कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो . २०१५ चा अपवाद वगळता गेली ६ वर्षे आपण हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. या वर्षी ही काही मायबोलीकरांनी आवर्जून तो साजरा करण्यासाठी विचारपूस केली आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.
उपक्रमात सहभागी होणार्या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.
मराठी भाषा दिवस हा उपक्रम मायबोलीवर साजर्या होणार्या गणेशोत्सवाचे छोटे रूप मानायला हरकत नाही. फरक इतकाच की गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा केला जातो, मराठी भाषा दिवस हा २७ फेब्रुवारी आणि त्याच्या आगचेमागचे काही दिवस असा एकूण मिळून ३ किंवा ५ दिवस किंवा त्या त्या वेळेच्या संयोजकांनी ठरवल्यानुसार पार पाडला जातो. आणि हा उपक्रम करताना मुख्य भर मराठी भाषेशी संबंधित कार्यक्रम/ स्पर्धा करण्यावर असतो हे गेल्या वर्षांतले उपक्रम पाहिलेत तर लक्षात येईल. या कार्यक्रमांची आखणी आणि आयोजन संयोजकांनी करायचे असते.
१. संयोजनात भाग घेऊ इच्छिणार्यांची नावे बघून अॅडमिन संयोजक निवडतील आणि मायबोलीवर त्यांचा क्लोज्ड युजर ग्रूप तयार करतील. या ग्रूपमधे उपक्रमाचा कालावधी आणि स्वरूप ठरवणे आणि उपक्रमाशी संबंधित इतर चर्चा करता येते.
२. उपक्रमाचे स्वरूप यामधे मायबोलीकरांसाठी स्पर्धा, कार्यक्रम, पाहुण्यांकडून/ मायबोलीकरांकडून लेखन मागवणे इत्यादी ठरवावे. त्यासाठी परवानगीची आवश्यकता असल्यास त्या योग्य प्रकारे मिळवणे.
३. या सर्व कार्यक्रम/ स्पर्धांची जाहिरात मायबोलीवरील गप्पांच्या बाफवर करणे.
४. प्रत्यक्ष उपक्रम राबवणे.
५. उपक्रमाचा समारोप आणि निकाल.
मला संयोजनात भाग घ्यायला
मला संयोजनात भाग घ्यायला आवडेल.
मी पण संयोजनात मदत करायला
मी पण संयोजनात मदत करायला तयार आहे.
मी पण संयोजनात मदत करायला
मी पण संयोजनात मदत करायला तयार आहे.
गेल्या वर्षी खूप धमाल केलेली.
गेल्या वर्षी खूप धमाल केलेली. यावर्षी दुर्दैवाने जमायचे नाही, दुसरे उद्योग आधीच ठरलेले आहेत.
माझ्याकडून शुभेच्छा!!!!
संयोजनात यायचंय पण वेळ कसा
संयोजनात यायचंय पण वेळ कसा आणि किती मिळेल नाही सांगता येत. छोटी-मोठी कामं माझ्या सवडीने केली तर चालतील का? जसं- मुद्रितशोधन वगैरे?
मला पण संयोजनात भाग घ्यायला
मला पण संयोजनात भाग घ्यायला आवडेल.
गेल्या वर्षी खूप धमाल केलेली.
गेल्या वर्षी खूप धमाल केलेली. +१
खात्री आहे या ही वर्षी मजा येईलच
अनेकानेक शुभेच्छा !
गेल्या वर्षी खूप धमाल केलेली.
गेल्या वर्षी खूप धमाल केलेली. +१
यंदाही काहीही मदत लागली तर बिन्धास्त सांगा.. नक्की करेन.
गेल्या वर्षी खूप धमाल केलेली.
गेल्या वर्षी खूप धमाल केलेली. +१
काही तेव्हा सुचलेल्या , पण न केलेल्या उपक्रम्/खेळांची सुची आहे माझ्या कडे.
बाकी यंदा वाचन मोड!
मला तर नवीन पण सुचलेत. :प
मला तर नवीन पण सुचलेत. :प
पण प्रत्यक्ष मभादिच्या सुमारास वेळ देता येईल असे वाटत नाही तसेच नवनवीन माबोकरांना ही संधी उपलब्ध व्हावी ही ईच्छा आहे.
ज्यावर्षी कोणीच नसेल (असे होऊ नये पण एकदा झालंय त्यामुळे...) तेव्हा मला जरूर हाक मारा.
नवीन आयडियाज किंवा मागच्या
नवीन आयडियाज किंवा मागच्या वर्षांमधल्या execute करता न आलेल्या आयडियाज कृपया मेलने वेमांना पाठवून ठेवा वेमांना नको असेल तर ते सांगतील त्या व्यक्तिला पाठवा :))
संपदा +१
संपदा +१
नाव नोंदवलेल्या मायबोलीकरांचे
नाव नोंदवलेल्या मायबोलीकरांचे आभार. आज संयोजनाचा ग्रूप तयार करून देतो म्हणजे तुम्हाला सुरुवत करता येईल.
बिल्वा, माधव, प्रज्ञा९,
बिल्वा, माधव, प्रज्ञा९, प्राजक्ता_शिरीन, संपदा
कृपया या धाग्याला भेट द्या. http://www.maayboli.com/node/61468
चमुला शुभेच्छा...
चमुला शुभेच्छा...
शुभेच्छा
शुभेच्छा
शुभेच्छा.
शुभेच्छा.
मराठी भाषा २०१७ चा ग्रूप कुठे
मराठी भाषा २०१७ चा ग्रूप कुठे आहे? कुठून सभासद व्हायचे? मदत करा.
http://www.maayboli.com/node
http://www.maayboli.com/node/61806 ग्रूप आज तयार केला आहे.
शैलजा, अॅडमीननी दिलेल्या
शैलजा, अॅडमीननी दिलेल्या जागी ग्रूप तयार केला आहे. आता तुम्ही सदस्यत्व घेऊ शकता.