झालं माहितीय का मी इकडून बाहेर पडले आणि मला कबिर चा फोन आला आणि त्यात मी विसरले. हा कैवल्य आहेना घेऊन येईल पटकन तसही गिटार खाजवत बसलेला असतो दिवसभर. आणेल तो.
कैवल्य :- कैवल्य आणेल काय तुमचा तुम्ही बघून घ्या मला एक जिंगल द्यायची आहे उद्या आणि मिनल याला खाजवणं नाही वाजवनं अस म्हणतात.
सुजय :- आशू माझे कपडे आणलेस का इस्त्री करून मला उद्या मिटिंगला जायचंय.
कैवल्य :- तो किंजल सोबत बिझी आहे फोनवर.
अॕना :- आशू माझा फोन आता गेलास तू ??
सुजय :- काय माणूस आहे हा याला स्वतःची कामं नसतात आणि दुसऱ्याच्या वस्तू वापरतो.
आशू :- हे बघ स्कॉलर मला कामं असतात.
अॕना :- काय माझा बॕलेंस संपवायची ही मिनल माझे सगळे ड्रेस घालून मोठे करते आ..
मिनल:- ये अॕना जाडी कोणाला म्हणतेस तू तर ना गेलीस आता
कैवल्य :- अरे काय बाजार मांडलाय मला उद्या जिंगल बनवून द्यायची आहे जरा शांत बसा.
मिनल :- म्हणजे तुला कामं असतात आम्ही रिकामटेकडे असच ना.
कैवल्य :- मी असं म्हणालो नाही मी फक्त शांत बसा एवढेच बोललो.
रेश्मा :- अरे कसला उच्छाद मांडलाय एकतर दिलेली काम होत नाहीत तुमच्या कडून फक्त मोबाइल पाहिजे व्यसन झालाय मोबाइल म्हणजे त्या डबड्यासाठी जिवावर उठला आहात का रे एकमेकांच्या ??
निकम आजी :- अरे काय चाललय कसला गोंधळ आहे हा ??
रेश्मा :- बघाना निकम आजी मी ह्या सुजयला भाजी आणायला सांगितलं तर ह्याला फोन येतो. ह्या मिनलला वाण्याकडे यादी देऊन जा म्हणाले तर हिला पण फोन येतो ह्या कैवल्यला काही सांगितलं की ह्याला जिंगल बनवायची असते
मिनल :- ए भेंडी रेश्मा उगाच पराचा कावळा करू नको एवढं काही झालं नाहीये
रेश्मा :- होका काही झालेलं...
(निकम आजी रेश्माला थांबायला सांगून बोलू लागतात )
निकम आजी :- अरे काय आहे हे तुम्हा आजकालच्या पोरांना काय झालंय. व्यसन झालंय नुसता मोबाइल, तुमचं प्रेम जमतात मोबाइलवर, तुटतात पण मोबाइल वरतीच, पार्ट्यापण मोबाइल वर, एवढेच नाहीतर मैदानात खेळायचा क्रिकेट पण हल्ली तुम्ही मोबाइलवरतीच खेळता . Candicrush आणि Tinpattichya बाहेर खूप मोठ्ठ जग आहे.
To Be continued ....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रयत्न चान्गला आहे...., पण तुमच्या कथेतील पात्राचा एकमेकाशी कय सम्बद्ध आहे, ते जरा स्पष्ट केले की वाचायला सोपे जाईल....!!!

मुंबईत एकाच प्लॅटमध्ये भाड्याने राहणार्‍या सहा मित्रांची ही गोष्ट आहे. त्यांपैकी सुजय मुख्य भाडेकरू आहेत. मीनल, ॲना , रेश्मा, आशुतोष व कैवल्य हे बाकीचे पोटभाडेकरू. हे साही मित्र फक्त रूम शेयर करत नाहीत तर ते त्यांचे जीवन, एकमेकांची सुख-दुःखेपण शेयर करतात. मीनल ही एक ज्युनियर ॲक्ट्रेस असते, तर ॲना ही ड्रेसडिझायनर आहे. सुजय एक सॊफ्टवेअर कंपनीत आहेत, तर कैवल्य हा गायक आहे.

हे साहीजण मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून आले असून एकमेकाच्या मदतीने मजामजा करत कसे जगावे हे दाखवतात. निकम आजी ह्या त्यांच्या शेजारी असतात.

तुम्ही दिल दोस्ती दुनियादारीचीं स्क्रिप्ट लिहीत आहात का??
म्हणजे नेमका काय मुद्दा आहे तुमचा??सांगाल का?