बंड्याचे अदभुत प्रकरण

Submitted by Suyog Shilwant on 3 January, 2017 - 12:10

शिक्षणमंत्री शाळेच्या दौऱ्यावर आले होते.
एका वर्गात जाऊन ते गुरुजींशी बोलले.
" मास्तर, तुमच्या वर्गात सर्वात हुशार विद्यार्थी कोण आहे?"

मास्तरांनी तिसऱ्या रांगेत बसलेल्या बंड्याकडे बोट दाखवले.
त्याला पुढे बोलवण्यात आले.

शिक्षणमंत्र्यांनी कोतुहल म्हणुन त्याला एक प्रश्न विचारला.

" बर..मला सांग बाळा...
सहा सक किती?"

बंड्या एका क्षणाचा बिलंब न लावता म्हणाला.
" 65"

शिक्षणमंत्री मास्तरावर खसकले.
" काहो, मास्तर तुम्ही तर म्हणालात कि हा सर्वात हुशार आहे...?"

मास्तर हसतच म्हणाले.
"अहो साहेब.. पुर्ण वर्गात हाच मिळतं जुळतं उत्तर देतो...बाकिच्यांना विचारलत तर 100 च्या वरचाच आकडा सांगतात"

शिक्षणमंत्र्यांना त्यांच्या शाळेची आठवण झाली राव...

बंड्याला तर आदर्श विद्यार्थ्याचा पुरस्कारच दिला...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users