कुणीतरी असावे..!

Submitted by गवंडी ललिता on 12 January, 2017 - 02:29

कुणीतरी असावे..!

कुणीतरी असावे, आपले म्हणणारे
या वळणावर वाट पाहणारे,

कुणीतरी असावे, आपले म्हणणारे
या ग्रीष्मात गारवा देणारे,

कुणीतरी असावे, आपले म्हणणारे
एकाकी जगण्याला साथ देणारे,

कुणीतरी असावे, आपले म्हणणारे
डोळ्यातील पाणी अलगद टिपणारे,

कुणीतरी असावे, आपले म्हणणारे
मनातील लाटांना किनारा देणारे,

कुणीतरी असावे, आपले म्हणणारे
थकलेल्या हातांना हात देणारे,

कुणीतरी असावे, आपले म्हणणारे
काळोख्या रात्री प्रकाश देणारे,

कुणीतरी असावे, आपले म्हणणारे
आयुष्याची सोबत करणारे, युगायुगांची साथ देणारे

कुणीतरी असावे, आपले म्हणणारे
कुणीतरी असावे, कुणीतरी असावे.......

-ललिता गवंडी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच हो ताई...मस्त...

कुणीतरी असावे, आपले म्हणणारे
एकाकी जगण्याला साथ देणारे,

कुणीतरी असावे, आपले म्हणणारे
डोळ्यातील पाणी अलगद टिपणारे,

कुणीतरी असावे, आपले म्हणणारे
मनातील लाटांना किनारा देणारे,

कुणीतरी असावे, आपले म्हणणारे
थकलेल्या हातांना हात देणारे,>>>>अप्रतिम,तोड नाही याला...