माझ्या बाळा

Submitted by गवंडी ललिता on 12 January, 2017 - 05:03

माझ्या बाळा
आठवणीनी तुझ्या, माझे डोळे येतात भरून
उरातला हुंदका जातो, ओठातच दबून

माझ्या कर्तृत्वाच्या जगाला, आता भावनांचीच झालर
आजही का हवा आहे तुला, आईच्या मायेचा पदर?

आठवते मला तुझे, कोमेजलेले ते बालपण
कर्तृत्वाच्या पुढे, थिटे पडले माझे आईपण

जीवनाने आणला, माझ्या जगण्यात कठोरपणा
म्हणूनच का अंगी, आला माझ्या करारीपणा ?

तू तुझ्या जीवनात, भावनांचा खेळ कधीही करू नकोस
अन् कर्तृत्वाला तुझ्या, कधीही विसरू नकोस !

जीवनात नाही झुकले मी, कधी कुणापुढे
अन् तुही जगावे , माझ्याही जाऊन पुढे !

आयुष्यात येतील बघ , दिवस भले बुरे
सोबतीला तुझ्या असतील माझेच बोल खरे

अंधारी रात्र आता जाईल बघ सारून
उद्याची पहाट तुझी, येईल सुख घेऊन !
ललिता गवंडी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो,मला अंदाज आलाच होता,तुमच्या भावना अगदी शब्दातून प्रकट झाल्या...
किती वर्षांची आहे तुमची मुलगी....तिला वाचून दाखवा,खूप आवडेल तिला..

ओके....आदरमोद