वाट

Submitted by गवंडी ललिता on 4 January, 2017 - 02:02

वाट
नको पाहूस वाट, बोलू निवांत वेळी
असे सांगत सांगत, तू झालीस पाठमोरी

जीव झाला कासावीस, शब्द फुटेना ओठी
पाही वाट या क्षणी, कधी होतील भेटीगाठी

मिटला ना डोळा क्षणभर, पापणी न झाली वरखाली
वाट पाहत तुझी, सांज वेळ झाली खरीखरी

भास उगाचचं होतो, उभी तु वळणावरी
आठवे शब्दन् शब्द तुझे, वाटे अमृताची गोडी

मावळली तिन्ही सांज, वाट तुझी पाहता पाहता
भासे नभीचा चंद्र, चेहरा जणू तुझा

कधी होशील निवांत, झाली ही पहाट
हाती घेऊनी मोगरा, पाही मी तुझी वाट

सोनेरी किरणात, दिसे मला तु सोनपरी
असेल हे सत्य की, भासे मला स्वप्नापरी

-ललिता गवंडी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीव झाला कासावीस, शब्द फुटेना ओठी
पाही वाट या क्षणी, कधी होतील भेटीगाठी

मिटला ना डोळा क्षणभर, पापणी न झाली वरखाली
वाट पाहत तुझी, सांज वेळ झाली खरीखरी

भास उगाचचं होतो, उभी तु वळणावरी
आठवे शब्दन् शब्द तुझे, वाटे अमृताची गोडी

मावळली तिन्ही सांज, वाट तुझी पाहता पाहता
भासे नभीचा चंद्र, चेहरा जणू तुझा>>>>>>>>>मस्तच......