फटा पोस्टर निकला हिरो ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 January, 2017 - 15:16

नवीन वर्षामध्ये नुकतेच आपण एंट्री केली आहे, म्हणून एक एंट्रीचा धागा ..

फुल्ल बॉलीवूड ईस्टाईल हिंदी चित्रपटात हिरोची एंट्री म्हणजे एक कमाल असते. आपली पब्लिक सुद्धा शिट्ट्या, टाळ्या वाजवत आणि खुर्चीवर उभे राहून हिरोच्या पडद्यावरच्या पहिल्या एंट्रीचे स्वागत करते.

अर्थात तो सीनही तसाच दमदार हवा ..
आणि त्यापेक्षा दमदार त्या हिरोची क्रेझ असावी लागते..

अश्याच एंट्रया गोळा करायला हा धागा..
तर येऊ द्या तुमच्या आठवणीतील शिट्ट्या, टाळ्या आणि उसासे खेचणार्‍या हिरो हिरोईनींच्या एंट्रया..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झोपायला जायच्या आधी मी मला आवडणारी बेस्ट एंट्री ईथे देउन जातो.
अर्थात वन एण्ड ओनली किंग खान शाहरूख एस आर के !

मला आठवतेय या प्रभावाखाली मी ईतका होतो की स्कूलबसमधून उतरायचो आणि जिन्याने, ग्यालरीतून सुसाट धावत, एका खांद्यावर ब्याग लटकावत घरात एंट्री मारायचो. आणि माझी आई चहाचा कप हातात घेऊन माझी वाट बघतेय असे स्वत:च इम्याजिन करायचो. भले मग ती त्या वेळी हातात काठी घेऊन कपडे सुकत का घालत असेना...

वर्णनावरून समजले असेलच किंवा नसेलही,
तरीही, हा एंट्री सीन ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=FI4S3X5ptsM
आणि याला तोडणारा एखादा सीन असेल तर येऊ द्या .. जर बॉलीवूडात नाही सापडला तर हॉलीवूड, टॉलीवूड, मायबोलीबूड कुठूनही येऊ द्या Happy

ठीक आहे शाखा तर शाखा. आणखी कोणत्या रोमॅण्टिक किंवा डॅशिंग डायनामाइट एण्ट्र्या आहेत त्याच्या? मला लक्षात नाहीत. अर्थात वरची दोन्ही कॅटेगरीत बसत नाही.

फा Lol

वरची जया बच्चन कॅटेगरी एंट्री आहे. तिला काही तरी स्पेशल नाक असणारे किंवा शारूख्चा सेंट कुठला तरी जालीम असणारे कारण तो पळत यायला लागला की ती बरोबर तिकडे शोधत जाते Lol

Lol हो ना. स्क्रिप्टरायटरने दिग्दर्शकाला तिला 'nosy mom' चा रोल आहे असे सांगितले. त्याने ते लिटरली घेतले.

धनि आणि फा Lol
हुंगा ला ला हु हुंगा ला ला हू हुंग हुंग ...फर्र्र्र्र्र.. सर्र्र्र्र्रर काय सेंट लावलंय... Lol

बादवे, एख्द्याच्या वा एखादीच्या नावाने परफ्यूम असतात त्यात त्या कलाकाराचं काही कॉन्ट्रीब्युशन असेल काय? Proud

मला बाजीगर मधली जॉनी लिव्हरची एण्ट्री आवडली. जॉनी लिव्हर, काजोल, शिल्पा शेल्टी आणि ज्यु. चार्ली चॅप्लीन या सर्वांच्या एण्ट्र्या चांगल्या आहेत.

बादशहा मधे पुन्हा एकदा जॉनी लिव्हरची एण्ट्री दमदार आहे. त्याला जास्त स्कोप असता तर सिनेमा चालला असता. Sad

डर मधली सनीची एण्ट्री पैसे वसूल आहे. ओम शांती ओम मधे दीपिका पदुकोणची एण्ट्री लाजवाब आहे, तशीच चेन्नई एक्सप्रेस मधेही. दोन्हीही सिनेमे तिच्यामुळे तुफान चालले.

कुछ कुछ होता है च्या वेळी लोक सलमानच्या एण्ट्रीला जाऊयात असे म्हणायचे ते आठवलं. मला तर फरिदा जलालची आणि मूर्ख राणीची एण्ट्री आवडली. फरिदा जलाल आणि तिची सिनेमातली नात या दोघींची कामं छान झालेली आहेत. काजोलनेही धमाल केली आहे. सलमानच्या एण्ट्रीनंतर शिट्याच पडतात. सिनेमात एक बकरीचं पिल्लू पण होत जे आधी काजोलकडे असतं नंतर मूरा कडे जातं असं मैत्रीण सांगत होती. पण त्या वेळी मी पॉपकॉर्न खाण्यात गुंग असणार बहुतेक...

आदिति Lol

मिलिंद गुणाजी आणि किरण ख्रेरच्या देवदासमधील जॅकी श्रॉफची एण्ट्री आपण कशी विसरू शकतो ? त्यात ऐश्वर्या राय पण होती.

अजय देवगण, फुल और कांटे!
कितिबी शारुक येउंद्ये अज्याला तोड न्हाय!

तिला काही तरी स्पेशल नाक असणारे किंवा शारूख्चा सेंट कुठला तरी जालीम असणारे

किंवा त्याने बरेच दिवस आंघोळ केलेली नसणारे ! .

सपना सिक्स्थ सेन्स नाही ते ममतेचे प्रतीक दाखवलेय. प्रत्येक मुलाची ईच्छा की घरी आल्या आल्या सर्वात पहिले आई आपल्याला दिसावी, प्रत्येक आईची ईच्छा की आपला मुलगा आल्याआल्या सर्वात पहिले तो आपल्याकडे यावा. ती नुसती शाहरूखची एण्ट्री नव्हती तर जया बच्चनमधील आईची एंट्री होती. पुढे पिक्चरची जी स्टोरी दाखवलीय त्यानुसार समजेलच की ती कथेनुसार किती महत्वाची होती.

शाहरूख फ्यान म्हणून एक कुतूहल,
किती जणांना ते वर्णन वाचून समजले आणि किती जणांना लिंकवर क्लिक केल्यावर समजले.

दामिनी मधील सनीची एंट्री मलाही आवडलेली. दमदार सुपरक्लास. इन्फॅक्ट जॉनी लीवरच्या नंतर आपल्याला ती आठवावी याचे आश्चर्य वाटले Happy

फूल और काटें बद्दल नॉस्टेल्जिक नाईटीज लोकांकडून बरेच ऐकतो. तेव्हा हे खूप भारी वाटले असावे. दोन बाईकवर तंगड्या टाकून वगैरे..

के३जी च्या चॉपर सीनची लिंक दिली होतीस का ?
काही आवश्यकता नव्हती. चॉपरने उतरल्यावरही तुम्हे कैसे पता चला मां असे म्हणणारा तो सीन वेगळ्या अर्थाने अजरामर झालेला आहे. ती माऊली कोशिशच्या सेटवरच असल्याचे वाटावे असा ब्रिलियंट सीन होता तो.

<<<<<<अजय देवगण, फुल और कांटे!
कितिबी शारुक येउंद्ये अज्याला तोड न्हाय!>>>>>
शाखा नाय अन स्वजो नाय फोल्लोविंग एन्ट्रीच दमदार हय
https://www.youtube.com/watch?v=Qkk6q1REoAI

जणू काय मूळव्याधीचा लय त्रास सहन करतय Lol

घे एन्ट्री ना सिंघम ना चिंगम अन चिंधी शाखा स्वजो पण काय नाय
वोनली बाजीराव
https://www.youtube.com/watch?v=QqTLr_hviPs

चिते कि चाल बाज कि नजर और बाजीरावकि तलवारपर कभी संदेह नाही किया करते

जल्ला हाय काय नाय काय

Bw

शाहरुख आणि दिव्या भारतीच्या 'दिवाना' मधे, मस्तमौला शाहरुखची धडाकेबाज एन्ट्री .... बाईकवर 'कोई ना कोई चाहिये प्यार करनेवाला' अस म्हणत!

आमच्या उमलत्या वयात हा चित्रपट पाहिला त्यामुळे ही शाखाची एन्ट्री अगदीच दिल का ठोका चुकवुन वै वै.... Lol

अबे हटा सावन की घटा, खा खुजा बत्ती बुझाके सो जा, निंटकले पिंटुकले
मंटी पे खडेली आंटी बजा रही है बार बार घंटी
कुल्ला घुमाके पश्चिम को पलट ले, फुट ले, वट ले शाणा बन...

आ गया हीरो...

पाहुणे कलाकार किंवा मुख्य भूमिका असतानाही चित्रपटात मध्यंतरानंतर किंवा उशिरा प्रवेश असेल तर तो प्रसंग खास असतो. निदान प्रेक्षकांना तरी इतका मोठा कलाकार असा अचानक कसा इतक्या उशिरा कसा काय आला बुवा याचा धक्का बसतो.

अशीच काही उदाहरणे:-

काजल - राजकुमार
आयी मिलन की बेला - धर्मेंद्र (नकारात्मक भूमिका)
आराधना - राजेश खन्ना (मुलाच्या भूमिकेतला)
सच्च्चा झुठा - राजेश खन्ना (नकारात्मक भूमिका)
गिरफ्तार - अमिताभ बच्चन
अंदाज - राजेश खन्ना
नया दिन नयी रात - संजीवकुमार (कथा पुढे सरकताना येणारे प्रत्येक नवीन पात्र)
हिरो हिरालाल - अमिताभ बच्चन (कॅमिऑ)

आनंदमध्ये दारा सिंह आणि जॉनी वॉकर लहानशा भूमिकेत आहेत आणि त्यांची एन्ट्रीही तशीच सुखद आहे.

मेहमूदच्या सिनेमांत अनेक पाहुणे कलाकार असत आणि त्यांची एन्ट्रीही स्पेशलच असे

जॉनी और जिनी - हेमा मालिनी, ऋषी कपूर आणि असे अजून बरेच
बॉम्बे टू गोवा - किशोर कुमार (कॅमिऑ)
साधू और शैतान मध्ये मेहमूद टॅक्सीत प्राणचे (निष्प्राण) प्रेत घेऊन फिरत असताना त्याच्या टॅक्सीत येऊन बसणारे इतर कलाकार.

ओम शांती ओम मधील पहिल्या दिपिकाची एन्ट्री. Happy

मनमोहीनी 'ऐश्वर्या' हम दिल दे चुके सनममधे. Happy

सलमानच्या समद्याच एन्ट्र्या आवरतात मना Blush

Pages